Ajit Pawar Nashik : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधव, तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. त्यासाठी लागणारा निधी पुरविण्यात येईल. त्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अनेक कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. 


नाशिकमध्ये (Nashik) शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासह जिल्ह्यातील विकासाबाबत अनेक विषय मांडले. यावेळी अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेला शासन आपल्या दारी महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यात जात आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे माराव्या लागत होते, त्यामुळे शेवटच्या माणसाला मदत होत नसायची, मात्र आता शासन आपल्या दारीतून घरघरापर्यंत योजना पोहचत आहेत, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात 112 शिबिरे झाली असून अकरा लाख लोकांना फायदा झाला आहे. यात आदिवासी बांधव, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवाना अधिकाधिक मदत मिळाली पाहिजे, असेही पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, नाशिक (Nashik District) जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नाशिक जिल्ह्यातील अनेक कामांना गती दिली जाणार आहे. यात नाशिकला झोपटपट्टीमुक्त करण्याचा मानस आहे, त्याचबरोबर नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी प्रदूषण मुक्त करायची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी प्रदूषणाच्या (Godawari) विळख्यात आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील, तसेच अनेक दिवसांपासून रखडेलला नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. याबाबतची बैठकही पार पडली असून  या प्रकल्पामुळे अहमदनगरसह नाशिक जिल्ह्याचा विकास होणार आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू असून जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 


आता तीन इंजिनचे सरकार 


नाशिक जिल्हा हा मिनी महाराष्ट्र असून सगळ्या मंत्र्यावर जबाबदारी दिली असून नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विकासाचे काम होणार असून यासाठी कुठल्याही जातीपातीचे राजकरण न करता सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम करू असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असून महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता राज्यात दोन इंजिनचे नाहीतर आता तीन इंजिनचे सरकार आले असून महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास अजित पवार यांनी दिला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik News : नाशिकला आज मंत्र्यांची मांदियाळी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नऊ मंत्र्याची उपस्थिती