Jalna News : 'मिशन हातभट्टीमुक्त गाव' अभियान जालना राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत तीन महिन्यांत हातभट्टीमुक्त गाव संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येणार आहे. तरी ग्रामस्तरावरील सर्व विभागांनी एकत्र येऊन हातभट्टीमुक्त गाव मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी केले आहे. 


हातभट्टीची किंवा गावठी दारू मानवी शरीरासाठी अपायकारक असल्यामुळे प्राणहानी होऊ शकते. हातभट्टीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील हॉटस्पॉटची माहिती तयार केली आहे. या स्पॉटवर लक्ष ठेवून त्यावर वेळोवेळी कारवाई करणार आहोत. त्यामुळे अवैध हातभट्टी तयार करणाऱ्या लोकांवर वचक बसणार आहे. त्यांच्यावर कलम 93 व एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येणार आहे. तर नागरिकांनी अवैध दारूची विक्री करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


दरम्यान, स्थानिक पातळीवरील गावकऱ्यांसह सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही हातभट्टीमुक्त अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 2022-23 वर्षात 858 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 627 आरोपींना अटक करून 39 वाहने जप्त करण्यात आली आहेत. अंदाजे 1 कोटी 10 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एनडीपीएस 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मे महिन्यामध्ये एकूण 5  एमपीडीए प्रस्ताव जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून


मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांकडून छोट्या-मोठ्या कारवाया देखील करण्यात येत असतात. मात्र असे असताना अनेक अवैध दारू विक्रेते कारवाई नंतर देखील दारू विकत असतात. त्यामुळे आता अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या हालचाली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna News: सातत्याने पाणी टंचाई, 'त्या' गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश; पालकमंत्र्यांचे आदेश