मुंबई: संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्टीकरण दिले आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदरांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले, मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही. भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.
महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य ही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली
महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य ही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली आहेत. राज्यपालांनी बेताल वक्तव्य केलेलं होत ते मी रेकॉर्डला देखील आणले. मात्र त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी कोणता गुन्हा केला की चुकीचा बोललो, असा कुठलाही भाग नाही.
स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही
धर्मवीर उपाधी कोणाला मिळाली हे तुम्ही इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण 'धर्मवीर' आहे. काहींचे तर चित्रपट निघाले आहेत. आता तर धर्मवीर पार्ट 2 येत आहे. स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही, असे देखील अजित पवार म्हणाले.
मी खूप मोठी चूक केली असा मला वाटत नाही. मी भाषण केला तेव्हा आक्षेप घेतला नाही. दोन दिवसानंतर ठरलं हा एक ग्रुप आहे जे असा डोकं लावतात. ही क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड तिथे नव्हता. त्यानंतर आंदोलन करण्यास सुरूवात झाल्याचे अजित पवार म्हणाले. मविआमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आपल्या मित्र पक्षाला आणावे. आम्ही वंचितला विरोध केलेला नाही. सगळ्या मित्र पक्षाला आणावं. एकत्र तीन पक्ष बसून जागा वाटप करताना त्यांच्या मित्र पक्षाला त्यांच्या जागा देतील, असेही अजित पवार म्हणाले.