Maharashtra News Live Updates: मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 18 Oct 2024 12:00 PM
मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष

मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू


माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष


2019 मध्ये भाजपमध्ये बंडखोरी करत गीता जैन अपक्ष म्हणून गीता जैन निवडून आल्या


आता गीता जैन पुन्हा लढण्याच्या तयारीत


नरेंद्र मेहताही रिंगणात उतरण्याच्या तयारीत


नरेंद्र मेहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर भेटीसाठी

मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, तीन ते चार संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात 

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण.


तीन ते चार संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात. 


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू.


मुंबईच्या आसपासच्या परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती.

नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरवात, गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

- नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरवात

- , माजी स्थायी समिती सभापती आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  वाटेवर
-  
- मुंबईत आज जयंत पाटील आणि शरद पवारांची घेणार भेट

-  नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक
- -
-  नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे  विद्यमान आमदार

- भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर

नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरवात, गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार पक्षाच्या  वाटेवर

- नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरवात

- , माजी स्थायी समिती सभापती आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  वाटेवर
-  
- मुंबईत आज जयंत पाटील आणि शरद पवारांची घेणार भेट

-  नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक
- -
-  नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे  विद्यमान आमदार

- भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर

वर्ध्यात महिलेला उमेदवारी देण्याच्या मागणीला जोर, चारपैकी एका मतदारसंघात महिला उमेदवार देण्याची मागणी

वर्ध्यात महायुती मधील भारतीय जनता पक्षात उमेदवारी बाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. वर्ध्यातील चार पैकी एका जागेवर महिला उमेदवार देण्याच्या मागणीला जोर आला आहे. वर्धा आणि आर्वी या दोन मतदार संघात भाजपमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून महिला सक्षमपणे कार्य करीत राहिल्या आहे. महिलांनी वर्ध्याच्या राजकारणात स्वतःला सिद्ध देखील करून दाखविले आहे.भाजपने अद्याप वर्ध्यात उमेदवारी दिली नसल्याने खंत व्यक्त करण्यात आलीय. आर्वीतून भाजपच्या प्रदेश सरचिटणीस सरीता गाखरे तर वर्ध्यातून महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे या दोन सक्षम महिला उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा रंगते आहे. 2029 च्या 33 टक्के महिला आरक्षणाच्या घोषणेला 2024 मध्येच अंमलात आणण्याची मागणी आता होऊ लागली आहे. त्यामुळे आता वर्धा जिल्ह्यात भाजप महिलांना प्राधान्य देते काय याकडे लक्ष लागले आहेय.

महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आज पुन्हा दिल्लीत जाण्याची शक्यता, अमित शहा यांच्यासोबत जागावाटपावर चर्चा

महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आज पुन्हा दिल्लीत जाण्याची शक्यता



तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्या सोबत आज पुन्हा चर्चा होण्याची शक्यता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता


जागा वाटप आणि उमेदवार निवडी संदर्भात आज  दिल्लीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच, 250 पदाधिकाऱ्यांची सोडचिट्ठी

पुणे


पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी २५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम


पक्षाच्या विविध पदांवरुन राजीनामे देणाऱ्यांची संख्या आता ८५० वर


राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी मानकर यांची वर्णी लागावी, यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती


मात्र, मानकर यांना डावलण्यात आले, परिणामी पहिल्याच दिवशी ६०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले


आणखी २५० जणांनी राजीनामा दिला आहे

नाशिकमध्ये भाजपात अंतर्गत संघर्ष वाढला, सिमा हिरे यांच्याविरोधात इच्छुक उमेदवार एकवटले

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढला
-
आमदार सिमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार एकवटले
-
विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात इच्छुक उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत खलबते
-
सीमा हिरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना तिकीट न देण्याची मागणी
-
शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपात उमेदवारीवरून धुसफूस वाढली


प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, धनंजय बेळे, शशिकांत जाधव यांच्यासह अन्य इच्छुक बैठकीला उपस्थित
-
पुढील दोन ते तीन दिवसात उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने पक्षाच्या निर्णयांकडे लक्ष

मोठी बातमी! माजी आमदार राजन तेली भाजपला सोडचिठ्ठी देणार, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

सिंधुदुर्ग : माजी आमदार राजन तेली भाजपला सोडचिठ्ठी देत आज उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


त्याआधी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. 


यावेळी राजन तेली यांनी राणेंनी भाजपमध्ये आपलं खच्चीकरण केल्याचा आरोप केलाय.


राजन तेली यांना उबाठा शिवसेनेकडून सावंतवाडी संघाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

मो माजी आमदार राजन तेली भाजपला सोडचिठ्ठी देत आज उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सिंधुदुर्ग


माजी आमदार राजन तेली भाजपला सोडचिठ्ठी देत आज उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


त्याआधी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. 


यावेळी राजन तेली यांनी राणेंनी भाजपमध्ये आपलं खच्चीकरण केल्याचा आरोप केलाय.


राजन तेली यांना उबाठा शिवसेनेकडून सावंतवाडी संघाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

सिल्लोड भाजपा पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश, राबसाहेब दानवे यांना झटका

सिल्लोड भाजपा पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश.


भाजप प्रदेश सचिव आणि सोल्लोड सोयगाव मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख  सुरेश बनकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश.


रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक सुरेश बनकर जाणार ठाकरे सेनेत.


दुपारी दोन वाजता करणार प्रवेश. सिल्लोड सोयगाव मतदार संघातील अनेक पदाधिकारी देखील करणार प्रवेश..

वंचित बहुजन आघाडीची आज पत्रकार परिषद, नेमकी काय घोषणा करणार?

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यातील प्रमुख पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. दुसरीकडे बैठकांना वेग आला आहे. तिकीट मिळावे म्हणून नेते आपापल्या पद्धतीन शक्तिप्रदर्शन करत आहेत. सोबतच राज्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा इत्यंभूत आढावा, वाचा एका क्लिकवर..   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.