राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 May 2023 11:43 PM
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...केजरीवालांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवसदिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये...More
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...केजरीवालांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवसदिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये वाव देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला. हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटीची मोहिम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत केजरीवाल आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता, वाय बी चव्हाण सेंटरवर भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावरसकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर येतील. त्यानंतर शहरातील विश्रामगृहात 10 मिनिट थांबून कार्यक्रम स्थ्ळी रवाना होतील. सकाळी 11.15 वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येते कार्यक्रमला हजेरी लावतील.दुपारी 1.30 वाजता विश्रामगृहावर असतील. याठिकाणी साधारण अर्धा तास कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आज बारावी बोर्डाचा निकालबारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान राज्यभरात बारावी बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाट्न होणार आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सुशोभित करण्यात आलेल्या वास्तूचे लोकार्पण देखील पार पडणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. अखिल भारतीय किसान सभा संघटनेकडून उपमुख्यमंत्र्यंचा ताफा अडवण्याचा इशारा दिलाय. शेतकर्यांच्या विविध मागण्या पूर्तता न केल्यामुळे इशारा देण्यात आलाय. बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षितबहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षित. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलाय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai: चोर असल्याच्या संशयात जमावाकडून मारहाण, 29 वर्षीय इसमाचा मृत्यू
Mumbai News:चोर असल्याच्या संशयात एका 29 वर्षीय इसमाला जमावाकडून मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली. प्रवीण लहाने असं मृताचृं नाव आहे. माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं, नंतर त्याला आकडी आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.