Mumbai Rains LIVE Updates : मुंबईतील पडझडीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, BMC ला सतर्क राहण्याचे आदेश

Maharashtra News LIVE Mumbai Rains Updates: मुंबईसह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत तासाभरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2024 07:33 PM
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांचा अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने, अपघातामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक लोणावळा येथे पोलिसांनी बंद करत वाहतूक जुन्या मार्गावरून वळवली, मुंबईच्या दिशेने निघालेले अनेक नागरिकांना तासंतास वाहनात अडकून, वाहने धिम्या गतीने मुंबईच्या दिशेने सरकत आहेत

घाटकोपर दुर्घटनेत आतापर्यंत 47 जणांना बाहेर काढलं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 






 

CM Ekanth Shinde on Ghatkopar : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

घटना दुर्दैवी आहे, तात्काळ मदतीचे आदेश दिले, ३५ लोकांवर उपचार सुरु आहेत, होर्डिंग उचलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे, रेस्क्यू करणं आणि लोकांना बाहेर काढणं याला प्राधान्य असेल, होर्डिंग जर अनधिकृत असतील तर त्यावर कारवाई करु, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला सांगितलं

दुर्घटनेच्या ठिकाणी तात्काळ मदत यंत्रणा पोहोचवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जिथे दुर्घटना घडल्या आहेत… तिथे तात्काळ मदत यंत्रणा पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत

CM Eknath Shinde : मुंबईतील पडझडीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, BMC ला सतर्क राहण्याचे आदेश

 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, तातडीनं उपचार करण्याचे दिले आदेश, आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या सूचना, 
मुंबई महानगरपालिकेला सतर्क राहण्याचे आदेश , नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

Mumbai Rains : पावसामुळे मुंबईची रस्ते वाहतूक मंदावली

मुंबईत पाऊस पडल्याने रस्ते वाहतूक संथ गतीने,  कार्यालय सुटण्याची वेळ आहे आणि त्यामुळे चाकरमानी घराकडे निघालेले आहेत.  त्यात मुंबईत पाऊस पडल्याने रोड ओले झाले आहेत, त्यामुळे वाहतूक संत गतीने सध्या सुरू आहे

Navi mumbai rain update : ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग

ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग


वादळी वाऱ्यांमुळे टॅावरने पेट घेतल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. याचा फटका ऐरोली, दिघा परिसरातील नागरिकांना बसला असून येथील भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. 



Mumbai Rain : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, मुंबईत वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने मुंबईकरांची तारांबळ

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, मुंबईत वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा लोट असल्याचं दिसतंय. तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे. तर घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाल्याची माहिती आहे. 

Vasai : वसई विरारचं राजकीय वातावरण तापलं;  कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडायला लागले

Vasai : वसई विरारचं राजकीय वातावरण तापलं;  कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडायला लागले


पालघर लोकसभा क्षेत्रात आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.


आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना आता कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडत आहे. 



वसईत ही दोन ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने दोन्हींनी आपापल्या उमेदवाराचा जोर जोरात प्रचार करत प्रचंड घोषणाबाजी केली.


त्यामुळे काही काळासाठी तेथील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. 

Palghar : पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात अवकाळी पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

Palghar : पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात अवकाळी पावसाला सुरुवात,


जव्हार भागात गारांसह पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

Arvind Kejriwal - अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Arvind Kejriwal - अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- न्या. संजीव खन्ना व न्या. दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने फेटाळली याचिका
- आम्ही यात कसे हस्तक्षेप करू शकतो, न्यायालयाचे निरीक्षण 
- नायब राज्यपालांना निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना निर्णय घेऊ दे, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Delhi - महिलेशी गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांना मुख्यमंत्री निवासस्थानावरून दोन फोन

Delhi - महिलेशी गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांना मुख्यमंत्री निवासस्थानावरून दोन फोन


 दुसऱ्या फोन मध्ये पीडित महिलेने स्वतःचे नाव एका राज्यसभा खासदाराचे सांगितले


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव यांनी मारहाण केल्याचा केला आरोप


भाजपने मागितले स्पष्टीकरण 


संबंधित राज्यसभा खासदार यांना संपर्क केला असता त्यांनी फोन घेतलेला नाही


पोलीसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तीन पोलीस व्हॅन घटनास्थळी दाखल परंतु त्यांना अद्याप तसे काही आढळले नाही

Vasai : वसईत एव्हरशाईन ते अंबाडी ब्रीजपर्यंत प्रचंड वाहतुक कोंडी, पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

Vasai : वसईच्या एव्हरशाईन ते वसई अंबाडी ब्रीजपर्यंत आज दुपारी प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे.  


सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. 



एव्हरशाईन रस्त्यावर पालिकेच्या ठेकेदाराने डांबरीकरणाच काम सुरु केल्याने वाहतुक कोंडी झाली आहे.  


या वाहतुक कोंडीत रुग्णवाहिका ही अडकल्या होत्या. 



आज वसईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांची सभा आहे.


या मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी झाल्याने वाहतुक पोलिसांची फार तांरबळ उडाली आहे.

Palghar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर, कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका


Palghar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर


पालघर लोकसभेचे महायुतीचे भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका


साडे बारा वाजता मुख्यमंत्री मनोर येथील सायलेंट रिसॉर्टवर दाखल होणार


त्यानंतर तीन वाजता मुख्यमंत्री वसईतील अमित शहा यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार .

Akola : अकोटमधील गोवर्धन हरमकार पोलीस कोठडी मारहाण मृत्यूप्रकरण, ठाणेदारासह पाच कर्मचाऱ्यांची बदली. 

Akola : अकोटमधील गोवर्धन हरमकार पोलीस कोठडी मारहाण मृत्यूप्रकरण.


ठाणेदारासह पाच कर्मचाऱ्यांची बदली. 


पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह 3 पोलिस कर्मचाऱ्यावर खुनाचे गुन्हे दाखल. 


अकोट पोलिसांनी दोन महिने दडवून ठेवलं होतं प्रकरण. 


या प्रकरणात आणखी मोठी अपडेट समोर


ठाणेदार तपण कोल्हेंच्या बदलीनंतर आता नॉट रीचेबल असलेल्या तब्बल पाच पोलिसांवर बदलीची कारवाई


ठाणेदार कोल्हे यांची कालच पोलीस नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे.


तर या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

Bhandara : आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, मृतक पोलीस भरतीपूर्वची तयारी करणारा

Bhandara : आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू....


मृतक पोलीस भरतीपूर्वची तयारी करणारा....


पोलीस भरतीपूर्वची तयारी करणारा तरुण नेहमीप्रमाणे सकाळी घराबाहेर पडून धावण्याची प्रॅक्टिस केली.


त्यानंतर तो मांडवी येथील वैनगंगा नदी तीरावर आंघोळीसाठी गेला.


मात्र, यावेळी त्याचा श्वास थांबल्यानं नदीच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


अमोल पुरुषोत्तम बोरकर (18) रा. खमारी बुटी असं मृतकाचं नाव आहे.


यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी मदतीचा हात दिला मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Thane : नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी गोविंदा आज ठाण्यात 

Thane : नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी गोविंदा आज ठाण्यात 


शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ


आज सायंकाळी ठाणे विधानसभा क्षेत्रात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे.


यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते गोविंदा उपस्थित राहणार आहेत.

Central Railway : मध्य रेल्वेवर ठाण्याजवळ झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त, लोकलसेवा मात्र अद्यापही उशिरानंच

Central Railway : मध्य रेल्वेवर ठाण्याजवळ झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त,


लोकलसेवा मात्र अद्यापही उशिरानंच


मध्य रेल्वेची रेल्वेसेवा विस्कळीत,


कल्याण आणि कुर्ला दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती

Akola : अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावलीय, केळी पपईच्या फळबागा भुईसपाट

Akola : अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.


अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात अनेक गावांना आज सोमवारी सकाळी अवकाळीचा फटका बसला आहे.


सकाळी तब्बल 30 मिनिट पाऊस बरसलाय. सोबत विजेचा कडकडाट सुद्धा सुरू होता. 


आधीच अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने तेल्हारा तालुक्याला मोठा फटखा बसला होता.


तालुक्यातल्या हिवरखेडसह कार्ला यासह अनेक गावांना फटखा बसला होता.


केळी पपई यासह आदी फळबाग भुईसपाट झाल्या होत्या.

Central Railway : ठाणे स्टेशन दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम

Central Railway : मध्य रेल्वेची रेल्वेसेवा विस्कळीत, कल्याण आणि कुर्ला दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत


मध्य रेल्वेची रेल्वेसेवा विस्कळीत


ठाणे येथे तांत्रिक बिघाड


कल्याण आणि कुर्ला दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत


ठाणे स्टेशन दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम


 


 


 


 

Navi Mumbai : प्रशांत ठाकूर यांचा पोलीसांबरोबर जोरदार वाद, मतदारांना केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास पोलीसांचा विरोध 

Navi Mumbai : प्रशांत ठाकूर यांचा पोलीसांबरोबर जोरदार वाद


मतदारांना केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास पोलीसांचा विरोध 


मोबाईल केंद्राबाहेर ठेवून जाण्याच्या सुचना ..मात्र मोबाईल कलेक्शन सेंटर उपलब्ध नसल्याने मतदारांची गैरसोय..


मोबाईल ठेवायचा कुठे हा प्रश्न असल्याने मतदार परत जात असल्याने प्रशांत ठाकूर यांनी घातला पोलीसां बरोबर वाद


मोबईल घेवून जाण्यास परवानही द्या किंवा बाहेर मोबाइल कलेक्शन सेंटर सुरू करण्याची प्रशांत ठाकूर यांची मागणी

Mumbai : मुंबईतील तरुण मतदारांना भुरळ घालण्यासाठी आज तेजस्वी सुर्या मैदानात उतरणार

Mumbai : मुंबईतील तरुण मतदारांना भुरळ घालण्यासाठी आज तेजस्वी सुर्या मैदानात उतरणार


भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सुर्या आज मुंबई दौऱ्यावर


मानखुर्द-शिवाजी नगर येथे बाईक रॅली काढत तेजस्वी सुर्या शक्तिप्रदर्शन करणार


मानखुर्द येथे काही दिवसांपूर्वी भाजप प्रचार रथाची झालेली तोडफोड


तोडफोडीच्या ठिकाणी तेजस्वी सुर्याचे आज बाईक रॅलीमार्फत शक्तिप्रदर्शन


भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात दुपारी १ वाजता पत्रकार परिषदही घेणार


सायंकाळी तरुण मतदारांसोबत तेजस्वी सुर्या साधणार संवाद

Rain Update : राज्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Update : महाराष्ट्रात सध्या मान्सून पूर्व पावसाची हजेरी 


राज्यात पुढील 24 तासातही जोरदार पावसाची शक्यता 


गेल्या तीन दिवसाच राज्याच्या विविध भागात पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. 


आजही पावसाची शक्यता कायम


ठाणेसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


हवामान विभागाने ठाणे, रायगडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 


मुंबईतही आज हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Bhandara Fire : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात रात्री अवकाळी पाऊस, 15 मे पर्यंत अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Bhandara Fire : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात रात्री अवकाळी पाऊस


हवामान विभागानं 15 मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.


दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली.


मागील दोन दिवसांपासून उन्हाची प्रखरता जाणवू लागली असता आलेल्या या पावसानं नागरिकांची होणाऱ्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.


मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून त्याच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

Ahmednagar : पारनेरमध्ये राहुल शिंदे-निलेश लंके यांचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले, पैशाची बॅग रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल...

Ahmednagar : पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते भिडले...
मध्यरात्री भर रस्त्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले...
पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ व्हायरल...
संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप...
तर काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा राहुल शिंदे यांचा आरोप...
पारनेर पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही...
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील घटना...

Bhiwandi : भिवंडीतील मानकोली परिसरात गोदामांना भीषण आग, 15 ते 20 गोदाम जळून खाक 

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील इंडियन कॉर्पोरेशन कंपाउंड परिसरात गोदामांना भीषण आग 


पंधरा ते वीस गोदाम जळून खाक 


 केमिकल, प्लास्टिक मनी, प्लाऊड, इलेक्ट्रॉनिक सामानच्या गोदामांना भीषण आग


आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची भिवंडी ,कल्याण, ठाणे येथील तीन गाड्या दाखल


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Mumbai Rains Updates : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत तासाभरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला. वडाळा, दक्षिण मुंबईसह विविध भागात पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या धारा पाहायला मिळाल्या. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.