Maharashtra News Updates : Sonia Gandhi: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल; खासदार राहुल शेवाळेंची माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jan 2023 05:33 PM
सीबीआयकडून मुंबईतील इन्कम टॅक्समधील अधिकाऱ्याला अटक

सीबीआयकडून मुंबईतील इन्कम टॅक्समधील अधिकाऱ्याला अटक..


उमेश कुमार या अधिकाऱ्याला 8 हजारांची लाच घेताना अटक..


एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी अधिकाऱ्याने 10 हजारांची मागणी केली होती..


सीबीआयने सापळा रचून अटकेची कारवाई केली..

पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर, गणवेश भत्त्यात वाढ

पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर


गणवेश भत्त्यात वाढ


गृह विभागाचा निर्णय


आधी ५ हजार रुपये मिळत होता भत्ता


आता प्रति वर्षी ६ हजार रुपये मिळणार


पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना मिळणार लाभ

संत सेवालाल महाराजांच्या जीवनावर आधारित 'संत मारो सेवालाल' चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित होणार

Washim News : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जीवनपटावर आधारित 'संत मारो सेवालाल' हा बंजारा भाषेतील चित्रपट येत्या 13 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यात प्रदर्शित होणार आहे. संत सेवालाल महाराजांनी 300 वर्षापूर्वी पर्यावरणसह विविध विषयांवर विशेषत: पाण्याविषयी केलेली भविष्यवाणी यामध्ये दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि पोहरादेवीच्या महंतांनी याविषयी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली

गोंदिया गारठला... 12.5 सेल्सिअस तापमानाची नोंद

Gondia Cold News : मागील दोन दिवसांपासून तापमान खालावल्याने विदर्भ गारठला आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. तर, बुधवारी दिवसभर दाट धुक्याची चादर होती. अशात गुरुवारीही शीतलहर सुरु असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी जाणून लागली आहे. विदर्भात सर्वात कमी 12.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदियात झाली आहे. अगदी सकाळपासून ही शीतलहर सुरु असल्याने दिसून येत आहे. गारव्यामुळे हुडहुडी भरली असून अनेक ठिकाणी नागरिकांनी दिवसभर शेकोट्यांचा आधार घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

Jalgaon News: जळगाव: रेशन धान्याचा अवैधरित्या साठा केल्याच्या संशयावरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची कारवाई

Jalgaon News: रेशन धान्याचा अवैधरित्या साठा केल्याच्या कारणावरून जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी धरणगाव येथील दोन धान्य गोडाऊन वर छापेमारी करत ही गोडाऊन सिल केल्याने रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे

Raigad News: रायगड: उरण येथील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात

Raigad News: उरण येथील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले.. 


बोकडविरा येथील ललिता ठाकूर यांची राहत्या घरात हत्या... 


३६ तासात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले, उरण पोलीसांची कारवाई....


ललिता ठाकूर यांची गळा दाबून हत्या ...

सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीची यात्रा उद्यापासून सुरु होतेय.  

सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीची यात्रा उद्यापासून सुरु होतेय.  तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाकडून पुढील निर्बंध लागू करण्यात आलेत.  हे निर्बंध याच कालावधीत होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कांजळे इथल्या काळुबाई देवीच्या यात्रेलाही लागू असणार आहेत. 


1. यात्रेच्या काळात पशुहत्या करण्यास मनाई असे.


2. कोंबड्या, बकऱ्या,   बोकड इत्यादी प्राण्यांच्या या भागात वाहतुकीस मनाई असेल. 


3. मांढरदेव परिसरात वाद्ये आणण्यास आणि वाजवण्यास मनाई असेल. 


4. मांढरदेव परिसरातील झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहूल्या अडकवणे, लिंबू आणि बिब्बे ठोकणे, भानामती करणे, करणी करणे यास बंदी असेल. 


5. मंदिर परिसरात नारळ फोडणे आणि तेल वाहण्यास मनाई असेल. 


6. मंदिर परिसरात मद्य बाळगणे आणि पीणे यास मनाई असेल. 

Sangli News: सांगलीत रंगणार श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा.. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष राहणार उपस्थित

Sangli News: सांगलीत श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कल्पद्रुम क्रीडांगण येथे  4 ते 14 जानेवारीपर्यंत  हा सोहळा चालणार आहे. ह.भ.प. श्री समाधान शर्मा (बीड) हे दररोज मराठीतून रामकथा सांगणार आहेत. तसेच या निमित्ताने भव्य कलश यात्रा, शोभायात्रा, ध्वजारोहण, ज्ञानयज्ञ, प्रवचन, किर्तन, आरोग्य शिबीर आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करणार आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज हे उपस्थित राहणार आहेत. दहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास एक लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल; खासदार राहुल शेवाळेंची माहिती

सामनाचे मुख्य संपादक उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलांय, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहूल शेवाळे यांनी दिली आहे. शेवाळे यांच्या विरोधात सामना वृत्तपत्रात सातत्याने खोट्या आणि निराधार बातम्या छापत असल्यामुळे अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितलेय.

अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांबाबत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मंत्रालयीन दानलात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विविध मागण्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक घेऊन अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर निश्चितपणे तोडगा काढण्यात येईल असे आश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. 

हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीला स्थगिती 

हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीला स्थगिती देण्यात आलीय. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली होती आणि अखेर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात असलेल्या शेतकरी विकास पॅनलचे 13 संचालक निवडून आले. तर शिंदे गटाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलचे चार संचालक निवडून आले. 


या मतमोजणीच्या वेळी मोठा घोळ झाल्याचं निदर्शनास आल्याने निवडणुकीतील पराभूत असलेले उमेदवार  ऋषिकेश देशमुख यांनी या विरोधामध्ये उपनिबंधक यांच्या दालनामध्ये आक्षेप नोंदविला होता. मतमोजणीच्या वेळी मतपत्रिकांचा मोठा घोळ निर्माण झाल्याचं यावेळी लक्षात आल्याने 9 जानेवारी रोजी होणाऱ्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीला उपनिबंधक यांनी  स्थगिती दिल्याचे आदेश काढण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत सभापती उप सभापती निवडीला स्थगिती आसानार आहे. या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. कारण 13 संचालकाच्या रूपाने वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यात आली होती. परंतु, सभापती निवडीला आता काही काळ वाट पहावी लागणार आहे.  

Hingoli News: हिंगोली: वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती स्थगिती

Hingoli News: 13 संचालकाच्या रूपाने वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यात आली होती परंतु सभापती निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवार  ऋषिकेश देशमुख यांनी केला. त्यांनी  या मतमोजणीविरोधात उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतरही स्थगिती देण्यात आली आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा : नाना पटोले

मुंबईत येथे विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजप विरोधी पक्षात असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करीत होते. सध्या केंद्रात आणि  राज्यात भाजपचे सरकार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भाजप का देत नाही, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ते गोंदियात बोलत होते.

Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. नियमित तपासणीसाठी आणि श्वसनसंबंधी संसर्गावर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

वसई येथील कामन परिसरातील एका कंपनीला भीषण आग, आग विझवण्याचं काम सुरू

मुंबई : वसई येथील कामन परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्रथमिक माहिती आहे. वालीव पोलिस आणि वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. 

शिवसेना नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त, साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई  

मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलीय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलीय. 

आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करून सत्य समोर आणण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण

वरूड तालुक्यातील विधानसभा 2019 च्या प्रचार दरम्याण देवेंद्र भुयार यांच वाहन जाळपोळ करून आणि गोळीबार केला गेला होता, असा आरोप आहे. या प्रकरणाची कोणतीच कार्यवाही न झाल्याने आजपासून वरुड येथे सर्वपक्षीय आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरीजवळ गुजरातच्या बोटीला जलसमाधी; दोन खलाशांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Ratnagiri News : गुजरातच्या बोटीला रत्नागिरीजवळ जलसमाधी मिळाली. यात दोन खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. रत्नसागर असे बोटीचे नाव आहे. जयगडपासून 80 नॉटिकल माईल परिसरात ही घटना घडली आहे. कोस्ट गार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

Eknath Shinde: मराठी माणूस जगभरात ही आनंदाची बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde:  जगभरात मराठी भाषा आपल्या कानावर पडते. मराठी माणूस जगभरात ही आनंदाची बाब आहे.   विश्व मराठी संमेलन हा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिले आहे. 

Devendra Fadnavis:  जगातील आयटीमध्ये मराठी माणसाचा बोलबाला : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis:  मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम स्वातंत्र्य वीर सावरकरांनी केले आहे.  भारतीय भाषा जगवण्यासाठी ज्ञान भाषेत रुपांतर केल पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले आहे. आम्ही आता सर्व इंजिनेअरिंग किंवा इतर शिक्षण हे मराठी भाषेतून करणार आहे. मराठी भाषा ही ज्ञान भाषा करणार आहोत. मराठी नाट्य संस्कृती ची प्रगल्भता इतर कशात ही पाहता येत नाही. जगातील आयटीमध्ये मराठी माणसाचा बोलबाला आहे

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीतून शंभर कोटींचा कर वसूल करण्याचे धुळे महापालिकेसमोर आव्हान

Dhule News : महापालिकेला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीतून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. यंदा शहरासह हद्द वाढीतील गावातून चालू मागणी व थकबाकीसह 100 कोटी कर वसूल करण्याचे आव्हान मनपाच्या वसुली विभागासमोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांवर कारवाई सुरु केली आहे. नोटीस दिल्यावरही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. तसेच जे दुकानदार कर भरणार नाहीत त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई महापालिकेने सुरु केली आहे. काहींचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.

Mumbai Goa Traffic: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कंटेनर बंद पडल्याने एक तास वाहतूक कोंडी

Mumbai Goa Traffic: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कंटेनर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कशेडी घाट उतारताना वळणावर 14 टायर कंटेनर बंद झाला आहे. कंटेनर बंद पडल्याने एक तास वाहतूक कोंडी झाली

Mumbai Jain Morcha:  मुंबईत जैन समाजाचा भव्य मोर्चा, दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा जंक्शनजवळ वाहतूक कोंडी

Mumbai Jain Morcha:  मुंबईत जैन समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहाजवळ वाहतुकीची कोंडी झाली आहे.  झारखंडमधील सम्मेद शिखर पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास जैन समाजाकडून विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात आले आहे

Ajit Pawar: संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार काय बोलणार?

Ajit Pawar: अजित पवार यांची आज पत्रकार परिषद आहे. आज दुपारी 2 वाजता विधान भवनात पत्रकार परिषद होणार आहे. संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार काय बोलणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे

 Raigad News: महाडनजीकच्या भोर घाटातील दरीत पडून एका इसमाचा मृत्यू

 Raigad News: महाडनजीकच्या भोर घाटातील दरीत पडून एका इसमाचा मृत्यू झाला आहे. मंडणगड येथील 41 वर्षीय अब्दुल शेख याचा दरीत कोसळून मृत्यू झाला. मंगळवार सायंकाळच्या सुमारास एक इसम सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळल्याची शक्यता आहे. महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीम, सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. 



Bhandara News: भंडारा - गोंदिया जिल्ह्यात हलक्या पावसाची हजेरी, ढगाळ वातारणामुळे तूर, पालेभाज्यांना फटका

Bhandara News: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. दोन्ही जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास हलक्या पावसाने हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास बंद झालेला पाऊस सकाळी पुन्हा रिमझिम सुरू झालेला आहे. या पावसाचा पिकांवर परिणाम जाणवणारा नसला तरी ढगाळ वातावरणामुळे तुर पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोबतच पालेभाज्यांच्या शेतीलाही ढगाळ वातावरणाचा फटका बसून पिकांवर अळीच्या प्रादुर्भावाचा धोका वर्तविण्यात येत आहे. अवकाळी रिमझिम पावसाच्या हजेरीने पालेभाजी पिकाकडे वळलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

MNS:  मनसेच्या मुंबईतील कोकणवासीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेणार

MNS:  मनसेच्या मुंबईतील कोकणवासीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अकरा वाजता शिवतीर्थावर  बैठक  बोलावली आहे.  मुंबईत कोकणवासी मेळावा झाल्यानंतरचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. राज ठाकरे याच्या कोकणात होणाऱ्या दोन सभांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला होता. 

Chandrapur Mahavitran Strike: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका

Chandrapur Mahavitran Strike: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं  पाच युनिट  पडले बंद पडले आहे.  चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात आहे. सध्या 2920 मेगावॅट क्षमतेच्या  चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातून 1520 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. 

Ahmadnagar Mahavitran Strike: अहमदनगरच्या उपनगरातील अनेक भागात रात्री बत्ती गुल

Ahmadnagar Mahavitran Strike: अहमदनगरच्या उपनगरातील अनेक भागात रात्रीच बत्ती गुल झाली आहे  नगर शहरातील अनेक भागात रात्री 2 वाजल्यापासून वीज बंद. आहे. महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू होताच उपनगरात वीज गेली आहे, 

Nagpur Mahavitran Strike:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संपावर

Nagpur Mahavitran Strike:  वीज वितरण यंत्रणेच्या खाजगीकरणा विरोधात राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर  आहेत. रात्री बारा पासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत.  रात्री बारा वाजता नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संपावर आहे. संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी असल्याचा दावा

Buldhana Mahavitaran Strike:  बुलढाण्यातील सर्वात मोठं औद्योगिक शहर असलेलं खामगाव येथील 80 % वीज पुरवठा बंद

Buldhana Mahavitaran Strike:  जिल्ह्यातील सर्वात मोठं औद्योगिक शहर असलेलं खामगाव येथील 80 % वीज पुरवठा बंद आहे.  जिल्ह्यातील सर्व वीज कर्मचारी संपावर तर कंत्राटी कामगारांनी वीज कर्मचाऱ्यांना  पाठिंबा दिला जिल्ह्यातील 152 कंत्राटी वीज कर्मचारी सुद्धा संपावर गेल्याने खामगाव शहरातील 80 टक्के भागात वीज पुरवठा खंडित झाल आहे. 

Mahavitran Strike: वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका कोयना वीज निर्मिती प्रकल्पाला, 36 मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद

Koyna Mahavitran Strike: वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका कोयना वीज निर्मिती प्रकल्पाला बसला आहे.  36 मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद झाले आहे.  संप असाच सुरू राहिला तर कोयनेचे इतरही वीज निर्मिती बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

Pune Mahavitaran Strike: महावितरण बंदचा फटका पुण्यालगतच्या भागाला, पुण्यातील  शिवणे , सन सिटी, वडगाव धायरी परिसर या भागात लाईट बंद

Pune Mahavitaran Strike: महावितरण बंदचा फटका पुण्यालगतच्या भागाला बसला आहे.  पुण्यातील  शिवणे , सन सिटी, वडगाव धायरी परिसर या भागात लाईट बंद आहे.  वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने पहाटेपासून लाईट बंद आहे. 

Gadchiroli T-6 Tigress : वाघिणीला जेरबंद करण्याच्या  मोहिमेला वेग, टी-6 वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

Gadchiroli T-6 Tigress : वाघिणीला जेरबंद करण्याच्या  मोहिमेला वेग आला आहे. दहा जणांचा बळी घेणाऱ्या टी-6 वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वाघिणीला जेरबंद
करण्यासाठी 100 जणांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 

Kokan Mahavitaran Strike :राज्यव्यापी कर्मचारी संपात रत्नागिरी व सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश

Kokan Mahavitaran Strike : कोकण परिमंडलातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांचा आजपासून संपात रत्नागिरी व सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर रायगडमध्ये 1500 कर्मचारी संपात सहभागी झाले. 

Ratnagiri  News: कोकणातील रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे जातीनं लक्ष, प्रमोद जठार यांची माहिती

Ratnagiri  News:  कोकणातील रिफायनरी प्रकल्पावर आता पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे. हा प्रकल्प गतिशक्ती योजनेत अंतर्भूत करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतच्या प्रत्येक घडामोडींवर आता पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष असणार आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, या प्रकल्पाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे अशी माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली. कोकणातील रिफायनरीचं नेमकं कामकाज कुठवर आलेलं आहे? हा प्रकल्प पुढे जाण्यास आणखी किती कालावधी लागू शकतो? याबाबत विचारला असता जठार यांनी कोकणातील रिफायनरीवर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. अशी प्रतिक्रिया दिली.


 
Mahavitaran Strike: महावितरणाच्या राज्यव्यापी कर्मचारी संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांचा सहभाग

Mahavitaran Strike:  महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खाजगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.यात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे.हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे

Satara Electricity: सातारा शहरातील लाईट बंद

Satara Electricity:



  • सातारा शहरातील लाईट बंद

  • संपक-यांनी केल्या लाईट बंद

  • विविध मागण्यांसाठी विद्युत महामंडळातील कर्मचाऱ्यांचा सुरू आहे संप

  • पहाटे तीन पासून लाईट बंद

  • सातारकरांची सकाळ अंधारात

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Strike Against Privatization) करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. वीज महामंडळाच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ मुंबई, ठाणे, नाशिक, रायगडसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कामगार संपावर. 86 हजार कामगार, अभियंते आणि अधिकारी आणि 42 हजार कंत्राटी कामगार संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा आहे. विज संपाच्या पार्श्वभुमीवर 30 संघटनांच्या नेत्यांना देवेंद्र फडणविसांनी संघटनांना दुपारी 12 वाजता चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.


आजपासून राष्ट्रवादीची जनजागर यात्रा


राष्ट्रवादीची महिला आघाडी राज्यभर जगजागर यात्रा काढणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा भागात जाणार आहे आज पुण्यात शरद पवार (sharad pawar) यात्रेला झेंडा दाखवणार आहे, संध्याकाळी 6 वाजता.


पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिंदे गटात युती होणार? आज  एकत्रित पत्रकार परिषद


पीपल्स रिपब्लिकन पार्टी (People's Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) यांच्यात होणार युती होणार? आज जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करण्याची शक्यता, दुपारी 1 वाजता 


‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन


मुंबई – 4 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता. 


घाटकोपर पाणी खात्यावर शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा


घाटकोपर पाणी खात्यावर शिवसेना नेते अनिल परब (anil parab) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे. विभागात पाणी मिळत नाही यासाठी मोर्चा निघणार आहे, सकाळी 11 वाजता. 


मंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार 


बाळासाहेब भवन येथे मंत्री उदय सामंत (uday samant) यांचा जनता दरबार होणार आहे, सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.