Lumpy Skin Disease: राज्यातील लम्पीची (Lumpy) परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा सतत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), बीड (Beed), परभणीसह (Parbhani) जालन्यातील (Jalna) लम्पीबाबत समोर आलेल्या आकडेवारीने खळबळ उडाली आहे. कारण या चार जिल्ह्यांतील 1 हजार 499 गावे बाधित झाली असून, 52 हजार 531 जनावरांना लम्पी आजाराची लागण (Lumpy Skin Disease) झाली आहे. धक्कादायक म्हणजे 3 हजार 672 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. 

राजस्थानसह देशातील अनेक राज्यात थैमान घालणाऱ्या लम्पीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात देखील पाहायला मिळाला. त्यामुळे हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवली. मात्र आता लसीकरण केल्यानंतर देखील जनावरांना लम्पीचा लागण होतांना दिसत आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी व जालना या जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. या चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराने जनावरे बाधित झाली आहेत. तर 52 हजार 531 जनावरे सध्या बाधित आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गाय, बैल, वासरे यांचा समावेश आहे.

चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये 17 लाख 76 हजार 737 जनावरांना पशसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र असे असतांना देखील सद्यस्थितीत लम्पी स्कीन या आजाराने या चार जिल्ह्यात 3 हजार 672 जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे लम्पी स्कीन आजाराने चार जिल्ह्यात डोकेवर काढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे 1 हजार 366 जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने 3 कोटी 31 लाख 86  हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

लम्पी आजाराची स्थिती (औरंगाबाद, बीड, परभणी,जालना)

एकूण गोवंशीय प्राणी  17 लाख 56  हजार 776
एकूण बाधित प्राणी   52 हजार 531 
एकूण बाधित गावे    1 हजार 499
मृत्युमुखी पडलेली जनावरे 3 हजार 672
प्राप्त एकूण लस 18 लाख 31 हजार 400
एकूण लसीकरण  17 लाख 76 हजार 736
अर्थसाहाय्य   3 कोटी 31 लाख 86 हजार
अदा अर्थसाहाय्य  1 हजार 366

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sangli News : सांगलीत गोवर रुबेलाचा शिरकाव; महापालिकेकडून प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 9 पथकं