Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर..

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 May 2024 02:41 PM
Dombivali : डोंबिवलीत नागरीकांच्या घरावर डल्ला मारुन उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला

Dombivali : डोंबिवलीत नागरीकांच्या घरावर डल्ला मारुन उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला
पोलिसांनी केली दोन चोरट्यांना अटक 
२३ लाखाचा ऐवज हस्तगत 
२४ गुन्हयांची उकल

Kalyan : दिल्लीत रॅपिडो चालविणारा कल्याणमध्ये चालवित होता नकली नोटा, तरुणाला अटक ,

Kalyan : दिल्लीत रॅपिडो चालविणारा कल्याणमध्ये चालवित होता नकली नोटा, तरुणाला अटक ,


कल्याण पोलिस आणि एनआयएने सुरु केला तपास


किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका  तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


अंकुश सिंह या नावाच्या तरुणाकडून 13 हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या.


त्यात १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे.


अंकुश सिंह हा दिल्लीचा राहणारा आहे.


तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवितो. त्याला या नकली नोटा बाजारात चालविण्यात दिल्या होत्या. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Kolahpur : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू 

Kolahpur : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू 


सुळे गावातील तिघांचा गजरगाव बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू


धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य आले होते नदीकाठी 


उदय बचाराम कटाळे 
अरुण बचाराम कटाळे 
प्रकाश अरुण कटाळे यांचा बुडून मृत्यू

Ratnagiri : रत्नागिरीत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत 

Ratnagiri : रत्नागिरी - उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल 


सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत 


सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल


 कार्यकर्त्यांचा किरण सामंत यांना  संपर्क साधण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी

Rohit Pawar : अनेक तक्रारी या बारामती विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. - रोहित पवार 

Rohit Pawar : रोहित पवार पत्रकार परिषद 


बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात 155 संवेदनशील बूथ आहेत - रोहित पवार 


250 तक्रारी आल्या आहेत.- रोहित पवार 


18 तक्रारी पैसे वाटल्याचे आले आहेत..- रोहित पवार 


बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न वेल्हे येथे झाला आहे- रोहित पवार 


अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी आहेत...- रोहित पवार 


लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे...- रोहित पवार 


जे लोक भेटतात ते सांगतात आम्ही गुंडा गर्दी दडपशाही आणि आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जायचं नाही...- रोहित पवार 


आम्ही प्रामाणिक विचाराच्या बाजूने आहोत - रोहित पवार 


गोड बातमी चार जून ला आहेत- रोहित पवार 


अनेक तक्रारी या बारामती विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. - रोहित पवार 


अजित दादांनी पूर्ण लक्ष फक्त बारामती विधानसभा मतदारसंघावर ठेवला आहे.- रोहित पवार 

Sanjay Raut : आमचे फोन फडणवीस टॅप करत होते, हा सर्वात मोठा अपराध आहे - संजय राऊत

Sanjay Raut : कोळी बांधवांसारख्या भूमिपुत्रांचा हा अपमान आहे - संजय राऊत


नाकातले केस गळत असतील तर गुजरातला जाऊन लढा - संजय राऊत


महाराष्ट्रात त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार नाही - संजय राऊत


हेमंत करकरे, अशोक कामटे यांच्यासह 20 पोलिस अधिकारी कर्मचारी शहिद झाले - संजय राऊत


कोणालाही यासंदर्भात दुमत वाटण्याचे कारण नाही - संजय राऊत


हा वाद तेव्हा संघ परिवाराने निर्माण केला होता तुम्ही त्यांना जाऊन विचारा - संजय राऊत


मुख्यमंत्री शिंदे फडणवीस यांचे कोणते गुन्हे लपवत आहेत - संजय राऊत


आमचे फोन फडणवीस टॅप करत होते, हा सर्वात मोठा अपराध आहे - संजय राऊत

Shirdi : वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

Shirdi : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.


या हल्ल्यात गाडीच्या  समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे.


झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले.


शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झालं असल्याचे बोलले जाते.


प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे.


उत्कर्षा रूपवते यांचे कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन - 


रात्री अकोले राजूर ( जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली.


मी सुखरूप असून या क्षणी  राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे.


कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा.


आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,


आपण तिकडे भेटुयात असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Devendra Fadnavis : विजय वडेट्टीवार नेमके कोणाला भेटून आले ते पाकिस्तानची भाषा करत आहेत - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : विजय वडेट्टीवार नेमके कोणाला भेटून आले ते पाकिस्तानची भाषा करत आहेत - देवेंद्र फडणवीस 


शशी थरूर नेमकी कोणाची कारवाई करा म्हणाले विजय वडेट्टीवार  यांची का? - देवेंद्र फडणवीस 


 मात्र या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का?- देवेंद्र फडणवीस 


 ते यावर गप्प का आहेत ? पाकिस्तान धार्जिण्या या त्यांच्या सहकार्याची ते सहमत आहेत का ?- देवेंद्र फडणवीस 


 काही मतांच्या लांगूनचालनासाठी उद्धव ठाकरे शांत आहेत का??- देवेंद्र फडणवीस 


 उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- देवेंद्र फडणवीस 

Nashik - धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे छगन भुजबळांच्या भेटीला 

Nashik - धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे छगन भुजबळांच्या भेटीला 
- भुजबळ फार्म येथे सुभाष भामरे पोहचले 
- धुळे लोकसभा मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदार संघ 
- भुजबळांसह ओबीसी समाजाची धुळ्यात मोठी ताकद 
- मतदार संघात अनेक ठिकाणी भामरेंना विरोध असल्यानं ही भेट महत्वाची
- भुजबळ आणि भामरे यांच्यात थोड्याच वेळात भेट होणार

Thane : ठाण्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता, वाहन धुणे, पाण्याने साफसफाई यास मनाई

Thane : उन्हाळा सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होतोय.


ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होतेय.


भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता


या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे.


म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.


ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे, पाण्याने साफसफाई करणे यास मनाई


ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश


या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे

Ramdas Kadam : उध्दव यांनी केवळ बेछूट आरोप करण्याचे काम केलं - रामदास कदम.

Ramdas Kadam : मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे केवळ दहा मिनिटांसाठी मंत्रालयात गेले - रामदास कदम.


दुसऱ्यांना नालायक बोलताना तुम्ही लायक आहात का हे उध्दव नी बघायला हवं - रामदास कदम.


उध्दव यांनी केवळ बेछूट आरोप करण्याचे काम केलं - रामदास कदम.


रायगड मधील जनता अनंत गीते यांना राजकारणात गाडून टाकेल - रामदास कदम


किमान दीड ते दोन लाख मतांच्या फरकाने सुनील तटकरे निवडून येतील - रामदास कदम


मतदान केल्यानंतर रामदास कदम यांची महायुतीवर जोरदार टीका.

Salman Khan : सलमान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण


सलमान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली.


मोहम्मद रफिक चौधरी असे अटक आरोपीचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेक करण्यासाठी मदत केली होती.


चौधरीला याला आज मुंबई पोलिस मुंबईत आणणार असून  त्याला न्यायालयात हजर करत पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे

Politics - शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित स्वगृही परतणार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Politics - शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित स्वगृही परतणार


- आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश


- थोड्याच वेळात भाजपच्या मुंबई पक्षकार्यालयात होणार प्रवेश सोहळा


- यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील राहणार हजर


- पालघरमधून यंदा शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज असल्याची चर्चा

Sanjay Raut : सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांनी बळीचा बकरा बनवलं - संजय राऊत 

Sanjay Raut : सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांनी बळीचा बकरा बनवलं - संजय राऊत 


मला सुनेत्रा पवार यांची दया येते - संजय राऊत 

Buldhana : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना, सलग पाचव्या दिवशीही अपघात

Buldhana : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबेना.


सलग पाचव्या दिवशी ही समृद्धी महामार्गावर अपघात.


मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज क्रमांक 284 वर कार साईड बेरियर ला धडकली.


कार चालकाला झोप आल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन अपघात.


अपघातात कार मधील चार जण जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक.


जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू.

PM Modi : पंतप्रधान मोदींची 12 मे रोजी होणार मुंबईत पहिली जाहीर सभा होणार

PM Modi : मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरणार


पंतप्रधान मोदींचा मुंबईत 17 मे रोजी रोड शो


तर पंतप्रधान मोदींची 12 मे रोजी होणार मुंबईत पहिली जाहीर सभा


मोदींच्या सभेचे स्थळ लवकरच निश्चित होणार

Politics : विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Politics :  विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल


शिवसेनेच्या मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे वड्डेटीवार यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले


“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी केले होते.



या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेकडून  सोमवारी बाळासाहेब भवन येथे आंदोलन केले.


शहरात निवडणूकीच्या पार्श्वभीवर जमावबंदीचे आदेश असताना. शिवसेनेकडून वड्डेटीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून वड्डेटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला


या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात शिवसेना सचिव किरण पावसकर यांच्यासह ११ पदाधिकार्यांवर कलम 188,34,37(1) (D) 37(1)(E),135, भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Politics : दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज  यांची भेट घेतली

Politics : दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज 
यांची भेट घेतली


 यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना उपनेते यशवंत जाधव आदी उपस्थित होते.


लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे


दक्षिण मुंबईत मनसेची मोठी ताकद असून राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे


लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर यशवंत जाधव व यामिनी जाधव यांनी राज ठाकरेंची घेतलेली ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Mumbai : बनावट कागदपत्रांच्या मदतीने बोगस जामीनदार उपलब्ध करून देणाऱ्या जोडीचा पर्दाफाष

mumbai : बनावट कागदपत्रांच्या मदतीने बोगस जामीनदार उपलब्ध करून अटक आरोपीची सुटका करणार्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे


गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात  ७ जणांना अटक केली आहे


मानखुर्द पोलिस ठाणे परिसरात ३ एप्रिल रोजी अटक आरोपींना जामीनासाठी लागणारी कागदपत्र  बनावट पद्धतीने बनवणार्या ठिकाणी छापेमारी केली


या ठिकाणाहून ५ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पोलिस तपासात सना सय्यैद नावाची महिला ही वेगवेगळ्या न्यायालयात नाव बदलून आरोपीना जामीन राहिल्याचे समोर आले


या कारवाईत सनाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच चेंबूरहून अटक केली. मात्र ही टोळी मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचा मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आहे


त्या अनुशंगाने  मुंबई गुन्हे शाखेचे  पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Chandrapur : शिकार प्रकरणात चार गावठी बुलेटसह भरमार बंदूक जप्त, वन विभागाची शिकारीसह तिघांवर कारवाई

Chandrapur : शिकार प्रकरणात चार गावठी बुलेटसह भरमार बंदूक जप्त....


अड्याळ वन विभागाची शिकारीसह तिघांवर कारवाई....


अड्याळ वनपरिक्षेत्रातील देवरी संरक्षित जंगलात शिकारीच्या उद्देशानं फिरणाऱ्या तेजाबसिंग रामगडे (३०) रा. लाखांदूर याला वन विभागानं दोन दिवसांपूर्वी अटक केली होती.


वन विभागाच्या वन कोठडीत असलेल्या आरोपीकडून वन विभागानं शिकारीनं चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी इथं एकाच्या घरी लपवून ठेवलेल्या गावठी बुलेटसह एक भरमार बंदूक आणि जंगलात लपवून ठेवलेलं शिकार करण्याचं आणि शिकारीनंतर वन्य प्राणी कापण्याचं साहित्य जप्त केलं आहे.


यासोबत शिकार करण्यात मदत करणारा आणि शिकारीचे मांस विकत घेणाऱ्या अशा दोघांवर कारवाई केली आहे.


आतापर्यंत शिकार आणि मांस विक्री प्रकरणी अड्याळ वन विभागानं तिघांवर कारवाई केली असून त्यात तेजाबसिंग रामगडे, देवाजी नागोसे रा. देवरी व मांस विकत घेणारा ललित डोंगरवार रा. दहेगाव ता. लाखांदूर यांचा समावेश आहे.


शिकार प्रकरणात आणखी कुणाचा समावेश आहे का? याचा शोध अड्याळ वन विभागाचे वनाधिकारी घनश्याम ठोंबरे करीत आहे.

Chandrapur : शिकार प्रकरणात चार गावठी बुलेटसह भरमार बंदूक जप्त, वन विभागाची शिकारीसह तिघांवर कारवाई

Chandrapur : शिकार प्रकरणात चार गावठी बुलेटसह भरमार बंदूक जप्त....


अड्याळ वन विभागाची शिकारीसह तिघांवर कारवाई....


अड्याळ वनपरिक्षेत्रातील देवरी संरक्षित जंगलात शिकारीच्या उद्देशानं फिरणाऱ्या तेजाबसिंग रामगडे (३०) रा. लाखांदूर याला वन विभागानं दोन दिवसांपूर्वी अटक केली होती.


वन विभागाच्या वन कोठडीत असलेल्या आरोपीकडून वन विभागानं शिकारीनं चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी इथं एकाच्या घरी लपवून ठेवलेल्या गावठी बुलेटसह एक भरमार बंदूक आणि जंगलात लपवून ठेवलेलं शिकार करण्याचं आणि शिकारीनंतर वन्य प्राणी कापण्याचं साहित्य जप्त केलं आहे.


यासोबत शिकार करण्यात मदत करणारा आणि शिकारीचे मांस विकत घेणाऱ्या अशा दोघांवर कारवाई केली आहे.


आतापर्यंत शिकार आणि मांस विक्री प्रकरणी अड्याळ वन विभागानं तिघांवर कारवाई केली असून त्यात तेजाबसिंग रामगडे, देवाजी नागोसे रा. देवरी व मांस विकत घेणारा ललित डोंगरवार रा. दहेगाव ता. लाखांदूर यांचा समावेश आहे.


शिकार प्रकरणात आणखी कुणाचा समावेश आहे का? याचा शोध अड्याळ वन विभागाचे वनाधिकारी घनश्याम ठोंबरे करीत आहे.

Hasan Mushriff : ॲड. उज्वल निकम यांना विजयी करणे हे लोकसभेच्या दृष्टीने चांगले होईल, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

Hasan Mushriff : ॲड. उज्वल निकम हे  निर्भीड आणि प्रामाणिक कायदेतज्ञ


त्यांना विजयी करणे हे लोकसभेच्या दृष्टीने चांगले होईल


महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया


हसन मुश्रीफ हे समशुद्दीन मुश्रीफ यांचे बंधू


समशुद्दीन मुश्रीफ यांच्या 'हु किल्ड करकरे?' पुस्तकावरून आरोप प्रत्यारोप

Beed : आज बीडच्या अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार

Beed : बीड लोकसभेच्या भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज बीडच्या अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे..


सायंकाळी साडेचार ते पाच च्या दरम्यान या सभेला सुरुवात होईल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा असणार आहेत. 


अंबाजोगाई शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत आहेत त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांची या ठिकाणी गर्दी होणार आहे..

Ahmednagar : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये येणार, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Ahmednagar : महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये येणार...



दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर मधील संत निरंकारी भवन मैदानावर सभा होणार...



नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी झाली असून नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,


महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती...



अहमदनगरची सभा संपल्यानंतर मोदी यांची बीड येथे सायंकाळी सभा होणार आहे...



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Nagpur : नागपूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते बळवंतराव ढोबळे यांचे वार्धक्याने निधन

Nagpur : नागपूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बळवंतराव ढोबळे यांचे सोमवारी रात्री वार्धक्याने निधन झाले.


ते 99 वर्षांचे होते. येत्या 2 जुलै रोजी त्यांची शंभरी पूर्ण होणार होती.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी बिहार मध्ये कार्य केले होते.


पुढे ते भाजप मध्ये सक्रिय झाले. नागपूर महापालिकेत 25 वर्षे ते नगरसेवक होते.


1990 मध्ये ते विधान परिषदेवर गेले. त्यांच्या मागे 5 मुले, 3 मुली व मोठा आप्त परिवार आहे.


मंगळवारी महालातील नटराज टॉकीज येथील निवास स्थानावरून अंत्ययात्रा निघेल


गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Dhule : धुळ्यातील एका दुकानातून 55 लाख रुपयांची रक्कम जप्त, पैशांची पोलीस प्रशासनाकडून मोजणी सुरू

Dhule : धुळे जिल्हा स्थानिक अन्वेषण शाखेने मिळालेल्या माहितीवरून


आग्रा रोडवरील एका दुकानातून 55 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे,


या पैशांची पोलीस प्रशासनाकडून मोजणी सुरू असून


निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर कारवाई सुरू आहे


आयकर विभागाकडे देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे,


ही रक्कम कोणी आणि कुठून आणली होती याचा तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे


मात्र सध्या पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी देखील ताब्यात घेतले आहे..


अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे....

Ahmednagar : दौरा आटोपून परतत असताना वांचितच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक

Ahmednagar : दौरा आटोपून परतत असताना वांचितच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक...
अज्ञात दोघांकडून गाडीवर दगडफेक..
अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ घडली घटना...
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते...
10 वाजता प्रचार सभा आटोपून परतत असताना घडली घटना..
दगडफेकीत गाडीच नुकसान.. उमेदवार मात्र बचावल्या...
रात्री उशिरा राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गर्दी..
हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन झाले पसार..
आरोपींना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान....

Weather Update : महाराष्ट्रातील काही भागात 7 मे पासून अवकाळी पावसाची शक्यता, पुढील 48 तासात कमाल तापमानामध्ये वाढ होणार

Weather Update : महाराष्ट्रातील काही भागात 7 मे पासून अवकाळी पावसाची शक्यता


महाराष्ट्रात पुढील 48 तासात कमाल तापमानामध्ये वाढ होणार


त्यानंतर तापमान हळूहळू घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त 


राज्यात सरासरी तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने बदल होण्याची शक्यता


सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता 


पुढील 48 तासांत मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात उष्ण, दमट हवामानाची शक्यता 


मराठवाडा आणि विदर्भात 7 मे पासून पावसाची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.