मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असणाऱ्या 'सिल्वर ओक'वर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर भाजप नेते आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. भाजप नेते आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी पहिल्यांदा चिथावणीखोर वक्तव्य केले असे नाही तर या अगोदर देखील अनिल बोंडे यांनी वक्तव्य केली आहेत. 


12 मार्च 2021


एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी बंदोबस्त करत असलेल्या पोलिसांना सरकारचे कुत्रे म्हणून संबोधले, पोलिसांशी प्रचंड हुज्जत घातली. 


15 नोव्हेंबर 2021


मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी मालिकांसारखा कुठलाही हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नाही, जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे दंगली घडत नाहीत. जिथे डाव्या व सेक्युलर विचाराच्या सरकारच्या राज्यात ह्या दंगली होतात. कारण ह्या दंगलीला प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करत असते.


18 नोव्हेंबर 2021


शरद पवार कधी खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणतात, हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खातं नाही. पत्रकार परिषदेत बोलतांना संजय राऊत यांना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे उत्तर.


18 जानेवारी 2022


काँग्रेसमध्ये कुत्र्यांची हाडच लागली आहे. सोनियांना खुश करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. नानाने तर हद्दच केली मी मालकीनीचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली.  पण नानांनी लक्षात ठेवावे शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावतीवरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव.


8 एप्रिल 2022


शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती.  त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे ह्या राज्यात जेव्हा माझीच सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली.


संबंधित बातम्या :


ST Workers Strike : शरद पवारांच्या घरावर आंदोलन; भाजप नेते अनिल बोंडेंचे चिथावणीखोर वक्तव्य



'प्रभू, पवारसाहेबांना सद्बुद्धी दे, नाहीतर महाराष्ट्राची त्यांच्या तावडीतून सुटका तरी कर', भाजप नेत्याचं पत्र