Aurangabad News: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे 16 जुलैपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.16 ते 25 जुलै असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. या दरम्यान ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरवात होणार असून शेवट औरंगाबादला होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मनसैनिकांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
असा असणार दौरा...
- 16 जुलै रोजी उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम.
- 17 जुलै रोजी तुळजापुर येथे तुळाजा भवानी मातेचे दर्शन व त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा पदाधिकाऱ्याची बैठक व मार्गदर्शन
- 17 जुलै रोजी लातुर जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 18 जुलै रोजी लातुर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
- 18 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 19 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
- 19 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 20 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
- 20 जुलै परभणी जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 21 जुलै रोजी परभणी पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
- 21 जुलै रोजी जालना जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 22 जुलै रोजी जालना जिल्ह्यातील पदाधिका-यांची बैठक व मार्गदर्शन
- 22 जुलै रोजी बीड जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 23 जुलै रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
- 23 जुलै रोजी औरंगाबाद येथे जिल्ह्यात आगमन व मुक्काम
- 24 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
- 25 जुलै रोजी सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण
पक्षाचा घेणारा आढावा ...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात काही ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका सुद्धा पुढील काळात पार पडणार आहे. त्यादृष्टीने अमित ठाकरे यांचा दौरा महत्वाचा समजला जातोय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य नाही. दरम्यान अमित ठाकरे हे विभागीय दौरे करत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्याची शक्यता आहे.