मुंबई : भिवंडीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा (Asaduddin Owaisi Sabha in Bhiwandi) आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ओवैसींचं भाषण सुरू होणार आहे. भोंगा वाद, ज्ञानवापीवरून सुरू झालेले इतर प्रार्थनास्थळांचे वाद आणि राज्यातील इतर राजकीय विषयांवर असदुद्दीन ओवैसी काय बोलणार याची उत्सुकता आहे.
भिवंडी शहरातील परशुराम टावरे स्टेडियम येथे AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्यावतीने देखील काही गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. या सभेसाठी महापालिका व पोलिसांच्यावतीने परवानगी देण्यात आली असून यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. या सभेला पक्षाचे दिग्गज नेते यांची हजेरी लावणार आहे. राज्यातील इतर राजकीय विषयांवर असदुद्दीन ओवैसी काय बोलणार याची उत्सुकता आहे.
भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या?
मुघलांशी भारतीय मुस्लिमांचा कोणताही संबंध नाही पण मुघल सम्राटांच्या बायका कोण होत्या असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबाद येथे केले होते. ज्ञानवापी मशिद आणि कुतूब मिनार वरुन सुरू असलेल्या वादावर औवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.ओवैसी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होते की, मुघलांचा आणि भारतीय मुस्लिमांचा काही संबंध नाही. पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या?
मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईतील रंगशारदा येथे बैठक
मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईतील रंगशारदा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आगामी पालिका निवडणुकांबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Mumbai मधील रंगशारदामध्ये Raj Thackeray मनसैनिकांशी संवाद साधणार,भिवंडीमध्ये Asaduddin Owaisiची सभा