Maharashtra News LIVE Updates : देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
परभणी जिल्ह्यात मागच्या आठवडा भरापासून गर्मीने हैराण केले आहे.सातत्याने तापमान हे चाळीशी पार जात असल्याने प्रचंड उकाडा जाणवतोय.आज तर जिल्ह्याचे तापमान हे 42.06 अंशावर गेले असुन यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक तापमान आहे.त्यामुळे सकाळी 11 पर्यंत आणि सायंकाळी 5 नंतरच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत तर गर्मीने उष्माघात होण्याची शक्यता असल्याने महत्वाचे काम असल्यासच दुपारच्या वेळी बाहेर निघावे असे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
सोलापूर शहरातील बार्शी रोडवर ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक पाईपांना लागली भीषण आग
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामासाठी लागणाऱ्या पाईपांना लागली भीषण आग
आग भीषण असल्याने त्याचा धूर संपूर्ण शहरात पसरला
अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना
स्मार्ट सिटीच्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील लागली होती आग
मात्र काही दिवसांपूर्वी हॆ पाईप बार्शी रोडवरील भोगाव परिसरात ठेवण्यात आले होते
आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू, मात्र आग मोठी असल्याने अग्निशामक दलाला करावी लागतेय कसरत
आम्ही वारंवार ही मागणी करत होतो. कांद्याची निर्यात बंदीची उठवावी हि मागणी मागणी मान्य केली. आम्ही केंद्रसरकराचे आभारी आहे...
यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मी आम्ही तिघेजण केंद्र सरकारच्या पाठीमागे यासाठी लागून होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब आम्ही केंद्र सरकारला कळवली होती. त्याला प्रतिसाद मिळाला.
एकीकडे देशात कांद्याचे उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला. देशात कांद्याची करता झाली तर बाहेर देशातून आयात करावा लागतो.
विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आणि सामान्य माणसाचे हित पाहत.
- छगन भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट दिल्याने ओबीसी समाज नाराज
- ओबीसी समाजाने नाशिकमध्ये लावले होर्डींग्स
- आम्ही 70 टक्के ओबीसी तरी तिकीट नाही
- आता तरी उठ ओबीसी जागा हो असा होर्डिंगवर मजकूर
- मतपेटीत आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन
बुलढाणा - अहमदपूर बुलढाणा येथून निघाली होती बस मध्ये 44 प्रवासी होते. चिखली ते मेहकर रोड वरील नांद्री फाट्या नजीक एसटी च्या मागील भागाला शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बस ने धडक दिली .. या अपघातात एसटी मध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशीचा जागीच मृत्यू झाला तर बस मधील 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. यात सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असून जखमीना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिरोही ट्रॅव्हल्स ही खाजगी बस सुरत वरून मेहकर ला जात होती . ती स्लीपर कोच बस असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवाशी ही किरकोळ जखमी झाले आहेत.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार आज भोर तालुका दौऱ्यावर असून भोर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भोर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. भोर शहरातील मार्केटमध्ये प्रचार यात्रा सुरू असताना अनेक ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. यावेळी परिसरातील दुकानदार व नागरिकांशी सुनेत्रा वहिनी यांनी संवाद साधला व महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात...ट्रक आणि दुधाच्या टँकर मध्ये समोरा समोर जोरदार धडक झाल्याने झाला भिषण अपघात...अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू तर तीघांची प्रकृती गंभीर चिंताजणक...
दत्तात्रय वामण,अक्षय दिघे,तेजस दिघे,या तिघांचा जागीच मृत्यू...सर्व मृत पांगरी गावचे रहिवासी...तर जखमीमध्ये दोन वर्षाच्या लहान मुलाचा हि समावेश
छत्रपती संभाजीनगर आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे आज सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. तरी आंबेडकरी जनतेने रविवारी 4 वाजता त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरातच होणार आहे.
दादर स्टेशन येथे अमरावतीहून मुंबईकडे येणाऱ्या अमरावती एक्सप्रेसचा एसी कोच डब्याला किरकोळ स्वरूपाची आग लागली होती. मात्र तातडीने ती विझवण्यात आली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून सर्व प्रवाशांना दादर स्थानकामध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले.
राज्यात लोकसभा निवडणूकांमध्ये मुंबईतील बेस्ट बसमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या ई-मेलने खळबळ
वडाळा डेपो येथील कंट्रोलला एका व्यक्तीने शुक्रवारी हा धमकीचा ई-मेल केल्याची माहिती समोर आली आहे
महाराणा प्रताप चौक मुलुंड पश्चिम येथील रुट क्रमाक ५१२ नेरूळ येथून मुबईत येणार्या बसमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठवण्यात आला
हा ई-मेल वडाळा डेपो येथे कळताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली
घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांचे पथक या मार्गावरील ६ बस तपासल्या असता काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही
मात्र या ईमेल पाठवणार्याचा पोलिस आता शोध घेत आहेत. ऐन निवडणूकीच्या काळात अशा अफवा पसरवल्या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आज घडीला फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या 11 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील 3 धरणात 0 टक्के पाणीसाठा.
नागपुरात काल हलक्या स्वरूपाच्या भूकंपाची नोंद
2.5 रिक्टर स्केल.
दुपारी 15.11.09 वाजता नागपूरच्या पारशिवनी भागात बसले भूकंपाचे धक्के .
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -