Maharashtra News Updates 5th January 2023 : यवतमाळ: दोन निवासी डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून चाकू हल्ला, जखमी डॉक्टरांवर उपचार सुरु; निवासी डॉक्टर संपावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jan 2023 10:57 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट...More

महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूरमध्ये पुर्व वैमनस्यातून वीस वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव करे असे मयताचे नाव आहे. प्रणव हा इंदापूर तालुक्यातील करेवाडी गावचा रहिवासी आहे. राजकुमार पवार, इरफान शेख ,फरदिन मुलाणी अशी आरोपींची नावे आहेत. प्रणवचा भाऊ प्रतिक नानासाहेब करे याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.मयत प्रणव यास आरोपी जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. फिर्यादी त्यांना विचारणा करण्यास गेला. त्यावेळी त्याला ही धमकावण्यात आले होते. आरोपींनी प्रणव याचा पाठलाग करून कशाने तरी मारहाण करून त्याला जीवे ठार मारले आहेअसे दिलेल्या फिर्यादीत प्रतिक करे याने म्हटले आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.