Maharashtra News Updates 3rd January 2023 : कोकण शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jan 2023 11:04 PM
चंद्रपूर: अचानक गरम होऊन मोबाईलने खिशात घेतला पेट, एकजण जखमी, बल्लापूरमधील घटना

Chandrapur News: खिशातला मोबाईल अचानकपणे गरम झाला आणि त्याने पेट घेतला. पेट घेतलेला मोबाईल फेकून देत असतानाच स्फोट झाला. या घटनेत रामभाऊ आस्वले हे मोबाईलधारक जखमी झाले. त्यांच्या मांडीला इजा झाली. बल्लारपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील ही घटना घडली. 

संजय करले हत्याप्रकरणी दोन आरोपींना अटक, आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याचे उघड

पुणे येथील मोहसीन मुलानी आणि अंकित कांबळे यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई- गोवा हायवेवर ऑडी गाडीत मृतदेह आढळला होता. बंदुकीच्या गोळ्या घालून संजय करले याची हत्या करण्यात आली.

Belgaum News: एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांची एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट

Belgaum News: एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली.  एअर कमोडोर एस.श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले.नंतर त्यांना हवाई सैनिकांनी  मानवंदना दिली.एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट दिली.ट्रेनिंग स्कुलमधील प्रशिक्षणाच्या सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या पहिल्या तुकडीच्या  अग्नीवायूवीर प्रशिक्षणार्थिंशी संवाद साधला.

कोकण शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम  जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 5 जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार असून 12 जानेवारी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 30 जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

कोकण शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम  जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 5 जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार असून 12 जानेवारी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 30 जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

शेतकऱ्याला शिविगाळ करणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पैसे जमा न झाल्याने माहिती घेण्यासाठी ग्रामसेवक अर्जुन हांडे यांना शेतकरी गोकुळ गव्हाणे यांनी फोन केला होता. यावेळी ग्रामसेवक  अर्जुन हांडे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही घटना यवतमाळच्या महागांव तालुक्यातील पोखरी येथे घडली आहे.  फोनवर बोलत असताना ग्रामसेवकाने गावात येऊन मारण्याची धमकी देखील शेतकऱ्याला दिली.  ग्रामसेवकाने शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महागाव पोलिसांनी ग्रामसेवक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सांगलीतील आष्ट्यात शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं

सांगलीतील आष्ट्यात शिवप्रेमींच्या आंदोलनादरम्यान बाचाबाची झालीय. पोलिसांनी आंदोलकांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी आंदोलकांनी मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली. या राड्यामुळे सांगलीकडे जाणारी वाहतूक रोखली आहे. 

Yavatmal: आज रात्री बारा वाजता पासून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप

आदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खाजगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. त्याला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी संघर्ष समितीने विरोध केला आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपणीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, या मागणीसाठी आज रात्री 12 वाजतापासून वीज वितरण कंपनीच्या कामगारांनी  72 तासाच्या संपाची हाक दिली आहे. यवतमाळ येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने कर्मचारी एकवटले असून, आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

Sangli: सांगलीतील शिवप्रेमींचं आंदोलन मागे

आष्टा शहरामध्ये शिवप्रेमींनी ठिया मांडलेल्या ठिकाणी महाआरती करून आंदोलन संपवले आहे.  बुधवारी आष्टा नगरपालिकेकडून पुतळा उभारलेल्या जागेची फी जिल्हाधिकारी कार्यालयात भरून  जागेची हस्तारण प्रकिया  होणार असे आश्वासन आंदोलनकर्त्यांनी दिले आहे.

राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मागील दोन दिवसांपासून संपावपर असलेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

Solapur: उजनी धरणाच्या पाण्याच्या मुद्यावरून शेतकरी आक्रमक, आमदार -खासदारांना पाठवल्या बांगड्या

सोलापूरात उजनी धरणाच्या पाण्याच्या मुद्यावरून शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने अकरा आमदार आणि दोन खासदारांना बांगड्या पाठवल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना रद्द झाल्याचं पत्र सत्ताधारी आमदारांनी दाखवले होते. मात्र योजना रद्द झाले असेल तर पुन्हा टेंडर निघाले कसे? असा सवाल उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. 

Ahmednagar News: कोपरगाव डोक्यावर रिकामा हंडा घेऊन मुख्याधिकारी दालनासमोर आंदोलन

Ahmednagar News:  कोपरगाव शहराची तहान भागवणाऱ्या नगरपरिषदेच्या 5 नंबर साठवण तलावाचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी नगरपरिषदेत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या दालनासमोर रिकामा हंडा डोक्यावर घेऊन लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पाच नंबर साठवण तलावाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलावून काम थांबवण्याचे कारण विचारले असता नगर परिषदेने 2 कोटींचे बिल दिले नाही म्हणून काम थांबवले असे आश्चर्यकारक उत्तर दिले. यावर मुख्याधिकारी गोसावी यांनी लवकरच बिल अदा केले जाईल असे म्हटल्यानंतर उद्यापासून पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू करू असे ठेकेदाराने सांगितले. 

राज्यात आज 22 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

राज्यात आज 22 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज 45 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 79,88,156 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. 

मार्डच्या मागण्यांसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू 

मार्डच्या मागण्यांसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत डॉक्टरांची बैठक सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या बैठकीनंतर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम राहणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय. 

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात अडवून डॉक्टरांना मारहाण

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात अडवून डॉक्टरांना मारहाण करण्यात आलीय. जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आलीय. डॉ. शेख जमील शेख बशीर (वय 33 ) असं माहणार झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. रांजगाव येथून औरंगाबादकडे जातांना चार वाजण्याच्या दरम्यान 5 ते 6 जणांनी रस्त्यात गाडी अडवून लाकडी दांड्याने मारहाण केली.    

मायक्रोसॉफ्टने अमेरिकेच्या बाहेर शेतीचा कुठे करार केला नाही, तो बारामतीत केला : शरद पवार

मायक्रोसॉफ्टने अमेरिकेच्या बाहेर शेतीचा कुठे करार केला नाही, तो बारामतीत केला, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाल्या आहेत. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे निवासी डॉक्टरांना चर्चेसाठी निमंत्रण


मार्ड संपा संदर्भात संपकरी निवासी डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलंय. मार्ड निवासी डॉक्टरांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमोर ठेवणार आहे. 

बिहारबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत: सुप्रिया सुळे

बिहारबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. बिहारमधून अनेक अधिकारी झाले आहेत, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Palghar News: पालघर: बोईसर चिल्हार मार्गावर सूर्या नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Palghar News: बोईसर चिल्हार मार्गावर सूर्या नदीवरील पुलाच्या नूतनीकरणाचे काम करणाऱ्या एका कामगाराला विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शक्ती कुमार रॉय असे या 29 वर्षीय कामगाराचे नाव आहे. लोखंडी सळ्यांना महावितरणच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने हा अपघात घडला. 

Palghar News Update : पालघरमध्ये शॉक लागून कामगाराचा मृत्यू 

बोईसर चिल्हार मार्गावर सूर्या नदीवरील पुलाच्या नूतनीकरणाचं काम करणाऱ्या एका कामगाराला विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शक्ती कुमार रॉय अंस या 29 वर्षीय कामगाराचं नाव असून लोखंडी सळयांना महावितरण विभागाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर जखमी कामगाराला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आमदार लक्ष्मण जगताप यांचं अंत्यदर्शन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. लोकप्रिय नेता गमावला. बोलकं व्यक्तीमत्व होतं.  त्यांच्या जाण्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Washim News: अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ वाशिममध्ये भाजपचे आंदोलन

Washim News: विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद आता वाशिममध्ये उमटले. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला वाशिममधील भाजपच्या कार्यकर्त्यानी  काळे फासून आंदोलन केले.

पुण्यात गुन्हेगारांनी दहशत; पाच कार आणि एका टेंपोची तोडफोड

खडकवासला परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवित मुख्य रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच कार व एका टेंपोची तोडफोड केली आहे. दोन्ही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांची आरोग्य तपासणी, महात्मा फुले पोलीस ठाण्या अंतर्गत उपक्रम

आपण जेव्हा सणवार साजरे करत असतो तेव्हा आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस  कर्तव्य बजावत असतात. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.  नेमके हेच जाणून महात्मा फुले पोलिसांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

Amravati: पाण्यासाठी तिवसा नगरपंचायतवर महिलांची धडक, 13 दिवसापासून पाणी पुरवठा नाही

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहराला 13 दिवस होऊनही घरगुती नळाला पाणी पुरवठा होत नसल्याने आंनदवाडी आणि प्रभाग क्रमांक 9 येथील शेकडो महिलांनी नगरपंचायतवर धडक देत प्रशासना विरुद्ध घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Doctor Strike: वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांकडून निवासी डाॅक्टरांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रण

Doctor Strike: वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांकडून निवासी डाॅक्टरांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तोडगा न निघाल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवाही बंद करणार आहे.  विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचा सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू आहे. 

लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश

 चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

लक्ष्मण जगतापांचे पार्थिव राहत्या घरी पोहचले

भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांचे पार्थिव राहत्या घरी पोहचले आहेत. पिंपळे गुरव येथील चंद्ररंग बंगल्यात सहा वाजेपर्यंत अंत्यदर्शन होणार आहे.

अमरावतीमध्ये अखिल भारतीय मंगलमुखी किन्नर संमेलनाला सुरुवात, देशभरातून दोन हजारांहून अधिक किन्नर सहभागी

Amravati News : अमरावतीत अखिल भारतीय मंगलमुखी किन्नर संमेलन आजपासून सुरु झाले आहे. 3 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत अमरावतीच्या धर्मदाय कॉटन फंड याठिकाणी हा संमेलन होत आहे. कोरोनामुळे अनेकांना पोट कसं भरायचं असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यात किन्नरांचं संमेलन आयोजित केले गेले. आज तब्बल 50 वर्षानंतर प्रथमच अमरावतीत राष्ट्रीय किन्नर संमेलन होत आहे. या संमेलनात ज्यांना नोकऱ्या मिळत नाही, ज्या लोकांचे लग्न होत नाही, ज्यांना मुलं-बाळ होत नाही तसंच कोरोनापासून सगळ्यांची मुक्तता व्हावी यासाठी विशेष पूजा अर्चना केली जाईल. यावेळी काही प्रमुख पंच हे या संमेलनात महत्वाचे निर्णय घेतात. या संमेलनात हैदराबाद, दिल्ली, पंजाब, राजस्थानसह देशभरातून दोन हजाराच्यावर किन्नर सहभागी झाले असून विविध मुद्द्यावर या संमेलनात चर्चा होणार आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार असून 9 तारखेला भव्य कलश यात्रा अमरावती शहरातून निघणार आहे.

लक्ष्मण जगतापांच्या अंत्यदर्शनासाठी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार लक्ष्मण जगतापांच्या अंत्यदर्शनासाठी पिंपळे गुरव येथे येणार आहे. त्यानंतर ते आमदार मुक्ता टिळक यांच्या घरीदेखील हजेरी लावणार आहे. 

Hingoli News : महावितरण अधिकारी कर्मचारी 3 दिवसाच्या संपावर

Hingoli News : महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. तर पुढे तीन दिवसा हा संप आसाच सुरू राहणार आहे. खासगी करण्याच्या विरोधात हा संप आसनार आहे. महावितरणचे खासगी करण केले जाणार आसून अदानी कंपनीने समान वीज वितरणाच्या परवानगीची मागणी केली आहे आणि यासाठी सरकार सकारात्मक आहे तो परवाना कोणत्याही परिस्थितीत देऊ नये ही या संपाची प्रमुख मागणी आहे या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात 30 संघटनां सहभागी होणार आहेत दरम्यान या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची आसाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. 

ISC : भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Indian Science Congress News : भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नागपूरात आयोजित 108 व्या इंडियन सायंस कॉंग्रेसच्या उद्घाटन सोहळ्या ते बोलत होते. या सोहळ्यात पंतप्रधान व्हर्च्युअली सहभागी झाले होते.

Coronavirus Updates in India : देशात 132 नवे कोरोना रुग्ण

भारतात आज 132 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, असून सक्रिय रुग्णांची संख्या 2,582 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 5,30,707 इतकी झाली आहे. दरम्यान, चीनसह आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे देशही वाढत्या कोरोना संसर्गाच्या देशांच्या यादीत सामील झाले आहेत. 

Nagpur CBI Raids : वेर्स्टन कोल्ड फिल्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा

Nagpur CBI Raids : नागपूर- वेर्स्टन कोल्ड फिल्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा


उमरेड कोल्ड फिल्ड चे एरिया प्लॅनिंग ऑफिसर एमपी नवले यांच्या नागपूरच्या घरी व कार्यालयावर सीबीआयचा छापा 

पिंपरीचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन, कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी

Pune News:  भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. दुर्धर आजाराने ते ग्रस्त होते वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोलापुरातील काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Solapur News : माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू आणि काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अपहाराच्या पैशासाठी शिवीगाळ, दमदाटी करुन तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रेवणसिद्ध सोन्नद असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेवणसिद्ध सोन्नद याने 10 जुलै 2022 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र 12 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  मयत रेवणसिद्ध याच्याकडे वेळोवेळी ऐश्वर्या वॉटर प्लॅन्ट येथे अपहार केलेल्या पैशांची मागणी करून त्यास शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शंकर म्हेत्रे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून रेवणसिद्ध सोमनाथ याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli News : आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून रंगले राजकारण

Sangli News : आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून रंगले राजकारण


आष्टा शहरात 8 दिवसात दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीत बसवला


जिल्हा प्रशासनाकडून पुतळ्याच्या जागेला मंजुरी मिळत नसल्याने रात्रीत बसवला जातोय पुतळा


अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत आष्टा पालिकेत ठराव झाला,  जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी ही झाली होती मात्र अद्याप  जागेला मंजुरी मिळाली नसल्याने रात्रीत बसवला जातोय पुतळा


आधी २५ डिसेंबर रोजी ठाकरे गट-राष्ट्रवादी कडून तर काल रात्री भाजपकडून महाराजांचा पुतळा रात्रीत बसवला 


भाजपकडून रात्रीत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवल्यानें पुतळा ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

Yavatmal News : कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, 5 जणांना अटक

Yavatmal News : कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, 5 जणांना अटक करण्यात आली आहे. एक लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


यवतमाळच्या पाटण पोलिसांची कारवाई. पाटण जवळील कोडपाखंडी  जंगल परीसरात सुरू होता कोंडबाजार. 


अनिल तेजराव खडसे (37) रा. कोडपाखंडी ता.झरी, सचिन गोविंदराव वाचणं (36) रा.सुभाषनगर आदिलाबाद (तेलंगाना), गोपाल वसंता आत्राम (24) रा. कृष्णापूर ता. केळापूर, जिवन किरणसिंग चंदेल (24) रा. घोन्सी ता.केळापूर, शुभम किसन आश्राम (वय 28)रा. खडकडोह, पाच जण अटकेत. 

Pandharpur News : करमाळा-संगोबा रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

Pandharpur News : करमाळा तालुक्यातील संगोबा- करमाळा रस्त्यावर  रात्रीच्या सुमारास बर्निग कारचा थरार पहायला मिळाला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. डॉ. सुनीता दोशी यांचीही कार आहे.


धायखिंडी फाट्याजवळील सूळ वस्ती जवळ ही घटना घडली. परिसरातील ग्रामस्थांना माहिती समजताच घटनास्थळी दाखल झाले. आग वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी दाखल झाली होती. दरम्यान करमाळा पोलिस व काही डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले होते.

Bharat Jodo Yatra : दिल्लीतून आजपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात

Bharat Jodo Yatra : आज राजधानी दिल्लीतून पुन्हा भारत जोडो यात्रेला सुरुवात. यात्रा दिल्लीच्या मरघट हनुमान मंदिर, कश्मीरी गेटपासून सुरू होणार. 

Ratnagiri News : लोटेत कारखान्यांवर मंदीचे सावट

Ratnagiri News : मंदीचे सावट आल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्याना त्याचा फटका बसू लागला आहे. येथील कारखानदारांनी उत्पादित केलेल्या मालाला विदेशात मागणी नाही.त्यामुळे शेकडो कोटींची तयार उत्पादनपडून आहे. अनेक कारखानदारांनी आपले 50 टक्के प्रकल्प बंद केले आहेत. ही परिस्थिती आणखी अशीच राहिली तर कामगार कपातीचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Chiplun News : चिपळूणमधील महिलांकडून वाशिष्टी नदीला साडी अर्पण




Chiplun News : चिपळुणमध्ये चला जाणूया नदीला अभियानाला सुरुवात झाली आहे.नदीचे महत्व पटवून देत असतानाच नदीशी आपलं आगळवेगळ नात आहे नातं आहे याची जाणीव ठेवत चिपळूणमधील महिलांनी चिपळूण मधील वाशिष्टी नदीला साडी अर्पण केली.नदीचे महत्व जाणून घेऊन नदीचा अभ्यास करण्यासाठी चला जाणूया नदीला हा शासकीय उपक्रम आहे.या उपक्रमात चिपळूणमधील महिलांचाही लक्षवेधी सहभाग आहे.पुढील काही महिने नद्यांचा अभ्यास केला जाऊन याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.




Konkan News : कोकणातील रिफाईनरीला विरोध करण्यासाठी विरोधक पुढे सरसावले

Konkan News : कोकणातील रिफायनरी विरोध आणखीन तीव्र करण्यासाठी आता विरोधक पुढे सरसावले आहेत. आगामी काळात सरकारकडून माती परीक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षण केलं जाऊ शकतं. त्याला विरोध करण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी थेट  बार्शी आणि सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकले आहेत. त्यामुळे कोणताही प्रकारचा विरोध करावयाचा झाल्यास युवा आंदोलन करायचं झाल्यास या उभारलेल्या तंबूमध्येच रिफायनरी विरोधक आपलं आंदोलन करणार आहेत. त्याची तयारी त्यांनी आत्तापासूनच केली आहे. त्यामुळे कोकणात आता रिफायनरी विरोधक आणि सरकार पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात.

Ratnagiri News : थंडीची पुन्हा चाहूल गुहागर गारठले

Ratnagiri News : उत्तरेकडील शीतलहर यांनी कोकण भागातील तापमान खाली आलेला पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गारठा निर्माण झाला आहे.हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून ते कडाक्याची थंडी भरेपर्यंत जानेवारी महिना गारठण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.गुहागर मध्ये मोठ्या प्रमाणात थंडी सुरू झाली आहे.नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे.

भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन

भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री नरेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच सतत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असे यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा विषय आहे.  

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


नायगाव(खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात आज राज्यात ठिकठिकाणी आंदोनं करण्यात येणार आहेत. भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे.  यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. 


भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन


 भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री नरेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच सतत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असे यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा विषय आहे.  


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


नायगाव(खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे आठ वाजता दिंडीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आयोजित सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, अतुल सावे उपस्थिती लावणार आहेत.  


बारामतीत अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याकृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याकृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन होणार आहे. 3 ते 18 तारखेपर्यंत नवउद्योजकांसाठी (स्टार्ट अप) या प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले. कृषि प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी 19 ते 23 जानेवारी दरम्यान खुले असणार आहे. 170 एकरावरती याचे आयोजन करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा व डॉक्टर अजित जावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार उपस्थित राहतील.   


निवासी डॉक्टरांच्या संपाचा  दुसरा दिवस 


मार्ड निवासी डॉक्टरांचा संप सुरूच राहणार आहे. पंधरा दिवसात निवासी डॉक्टरांच्या मागण्याबाबत सकारात्मक पाऊलं उचलली जातील, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलेला असताना सुद्धा मार्ड निवासी डॉक्टरांचा संप सुरूच आहे. राज्यभरातील 7 हजार डॉक्टर या संपात सहभागी आहेत. 
 
अजित पवारांच्या विरोधात आंदोलन  
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विरोधात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. 


चेंबूर येथे भव्य मोर्चा
मुंबई मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पांजरपोळ चेंबूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. 


रत्नागिरीत अजित पवारांविरोधात आंदोलन


छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानाविरोधात भाजपकडून संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.याच कसब्यामध्ये छत्रपती संभाजी राजे यांना मुघलांचा सरदार मुकर्रबखान याने धोक्याने कैद केलं होतं. त्यामुळे भाजपच्या या आंदोलनाला महत्व असेल.  


मुंबईत अंगणवाडी सेविकांचे  आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन 
अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन होणार आहे. सावित्रीबाईंचा मुखवटा घालून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा धारण करून मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.