Maharashtra News Live Updates: ठाण्यात मनसे चारही मतदार संघात निवडणूक लढणार, एक मोठा नेता इच्छुक - सूत्रांची माहिती

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

ज्योती देवरे Last Updated: 17 Oct 2024 04:11 PM
Raigad - महाडमध्ये वीस महिन्यांत महाडमधील खासगी रुग्णालयात 1 हजार 169 सिझर पद्धतीने प्रसुती..संबधितांना कारणे दाखवा नोटीस...

Raigad - महाडमध्ये वीस महिन्यांत महाडमधील खासगी रुग्णालयात १ हजार १६९ सिजर...

आरोग्य विभागाकडून दखल; संबधित दवाखाण्यांना कारणे दाखवा नोटीस...

महाडमधील खासगी रुग्णालयांत १,१६९ सीजर २० महिन्यांत झाल्याचे समोर आलंय  

प्रस्तूतीसाठी गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक कारणे देऊन रुग्णाच्या नातेवाइकांना घाबरवले जाते.

काही ठिकाणी तीस हजार तर काही ठिकाणी साठ हजारांपेक्षा अधिक रक्कम उकळली

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान पुन्हा एकदा पोलिस आयुक्तांच्या भेटीला

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान पुन्हा एकदा पोलिस आयुक्तांच्या भेटीला

काल सहपोलिस आयुक्तांची भेट घेऊन जिशानने तपासाबाबत माहिती जाणून घेतली होती

तसेच काही मुद्देही पोलिसांना सांगितले होते

आज पून्हा जिशान सिद्धीकी पोलिस आयुक्तालयात दाखल

Nagpur : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस विरोधात निवडणूक लढविण्यासाठी चॅलेंज...

Nagpur : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस विरोधात निवडणूक लढविण्यासाठी चॅलेंज...

भाजप आमदार परिणय फुके याचं देशमुखांना चॅलेंज 

मर्द असाल तर देवेंद्र फडणवीस विरोधात निवडणूक लढवून दाखवा...

अनिल देशमुख यांची दक्षिण पश्चिम मतदार निवडणूक लढवण्याची औकात नाही, लढायच असेल तर लढून दाखवा फालतू भूलथापा देऊ नका..

Vidhan Sabha Election 2024: ठाण्यात मनसे चारही मतदार संघात निवडणूक लढणार, एक मोठा नेता इच्छुक - सूत्रांची माहिती

Vidhan Sabha Election 2024: ठाण्यात मनसे चारही मतदार संघात लढणार, सूत्रांची माहिती

मनसेची निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण 

महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील मनसे उमेदवार देणार, एक मोठा ठाण्यातील नेता लढण्यासाठी इच्छुक 

तर ठाणे शहर मतदार संघात भाजपच्या संजय केळकर, ओवळा माजिवडा मतदार संघात सेनेच्या प्रताप सरनाईक आणि कळवा मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मनसे निवडणूक लढवणार 

अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार मात्र स्थानिक पातळीवर चारही जागा लढण्याची तयारी

Kolhapur : शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही.. - कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Kolhapur : शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही.. - कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांची शेतकऱ्यांना ग्वाही.....
          
संपर्क दौऱ्यात असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी एकोंडी ता. कागल येथील शेतकऱ्यांनी थांबवली....
        
गाडीतून उतरत मंत्री मुश्रीफ यांनीही केली शेतकऱ्यांशी चर्चा.....
          
मी शेतकऱ्यांसोबतच आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्यास आमदारकीचाही राजीनामा देऊ

हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केली भूमिका
          
"शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे" या घोषणांनी परिसर दणाणला.....

Vidhan Sabha Election 2024: मावळमध्ये अजित पवार गटात फूट? महायुती मध्येच रस्सीखेच

Vidhan Sabha Election 2024: मावळमध्ये अजित पवार गटात फूट? 

-अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारले 

-मावळ विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारी वरून रस्सीखेच पहायला मिळत आहे.

सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुती मध्येच रस्सीखेच दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको. तर मावळ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असून,

पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली आहे.

Sanjay Raut: संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच प्रकरण, आजची सुनावणी तहकूब

Sanjay Raut: संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच प्रकरण.

माझगाव कोर्टातली आजची सुनावणी तहकूब.

न्यायाधीश सुट्टीवर असल्याने आज सुनावणी होणार नाही.

Vidhan Sabha Election 2024 - चांदवड - देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर विधानसभा निवडणुकीतून माघार

Vidhan Sabha Election 2024 - चांदवड - देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर विधानसभा निवडणुकीतून माघार...
-  केदानाना आहेर यांना चांदवड - देवळा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी...
- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आ.आहेर यांनी केली मागणी.. वरिष्ठांकडूनही या निर्णयाला संमती..
- चांदवड येथील पत्रकार परिषदेत केली घोषणा..
- केदानाना आहेर यांनी दोनवेळा माझ्यासाठी चांदवड विधानसभेत ' त्याग ' केला होता..
- कुटुंबात कलह भाऊबंदकी निर्माण होवू नये म्हणून घेतला निर्णय...
- आमचे देवेंद्र फडणवीस आदर्श आहेत, त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यागले..आम्ही भावासाठी आमदारकी त्यागली....
- मी कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी करणार नाही : आ.राहुल आहेर

Yavatmal: डिजेच्या आवाजाने युवकाचा मृत्यू; पुसद येथील घटना

Yavatmal: डिजेच्या आवाजाने युवकाचा मृत्यू; पुसद येथील घटना

यवतमाळच्या पूसद येथील महावीर नगर मधील  27 वर्षीय युवकाचा दुर्गा विसर्जन मिरवणुकीत अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घडली आहे.

गणेश माणिक इंगोले असे मृत यवकाचे नाव आहे. 

Vidhan Sabha Election 2024 : सुमार कामगिरीमुळे मुंबईत भाजप भाकरी फिरवणार, काही जुन्या नेत्यांचे विधानसभेत करणार पुनर्वसन

Vidhan Sabha Election 2024 : सुमार कामगिरीमुळे मुंबईत भाजप भाकरी फिरवणार

काही जुन्या नेत्यांचे विधानसभेत करणार पुनर्वसन

वर्सोव्यात भारती लव्हेकरांऐवजी संजय पाण्डेय यांच्या नावाला पसंती

घाटकोपर पश्चिममध्ये राम कदमांचा पत्ता कट होणार

सायनमध्ये तमील सेल्व्हन ऐवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा

घाटकोपर पूर्वमध्ये पराग शाह यांच्याजागी प्रकाश मेहतांचे पुनर्वसन होणार

बोरिवलीत सुनिल राणेंच्या जागी गोपाळ शेट्टींच्या नावाची चर्चा

Vidhan Sabha Election 2024: भाजपाचे विद्यमान आमदार रेड झोन मध्ये? 'या' आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता

Vidhan Sabha Election 2024: भाजपाचे विद्यमान आमदार रेड झोन मध्ये? 'या' आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता…. 

वर्सोवा - भारती लव्हेकर 

घाटकोपर पश्चिम - राम कदम 

सायन - तमील सेलव्हन 

घाटकोपर  पूर्व - पराग शाहा  

बोरिवली -  सुनिल राणे

Vidhan Sabha 2024: नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद वाढण्याची शक्यता

Vidhan Sabha 2024: महायुतीत नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून वाद वाढण्याची शक्यता

समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नांदगाव विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती

महायुतीत सध्या ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे

सुहास कांदे सेनेचे सध्या विद्यमान आमदार

राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ विधानपरिषदेवर गेल्यावर समीर भुजबळ माघार घेतील अशी चर्चा होती

समीर भुजबळ यांनी मात्र माघार न घेता पक्षाकडे नांदगाव विधानसभेची जागा घ्यावी अशी विनंती केल्याची सूत्रांची माहिती

Vidhan Sabha Election 2024: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज इचलकरंजीमध्ये मेळावा, प्रकाश आणि राहुल आवाडे यांना निमंत्रण नाही

Vidhan Sabha Election 2024: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज इचलकरंजीमध्ये मेळावा

इचलकरंजीमधील भाजप  आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे मनोमिलन नाही

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांना मेळाव्याचे निमंत्रण नाही

भाजप पक्ष प्रवेश करून महिना उलटला तरी आवाडे  यांचे भाजप कार्यालयात स्वागत नाही

Vidhan Sabha Election: आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, सूत्रांची माहिती

Vidhan Sabha Election: आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार नाही

झारखंडमधे देखील आप निवडणूक लढवणार नाही

*आप दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवर करणार लक्ष केंद्रीत

सूत्रांची माहिती

Delhi: दिल्लीत संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीबाबत भाजपची मोठी बैठक

Delhi: दिल्लीत संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीबाबत भाजपची मोठी बैठक.
येत्या 21 ऑक्टोबर रोजी भाजप मुख्यालय विस्तारित इमारत येथे बैठक होणार आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
 बैठकीत केंद्रीय निवडणूक अधिकारी व सहकारी अधिकारी, 
 राज्य निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकारी,
 राष्ट्रीय अधिकारी,
 प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस संघटना,
 राज्य प्रभारी आणि सहप्रभारी यांचा समावेश असेल.
बैठकीत संघटनेच्या निवडणुकीबाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
सदस्यत्व मोहिमेचाही आढावा घेतला जाईल.

Pune : पुण्यातील तिहेरी हत्याकांड,  सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेची निर्दोष मुक्तता दिली

pune : *2012 पुण्यातील तिहेरी हत्याकांड 
सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेची निर्दोष मुक्तता केली*

सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता.न्यायमूर्ती बी.आर.गवई म्हणाले की, हा परिस्थितीजन्य पुराव्याचा विषय आहे.

Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या स्क्रिंग कमेटीमध्ये 84 नावावर चर्चा झाली, त्यातील 53 नावे निश्चित

Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या स्क्रिंग कमेटीमध्ये 84 नावावर चर्चा झाली …

त्यातील ५३ नावे निश्चित करण्यात आली असून ती अंतिम मंजुरीसाठी काँग्रेस वर्किंग कमेटीकडे पाठवण्यात आली 

२० ऑक्टोबरला काँग्रेस वर्किंग कमेटीची बैठक आहे. त्या बैठकीत या ५३ नावांना मंजुरी दिली जाईल.

Lonavala: आत्महत्येपूर्वी दोन सेकंदाचा सेल्फी व्हिडीओ काढला, अन् तरुणाची उडी मारून आत्महत्या

Lonavala: आत्महत्येपूर्वी दोन सेकंदाचा सेल्फी व्हिडीओ काढला, अन् तरुणाची उडी मारून आत्महत्या

लोणावळ्यातील वाघजाई दरीत चाकणच्या एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती,

तत्पूर्वी आत्महत्या करत असलेल्या घटनास्थळी दोन सेकंदाचा सेल्फी व्हिडीओ काढला होता.

त्याच व्हिडिओच्या आधारे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं.

मुलगा हरवल्याची तक्रार त्याच्या पालकांनी स्थानिक चाकण पोलीस स्टेशनला केली होती,

सूर्यकांत प्रजापती वय 27 वर्षे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचें नाव आहे..

9 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेला होता, व त्याने थेट लोणावळा गाठले,

पोलिसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून शोध घेतला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे वाघजाई दरी परिसर आढळून आले होते,  

त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू असताना सूर्यकांत प्रजापती याचा मृतदेह हा  लोणावळा शहर पोलीस, खोपोलीतील अपघातग्रस्तांची संस्था तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमला मिळून आला

Latur: लातूर हादरले, शहरातील दयानंद गेट जवळ रहदारीच्या रस्त्यावरच करण्यात आला खून, व्यक्तीचा जागीच मृत्यू

Latur: लातूर हादरले, शहरातील दयानंद गेट जवळ कत्तीचा वार करत करण्यात आला खून... रहदारीच्या रस्त्यावरच करण्यात आला खून...

अतिशय शुल्लक कारणावरून झालेल्या बाचबाचीचे रूपांतर खुनात झाला आहे.

शिवाजी देवकर या 38 वर्षीय व्यक्तीचे काही दिवसापूर्वी शुल्लक कारणावरून काही लोकांबरोबर बचावाची झाली होती.

तो राग मनात धरून आज सकाळी साडेनऊ वाजता शिवाजी देवकर या व्यक्तीचा खून करण्यात आला आहे.

शहरातील मुख्य ठिकाण असलेले दयानंद गेट परिसरात हा खून झाल्याने लातूर शहर हादरून गेलाय..

दिवसा ढवळ्या वरदळीच्या ठिकाणी दोन तरुण हातात कत्ती घेऊन येतात आणि काही कळायच्या आज एका व्यक्तीच्या गळ्यावर कत्तीचा वार करण्यात येतो.

या हाणामारीत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Nashik - नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जणांवर कारवाईला सुरवात, मुलगा-मुलगी अदलाबदली केल्याचा आरोप

Nashik - नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जणांवर कारवाईला सुरवात
- ४ मुख्य डॉकटर ३ शिकाऊ डॉक्टर १ परिचारिका यांच्यावर होणार कारवाई
- जिल्हा रुग्णालयात जन्मलेला अपत्य मुलगा की मुलगी यावरून झाला होता वाद 
- जन्मला मुलगा आला आणि डिस्चार्ज देताना मुलगी दिल्याचा कुटुंबीयांनी केला होता आरोप
- सर्व कागदपत्रांवर मुलाच्याच नावाने करण्यात आल्या होत्या

- या सगळ्या प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून नेमण्यात आली होती समिती 
- समितीकडून प्राप्त अहवालानुसार  आठ  जण दोषी आढळले
मुलगी च्या ऐवजी मुलगा नोंद करण्यात आल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा

Vidhan Sabha Election 2024: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 45 ते 50 जागा मिळणार या चर्चेत तथ्य नाही' - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याची माहिती

Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 45 ते 50 जागा मिळणार या चर्चेत तथ्य नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याची एबीपी माझाला माहिती

महायुती मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ६० पेक्षा जास्त जागा

पक्षाचे ६० विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाले असून उरलेल्या काही उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब होणार

बुधवारी अजित पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक पार पडली, याच बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक पार पडल्यानंतर पक्षाकडून तत्काळ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार - सूत्रांची माहिती

Nirmala Gavit: माजी आमदार निर्मला गावीत काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Nirmala Gavit: काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार निर्मला गावीत काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत
-

निर्मला गावित यांनी 2019 च्या निवडणूक पूर्वी काँग्रेस मधून शिवसेनेत केला होता प्रवेश, निर्मला गावीत सध्या उबाठा गटात
-

निर्मला गावीत यांच्यां प्रवेशासाठी आपल्यावर अन्याय करण्यात आल्याचा हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता आरोप

Vidhan Sabha Election: समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार, शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार

Vidhan Sabha Election: समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार, शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार

विधानसभा निवडणुकीत हाय प्रोफाईल अधिकाऱ्याची एन्ट्री, विधानसभा निवडणूक लढवणार.

IRS अधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत.

आयआरएस अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार.

महायुतीकडूनही निवडणूक लढवणार.

मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे.

Pune: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची 85 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Pune: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची 85 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त. 

मंगलदास बांदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवार यांचा बांधल यांनी  केला होता प्रचार 

बांदल यांची पुणे,सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यात असलेली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती.

मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते.त्यावेळी बांदल याना अटक केली होती.

ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली.बांदल यांच्या बंँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली.

Dharashiv: तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंद

Dharashiv: तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंद

 जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने गुन्हा नोंद 

सायबर पोलिसात गुन्हा नोंद करुन तो तुळजापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग

बोगस मतदार नोंदणी रॅकेटच्या मास्टर माईंड कोण ? 

मतदार नोंदणी  अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान

भारत निवडणुक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन नावाचे मोबाईल ॲपव्दारे लॉग ईन करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून भारत निवडणुक आयोगाची फसवणुक 

मतदान नोंदणीसाठी फॉर्म 6 भरताना  स्थानिक नागरिक असल्याचे जोडलेले पुरावे बोगस

Pune: आज संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा  बंद राहणार, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून माहिती

Pune: आज संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा  बंद राहणार

पुण्यातील सर्व जलकेंद्रतील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक दुरूस्तीची कामे 

संपुर्ण शहराला उद्या उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग या ठिकाणी दुरुस्तीचे कामं

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली माहिती

Mumbai : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत रिया पॅलेस इमारतीमध्ये काल लागलेली आगीवर पोलिसांना आणि अग्निशमन दलाचा अधिकारीला संशय

Mumbai : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत रिया पॅलेस इमारतीमध्ये काल लागलेली आगीवर पोलिसांना आणि अग्निशमन दलाचा अधिकारीला संशय...

रिया पॅलेस इमारतीच्या दाहवा मजल्यावर एका घरामध्ये काल सकाळी 7:30 च्या सुमारास ही आग लागली होती,या आगी मध्ये दोन सिनिअर सिटीजन तर एक नोकर यांची आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाली होती...

या आगीचा तपास करताना ओशिवरा पोलिसांना आणि अग्निशमन दलाचा अधिकारीला संशय निर्माण झाला आहे..

ही आग लावली गेली होती असा संशय पोलिसांना निर्माण झाला आहे. त्यामुळे ही आग लागली होती या लावली गेली होती या संदर्भात अधिक तपास ओशिवरा पोलीस करत आहे...

Miss India 2024: निकिता पोरवाल यंदाची फेमिना मिस इंडिया 2024, रेखा पांडे फर्स्ट रनर अप तर आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप

Miss India 2024: निकिता पोरवाल यंदाची फेमिना मिस इंडिया 2024 बनली.

मूळची मध्य प्रदेशातील उज्जैनची असलेल्या निकिताने 'मिस मध्य प्रदेश'चा किताबही पटकावला आहे.

निकिता ही एक अभिनेत्री आहे जी वयाच्या 18 व्या वर्षापासून काम करत आहे

तिने टीव्ही अँकर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

निकिताने आत्तापर्यंत 60 हून अधिक नाटकांमध्ये काम केले असून अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखविल्या गेलेल्या

लवकरच भारतात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातही काम केले आहे.

फेमिना मिस इंडियामध्ये रेखा पांडे फर्स्ट रनर अप तर आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली. फेमिना मिस इंडिया 2024 हा कार्यक्रम 16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील महालक्ष्मी येथील प्रसिद्ध स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

Dhananjay Munde: पुणे-सोलापूर महामार्गावर धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात

Dhananjay Munde: पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे पहाटे ४:३० वाजता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

अपघातात त्यांच्या कारची जोरदार धडक एका ट्रॅव्हल बससोबत झाली. सुदैवाने, जयश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

ही दुर्घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, जेथे महामार्गावर कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. 

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे अपघात गंभीर झाला. 

घटनास्थळी तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

Dharashiv: सिमोल्लंघनानंतरच्या श्रम निद्रेनंतर आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान 

Dharashiv: सिमोल्लंघनानंतरच्या श्रम निद्रेनंतर आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान 

अश्विनी पोर्णिमेनिमित्त पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना -

Anchor:महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची अश्विन पौर्णिमेनिमित्त पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.  

आज दुपारी सोलापुरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे शहरात आगमण होणार आहे तर रात्री उशीरा सोलापूरच्या काठ्यासह मिरवणूक अश्विनी पोर्णिमेची सांगता होणार आहे.

सिमोल्लंघनांतर रवीवारी तुळजाभवानी माता श्रम निद्रेसाठी पलंगावर विसावली होती आज पहाटे देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान झाली आहे

दरम्यान अश्विनी पोर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर आज दाखल होत आहेत.

Chiplun: परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, उर्वरित संरक्षक भिंतही कोसळण्याच्या स्थितीत

Chiplun: परशुराम घाट संरक्षक भिंत कोसळली

संरक्षक भिंतीचा आणखी एक भाग कोसळला

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील

मातीची मोठी धूळ

महामार्गाचा काँक्रीटचा रस्ता केव्हाही कोसळण्याचा धोका

महामार्गावरील एक लाईन बंद असले तरी दुसऱ्या लाईनलाही धोका निर्माण होण्याची शक्यता

उर्वरित संरक्षक भिंतही कोसळण्याच्या स्थितीत

Jalna: मध्यरात्री भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली

Jalna: मध्यरात्री भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली...

दोघांमध्ये अंतरवाली सराटीत तासभर चर्चा ..

आठ दिवसात विखे पाटलांनी जरांगे यांची दुसऱ्यांदा भेट ...

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर विखे पाटलांची पुन्हा एकदा भेट.

मध्यरात्री पावणे दोन वाजता विखे पाटील यांनी भेट घेतली या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली .

Washim: समृद्धी महामार्गावर चालकला डुलकी लागल्याने कारची ट्रकला मागून धडक, एक जण जागीच ठार...

Washim: समृद्धी महामार्गावर चालकला डुलकी लागल्याने कारची ट्रकला मागून धडक, एक जण जागीच ठार...

समृद्धी महामार्ग कारंजाच्या  वालाई गावाजवळ नागपूर  वरून  लोणार इथं जाणाऱ्या इर्टीगा गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला।लोकेशन 182  वर ही घटना घडली...

 बळीराम  पिसे   अस मृतकाच नाव असून सुदैवाने गाडीत इतर प्रवासी नसल्याने मृताचा आकडा कमी राहिला..

Nashik: आंतरजातीय विवाह केल्यानं गर्भवती मुलीची हत्या करणाऱ्या पित्याला 20 वर्ष कारावासाची शिक्षा, अनिस कडून निर्णयाचे स्वागत

Nashik: आंतरजातीय विवाह केल्यानं गर्भवती मुलीची हत्या करणाऱ्या पित्याला 20 वर्ष कारावासाची शिक्षा
-
एकनाथ कुंभारकर याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावली शिक्षा

2013 मध्ये जातपंचायतच्या दबावामुळे ऑनर कीलिंगची घटना नाशिकमधे उघडकीस आली होती
-
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाने यां घटनेचा पाठपुरावा केला होता
-
मुलीची हत्त्या करणाऱ्या एकनाथ कुंभारकर ला जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती

-
सर्वोच्च न्यायालयाने मात्र 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे
-
अनिस कडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे

Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा विभागाची विशेष बैठक

Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा विभागाची विशेष बैठक

अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा फेर आढावा घेण्यात आला.

बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेमध्ये काही चूक झाली होती का? याचीही तपासणी सुरू आहे.

तसेच सिद्दीकी यांची हत्या, तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेरआढावा घेण्याचे काम सुरू आहे.

यावेळी पोलीस सुरक्षा रक्षकांनी त्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.

अनेक वेळा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षा रक्षकांच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्याच सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

 बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

Wardha : वर्ध्यात महायुतीकडून देवळी विधानसभेच्या उमेदवारीवर भाजपचा दावा, जागा कुणाला सुटणार

Wardha : वर्ध्यात महायुतीकडून देवळी विधानसभेच्या उमेदवारीवर भाजपचा दावा 

भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यापैकी जागा कुणाला सुटणार

वर्ध्याच्या देवळी मतदार संघात महायुतीमध्ये जागा कुणाच्या वाट्याला जाणार यावर चर्चा सुरू असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी युतीमध्ये देवळी येथून लढण्याची तयारी केली आहे.

महायुतीमध्ये देवळी मतदार संघाची उमेदवारी शीवसेना एकनाथ शिंदे गटाने देखील मागितली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडून  देवळीवर  दावा करण्यात  आला होता. तर आता भाजपकडून राजेश बकाने यांनी जोरदार तयारी चालविली आहे.

त्यामुळे उमेदवारी साठी अशोक शिंदे आणि राजेश बकाने यांच्यात रस्सीखेच दिसून येत आहे.

पाच रेझिम आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या रणजित कांबळे यांना टक्कर देण्यासाठी भाजप सज्ज झाली असल्याचे चित्र सध्या देवळीमध्ये असताना नेमकी उमेदवारी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai: वरळीतील बीडीडी चाळीत विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचे बॅनर, काय आहे कारण?

Mumbai: वरळीतील बीडीडी चाळीत विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचे बॅनर 

घरासंदर्भात दिलेलं आश्वासन राज्य सरकार आणि म्हाडानं पूर्ण न केल्याचा आरोप 

कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी किंवा मतं मागण्यासाठी इमारतीत येऊ नये असा बॅनरवर उल्लेख

Solapur: सोलापूर शहरातील तीन पैकी दोन मतदारसंघात महिलाराज, पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त..

Solapur: सोलापूर शहरातील तीन पैकी दोन मतदारसंघात महिलाराज,

दोन मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त..

शहरातील शहर उत्तर मतदार संघ, शहर मध्य मतदार संघात लाडक्या बहिणींची संख्या मोठी .

सोलापूर शहर उत्तर मतदार संघात पुरुषांपेक्षा 3133 तर शहर मध्य मतदारसंघात पुरुषांपेक्षा 5260 महिला मतदारांची संख्या..

जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण 38 लाख 13 हजार 688 मतदार 

त्यापैकी 18 लाख 56 हजार 932 महिला मतदारांची संख्या तर 19 लाख 56 हजार 450 पुरुष मतदार

Nagpur - नागपूर जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना क्लीन चीट देणाऱ्या निर्णयास सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान 

Nagpur - नागपूर जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना क्लीन चीट देणाऱ्या निर्णयास सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान 

- नागपूर खंडपीठाने रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र संदर्भातील प्रकरणात क्लीन चीट दिल्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे..

- सरकारतर्फे याचिकेत उच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकतर्फी अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे, यावर उदया सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गुरूनेल सिंगच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गुरूनेल सिंग याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

हरियाणाच्या कत्तर जेलमध्येच गुरूनेल हा आरोपी जिशान अख्तरच्या संपर्कात आल्यानंतर त्याने भारतात न राहण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

त्यावेळी जिशान अख्तरने त्याला परदेशात पाठवण्याचे आश्वासनही दिले होते. याच दरम्यान जिशान अख्तरने गुरूनेलला या हत्येच्या कटात सहभागी करून घेतले

तसेच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट यशस्वी झाल्यानंतर आरोपी जिशान अख्तरने गुरूनेलला परदेशात पाठवण्यात येईल असे सांगितले होते

मात्र घडलं नेमकं उलटं बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर गुरूनेल हा पोलिसांच्या हाती लागला. मात्र शुभम आणि जिशान अख्तर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात बोगस मतदार नोंदणीच मोठं रॅकेट? कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या नावे बोगस नाव नोंदणी

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात बोगस मतदार नोंदणीच मोठं रॅकेट?

जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस नोंदणी अर्ज केल्याचा प्रकार समोर

 नोंदणी पद्धतीमध्ये साम्य त्यामुळे बोगस नोंदणीच मोठ रॅकेट असण्याची शक्यता

कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या नावे बोगस नाव नोंदणीचा प्रकार 

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ ) गावात आढळली बोगस मतदान नोंदणी

आरोही उमेश सगाटे, नीलिमा शेखर रबाळे, शैलेश किशोर सालगे, तुषार पंकज इनागटे यांच्या नावाने नोंदणी 

अर्ज भरताना जोडण्यात आलेल्या आधार कार्डचा एनरोलमेंट नंबर आणि वेळ एकसारखी

जिल्ह्यातील इतर गावातही बोगस नोंदणी असल्याची शक्यता

जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Vidhan Sabha Election: वसमत विधानसभेत महायुतीत उमेदवारीवरून चढाओढ, राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचा दावा 

Vidhan Sabha Election : वसमत विधानसभेत महायुतीत उमेदवारीवरून चढाओढ 

 राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचा दावा 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा कायम असताना वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत उमेदवारीवरून चांगली चढाओढ पाहायला मिळत आहे.

वसमत विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे हे करत आहेत  महायुतीमध्ये याच वसमत विधानसभा मतदारसंघावर आता शिवसेना पाठोपाठ भाजपने सुद्धा दावा केला आहे.

शिवसेनेकडून ही निवडणूक लढण्यासाठी राजू चापके हे इच्छुक आहेत तर भाजपकडून मिलिंद यंबल  सुद्धा ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळते आहे आमदार नवघरे यांनी लोकसभा निवडणुकीत  महायुतीचा धर्म पाळला नाही असा नाव न घेता आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही लढणार आहोत अशी प्रतिक्रिया भाजपच्या मिलिंद यंबल यांनी दिली आहे  तर आमदार नवघरे यांना हिंदुत्ववादी मतदान वळवणे कदापि शक्य होणार नाही याशिवाय वसमत विधानसभा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा मतदार संघ आहे त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा वसमतच्या जागेवर आग्रही आहेत

त्यामुळे वसमत विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे प्रतिक्रिया राजू चापके यांनी दिली आहे त्यामुळे आमदार नवघरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.