Maharashtra Nanded News : नांदेडमध्ये मुखेड तालुक्यातील शिरुर दबडे पाटी महामार्गच्या वळणावर द्राक्षांनी भरलेला पिकअप उलटला आणि भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकांसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात चालक नवशाद शेख गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


आज सकाळी 5 वाजल्याच्या सुमारास पंढरपूरहुन व्यापारी मोहम्मद चौधरी यांचा पिकअप द्राक्षं घेऊन मुखेडकडे येत होता. त्यावेळी मुखेड तालुक्यातील शिरुर दबडे पाटी वळणावर पोहचला असता, वेग जास्त असल्यानं गाडीवरचा ताबा सुटला आणि पिकअप रस्ताच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूरहुन ठोक दरात घेऊन आलेल्या द्राक्षांची मात्र वाहनानं दोनदा पलटी मारल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. ज्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात द्राक्षांचा सडा पडला होता. त्यातील द्राक्षांनी भरलेल्या कॅरेटचीही मोठी तोडफोड झाली होती.


दरम्यान, पंढरपूर ते मुखेड येथे द्राक्ष वाहतूक करणाऱ्या या पिकअप वाहनात चालकांसह अन्य दोनजण होते. सदर घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीनं रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर दोघांना किरकोळ मार लागला आहे. पण या अपघातात चालक मात्र गंभीर जखमी आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहीत मिळाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :