- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Nagarparishad LIVE: मतदानाची वेळ संपली, पण अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा
Maharashtra Nagarparishad LIVE: राज्यातील 262 नगरपरिषद आणि नगर पंचायतीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचारी सज्ज
पार्श्वभूमी
Maharashtra Nagarparishad LIVE: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण...More
मुंबई: राज्यातील 262 नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५.३० ला मतदानाची वेळ संपवली आहे. परंतु राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार? याचे चित्र 21 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
- येवल्यात मतदान केंद्राबाहेर राडा...
- राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) आणि शिवसेना ( शिंदे गट ) समर्थकांमध्ये राडा...
- येवल्यातील प्रभाग क्रमांक ९ मधील सहस्रार्जुन मंगल कार्यालय या मतदान केंद्राबाहेर दोन्ही समर्थक आपसात भिडले..
- मतदान केंद्रामध्ये ये - जा करण्यावरून उमेदवार व समर्थक आपापसात भिडले..
- पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवले..
- मतदान केंद्राबाहेर आरसीपी व पोलिस कर्मचारी तैनात..
नाशिक: सटाणा नगरपरिषद निवडणूक मतदान शहरात पार पडत असताना मतदान केंद्र क्रमांक १० जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ अचानक दोन गटात राडा झाल्याने अचानक धावपळ उडाली. घरगुती भांडणावरून हा राडा झाल्याची चर्चा आहे. मतदान केंद्राजवळच ही घटना घडल्याने पोलिसांची देखील धांदल उडाली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा आला असून संबंधित राडा करणाऱ्यांना मतदान केंद्राजवळून पिटाळून लावले असून त्यातील काही संबंधित नागरिकांनी मात्र पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतल्याचे समजते. मतदान केंद्राजवळील असणारा उमेदवाराचा बूथ देखील पोलिसांनी काढून टाकला असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाचगणी 42.93%
सातारा 43.77%
मलकापूर 52.69%
म्हसवड 57.20%
वाई 53.22%
कराड 50.50%
रहिमतपूर 65.57%
मेढा 73.72%
सातारा जिल्हा सरासरी 49.14%
संभाजीनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी
कन्नड : 55.93
सिल्लोड : 62.43
पैठण : 52.11
वैजापूर : 54.42
खुलताबाद : 60.83
गंगापूर : 44.25
सांगलीत 3: 30 पर्यंत 57.86 टक्के मतदान
उरुन ईश्वरपूर - 55.93 %
विटा - 56. 94 %
आष्टा - 61.61 %
तासगाव - 54.6 %
जत - 53.67 %
पलुस - 59.49 %
शिराळा - 66.73 %
आटपाडी - 64.77 %
गडचिरोली जिल्ह्यात 3.30 पर्यंत सरासरी 54.81 टक्के मतदान
गडचिरोली 55.1 टक्के
देसाईगंज 53.87 टक्के
आरमोरी 55.34 टक्के
परभणी: जिंतूर शहरातील जिल्हा परिषद उर्दु शाळेत असलेल्या प्रभाग क्र १ च्या मतदान केंद्रातील खोली क्रमांक ४ मध्ये चक्क मतदान केंद्राचा दरवाजा बंद करून मतदान अधिकाऱ्यांनी मतदानच बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकारी दरवाजा बंद करून जेवण करत होते तर बाहेर मतदार हे रांगा लावून बसले होते. याबाबत उमेदवार आणि मतदारांनी तक्रार करताच काही वेळात हे मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्याशी विचारणा केली असता हा प्रकार घडला मात्र काही काळातच मतदान सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे. एकाच वेळी सर्वांना जेवण करता येत नाही. आळीपाळीने जेवण करायला हवे, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हे तीन डिसेंबरला जाहीर करण्यात येणार होते मात्र ते आता 21 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे नागपूर खंडपीठाने सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे, 21 डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाबाबत मंत्री जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कामात सुसूत्रता आणणे गरजेचे असून यामुळे राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पाहिला मिळत असल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे...
रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपालिकांची मतदानाची टक्केवारी
महाड- 11.06
श्रीवर्धन- 11.03
रोहा - 10.93
मुरुड जंजिरा -13.39
अलिबाग - 10.65
पेन-10.34
कर्जत-11.17
माथेरान -11.44
खोपोली - 08.36
उरण- 08.53
एकूण.... मतदान टक्केवारी 10.07
संजय गायकवाड यांनी केलं शासकीय तांत्रिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान.
निवडणूक आयोगासारखं नालायक डिपार्टमेंट कोणतच नाही.
चुकीचे लोक मतदान करतात आणि आम्हाला पराभवाला समोर जावं लागत.
अनेक ठिकाणी बोगस मतदान होत आहे
संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया
Mumbai : मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपवर इनकम टैक्सचा छापा.
रामी होटल ग्रुपच्या अनेक ठिकाणी आयटीची छापेमारी.
जवळपास ३० हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन.
रामी हॉटेल ग्रुपचे राज शेट्टी आणि इतरांवरही छापे.
आज पहाटेपासून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती.
करचोरी प्रकरणात आयटीकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची सूत्रांची माहिती.
रामी हॉटेल ग्रुप हा देशातील नामवंत हॉटेल व्यावसायिक ग्रुप आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ रचनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
सर्वोच्च न्यायालयात निखिल कोळेकर यांनी दाखल केली होती याचिका
३० सप्टेंबर च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत न्यायालयाने याचिका फेटाळली
तसेच निवडणुकांना ३१ जानेवारी ची डेडलाईन आहे त्यामुळे निवडणुका लांबवल्या जातील अशा याचिका दाखल होऊ नये , असंही न्यायालयाने म्हटलं
कागल नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रिये दरम्यान तृतीयपंथीय आणि पोलिसांमध्ये वाद झालाय. कागल इथल्या प्रभाग क्रमांक पाच या मतदान केंद्रावर तृतीयपंथीय आणि पोलिसांमध्ये हा वाद झाला आहे. काही उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाचा पक्षाचे चिन्ह घेऊन थेट मतदान केंद्रात येत असल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केला आहे. याच मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट अचानक बदलण्यात आल्याचा देखील आरोप तृतीयपंथीयांनी केलाय...
बुलढाण्यात बोगस मतदानाचा उमेदवाराचा आरोप.
ग्रामीण भागातून खाजगी वाहनाद्वारे मतदार आणत असल्याचा काँग्रेस उमेदवाराचा आरोप.
बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्या करवी मतदार करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची ही माहिती आरोप करते उमेदवारांनी दिली आहे.
- वर्ध्यात मतदार यादीतील घोळ कायम
- प्रभाग विभाजनाचा मतदारांना बसतोय फटका
- एकाच घरातील मुलांचं एकीकडे तर वडिलांचं दुसरीकडे मतदान
- एकाच घरात राहणाऱ्या कुटुंबातील मतदान अलग अलग झाल्यानं मतदारात असंतोष
- मतदार फुटीचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता
- प्रशासन काय भूमिका घेतं याकडे लागलं लक्ष
कणकवली प्रभाग क्रमांक आठ वर इव्हीएम मशीन मध्ये बिघाड
मतदान प्रक्रिया सूरू होताच लक्षात आला बिघाड
अपक्ष उमेदवाराच्या चिन्हा समोरील बटन दाबत नसल्याने मतदान प्रक्रिया सुरु होण्यास लागला विलंब
तात्काळ बिघाड झालेल्या मशीन बदलल्या
१५ ते २० मिनिट उशिराने झाली मतदानाला सुरवात
परभणीच्या पाथरी येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या आहेत परभणी जिल्ह्याचे तापमान मागच्या आठवड्या पासून १० अंशाखाली गेलेले आहे आजही तापमान नऊ अंश आहे असं असतानाही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर रांगा मतदान केंद्र बाहेर लावल्या आहेत लावले आहेत पाथरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर शिवसेनेचे सईद खान तर काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांच्यामध्ये काट्याची लढत पाहायला मिळत आहे
नियमानुसार उमेदवार मतदार केंद्रावर येण्यास बंदी असताना सुद्धा मतदान केंद्राच्या आत येऊन आपला प्रचार करून लोकांना मतदान मलाच करा सांगताना पाहायला मिळत आहेत..असा आरोप विरोधक उमेदवार यांच्याकडून करण्यात आला..100 मीटरच्या बाहेर थांबण्याचा नियम असून सुद्धा नियमांची पायमल्ली करताना उमेदवार पाहायला मिळत आहेत.
मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर, शरद पवार गटाच्या उमेदवार अंजली जाधव यांनी बजावला मतदानाचा अधिकार
सकाळच्या टप्यातच उमेदवारांनी मतदानाचा अधिकार बाजवाला
मोहोळमध्ये यंदा पंचरगी निवडणूक होत असून भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी, ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट या सर्व पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत
मोहोळमध्ये यंदा दडपशाही गुंडागर्दी सारखे मुद्दे प्रचारात मोठ्या प्रमाणात गाजले होते
माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार रमेश कदम, आमदार राजू खरे या सर्वांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अंजली जाधव यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असं आवाहन केलंय
तर माजी आमदार रमेश कदम
यांनीही विकासाच्या मुद्यावर लोकांनी मतदान करावे असे आवाहन केलंय
सातारा:आझाद कॉलेज येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड
तांत्रिक अडचणीमुळे वोटिंग मशीन बंद
प्रभाग क्रमांक 16 मधील दोन नंबर बूट मधील मशीन बंद ..
मतदारांकडून अधिकचा वेळ वाढवून देण्याची मागणी..
सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या भाजपा उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा
मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडत केले मतदान
भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांनी मतदान केंद्राची पूजा करत केले मतदान
मोहोळ मध्ये पंचरंगी निवडणूक पाहायला मिळत आहे
सोलापूर जिल्ह्यात एकूण 12 पैकी 10 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज (वडसा) या 3 नगरपालिकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया चालायची. मात्र यावेळेस राज्यातील इतर ठिकाणाप्रमाणे साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 105 मतदान केंद्र असून तीनही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 26 तर नगरसेवक पदासाठी 352 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी तब्बल 1076 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व सालेकसा, गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण 98 जागांसाठी आज एकूण 209 मतदान केंद्रांवरून मतदान पार पडणार आहे. या चारही ठिकाणाचे एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार मतदानाचा हक्क बजावून निवडणूक रिंगणात असलेल्या 4 नगराध्यक्ष आणि 94 नगरसेवकांच्या भाग्याचा फैसला मतदानाचा हक्क बजावून करणार आहेत..... सकाळच्या सुमारास थंडीचा जोर असला तरी मतदार राजा मतदान केंद्र येताना दिसत आहे
रत्नागिरी -मतदानासाठी पोहोचला चक्क नवरदेव
लग्नाच्या आधी नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
राहुल शिवलकर असं नवरदेवाचे नाव
सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीची मतदानाला सुरुवात झालीं आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत मिळून यामध्ये नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ४१ उमेदवार, तर १८१ नगरसेवक पदांसाठी ५९४ उमेदवार रिंगणात आहेत. या आठही ठिकाणची निवडणूक आजी-माजी आमदार, खासदार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचार सुरु होता. पलूस, जत , विटा, पालिका निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत आहे. विटा आणि आटपाडीमध्ये महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या थेट संघर्षाचे चित्र आहे. उरुण ईश्वरपूर मध्ये शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. आष्ट्यात महायुतीच्या विरोधात आष्टा शहर विकास आघाडी, तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विरोधात विकास आघाडी अशी लक्षवेधी लढत आहे.
Maharashtra Election: राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
मतदानाच्या आदल्या रात्री बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात एका स्कुटीच्या डिकी मध्ये पैसे आणि धारदार शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली. एक संशयित तरुण फिरत असताना काही तरुणांनी त्याला अडवून विचारपूस केली. याच वेळी त्याच्या स्कुटीची झाडाझडती घेतल्यानंतर स्कुटीच्या टिक्की मध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पॉम्पलेट्स त्यामध्ये पैसे आणि धारदार शास्त्र आढळून आले. तरुणांनी संबंधित तरुणाला पेठ बीड पोलिसांना स्वाधीन केलं. मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीची मतदानाला सुरुवात झालीं आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत मिळून यामध्ये नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ४१ उमेदवार, तर १८१ नगरसेवक पदांसाठी ५९४ उमेदवार रिंगणात आहेत. या आठही ठिकाणची निवडणूक आजी-माजी आमदार, खासदार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचार सुरु होता. पलूस, जत , विटा, पालिका निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत आहे. विटा आणि आटपाडीमध्ये महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या थेट संघर्षाचे चित्र आहे. उरुण ईश्वरपूर मध्ये शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. आष्ट्यात महायुतीच्या विरोधात आष्टा शहर विकास आघाडी, तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विरोधात विकास आघाडी अशी लक्षवेधी लढत आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर , जव्हार आणि डहाणू या तीन नगरपरिषदा तर वाडा या नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान
चार ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीसाठी एक लाख 16 हजार 660 इतके मतदार मतदान करणार असून यासाठी 125 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत .
यामध्ये पालघर नगरपरिषद हद्दीत 56
डहाणू नगरपरिषद हद्दीत 41
जव्हार नगर परिषद हद्दीत 11
तर वाडा नगरपंचायत हद्दीत 17
मतदान केंद्रांवर सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे.
पालघर 55 हजार 727 मतदार
डहाणू 38 हजार 693 मतदार
जव्हार 9347 मतदार
वाडा नगरपंचायत मध्ये 12893 मतदार
जिल्ह्यात चार नगराध्यक्ष पदांसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 94 नगरसेवक पदांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं भविष्य आजमावणार आहेत.
डहाणूमध्ये भाजप शिवसेना सरळ लढत
पालघरमध्ये शिवसेना, भाजपा उबाठा ,काँग्रेस असा सामना
जव्हारमध्ये भाजपा ,शिवसेना राष्ट्रवादी (शरद पवार) असा तिरंगी सामना
वाडा नगरपंचायत मध्ये भाजपा ,शिवसेना, उबाठा ,राष्ट्रवादी ( अजित पवार) असा चौरंगी सामना रंगणार आहे
* नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान...
* जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार...
* नगराध्यक्ष व सदस्य पदांचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद...
* नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
* मतदान प्रक्रियेसाठी अडीच हजार शासकीय कर्मचारी सेवेत...
* संवेदनशील बूथवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असणार...
* अकरा नगरपरिषदांमध्ये महायुतीतील अंतर्गत लढती ठरणार महत्वाच्या...
* भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, पिंपळगाव, ओझर, इगतपुरी — येथे महायुती आमने–सामने...
चंद्रपूर जिल्ह्यात थोड्याच वेळात नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 9 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे आणि यासाठी जवळजवळ 3 लाख 39 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नागपूर जिल्ह्यात 15 नगर परिषद व 12 नगर पंचायत साठी आज मतदान होत आहे.
यासाठी 167 नगराध्यक्ष पदाच्या व 2 हजार 216 नगर सेवक पदासाठी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे.
कामठी नगरपरिषद हि नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद आहे. येथे 17 प्रभागात 34 नगर सेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी मतदान होईल.
ईव्हीएम मधील उमेदवारांचा क्रम कसा असेल, कोणत्या क्रमांकावर कोणत्या उमेदवाराचे नाव असेल याची इत्यंभूत माहित मतदारांना मिळावी यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर आयोगाने डमी बॅलेट क्रम लावलेले आहे. जेणेकरून मतदारांना मत करणे सोईचे होईल.
बिबट्याच्या भीतीचं सावट आपण उत्तर पुण्यातील निवडणुकीचा प्रचारावर पाहिलं. या बिबट्याच्या दहशतीमुळं अंधार पडण्यापूर्वी मतदारांपर्यंत पोहचण्याचं आव्हान उमेदवारांसमोर होतं तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसारख्या दिग्गज नेत्यांना ही सभेला गर्दी हवी म्हणून दिवसा सभा घेण्याची वेळ आली. आता या प्रचाराप्रमाणे आजच्या मतदानावर बिबट्याच्या दहशतीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या सकाळ-सकाळ ही दबा धरुन बसतो, मतदानाला बाहेर पडल्यावर हा बिबट्या आपल्यावर हल्ला करतो की काय? अशी भीती या मतदारांमध्ये असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं सकाळच्या सत्रात मतदान केंद्र ओस पडण्याची अथवा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उमेदवार या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी कंबर कसताना पहायला मिळतील.
अमरावती जिल्ह्यात आज 11 नगर पालिका, 2 नगर पंचायतीची निवडणूक
अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला
अमरावती जिल्ह्यातील 11 नगर पालिका आणि नगर पंचायती साठी नगराध्यक्ष पदासाठी 64 उमेदवार असून नगरसेवक पदासाठी एकूण 1048 उमेदवार रिंगणात आहे..
अचलपूर, चांदूर बाजार, चांदुर रेल्वे, दर्यापुर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड, चिखलदरा येथील नगर पालिका आणि धारणी, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या निवडणुक होणार आहे...
सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अचलपूर, चिखलदरा, धारणी, दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे नगर पालिकेकडे
निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरवातीला 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल लागेल, असे जाहीर केले होते. मग न्यायालयीन अपिलाचा पेच निर्माण झालेल्या संस्थांत 20 डिसेंबरला मतदान 21 डिसेंबरला मतमोजणीचा आदेश काढण्यात आला. त्यावर औरंगाबाद खंडपीठात काल झालेल्या सुनावणीवेळी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीचा निकाल 21 डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली. त्यावर निवडणूक विभागाचे वकील वकीलांनी यासंदर्भातील निवेदन आज दुपारच्या सुमारास करण्यात येईल, असे सांगितले. पैठण, कोपरगाव, अंबाजोगाई, उदगीरच्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांची तयारी झाली आहे. निवडणूक अधिकारी आणि स्टाफ केंद्रांवर पोहोचला आहे. म्हणून न्यायालयाने जेथे निवडणूक होणार आहे त्यांना परवानगी दिली.
नागपूर जिल्ह्यात 15 नगर परिषद व 12 नगरपंचायत साठी आज मतदान होत आहे. त्याआधी निवडणूक आयोगाची मतदानासाठीची प्ररिया पूर्ण झाली. सकाळी 7:30 ला मतदानाला सुरवात होत आहे. त्याआधी कामठी नगर परिषदेच्या खतिजा भाई उर्दू गर्ल्स स्कुलच्या मतदान केंद्रावर उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर मॉक पोल करून दाखवला गेला.
विदर्भ लक्षवेधी लढती
कामठी नगराध्यक्ष पद
भाजप उमेदवार अजय अग्रवाल
अजय कदम, बहुजन रिपब्लिकन एकता मंच उमेदवार
शकूर नागानी, काँग्रेस उमेदवार
सावनेर नगरपरिषद, नगराध्यक्ष उमेदवार
संजना मंगळे, भाजप
सीमा चाफेकर, काँग्रेस
रामटेक नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार
ज्योती कोल्हेपरा, भाजप
बिकेंद्र महाजन, शिवसेना शिंदे
रमेश कारेमोरे, काँग्रेस
काटोल नगरपरिषद नगराध्यक्ष पद उमेदवार
अर्चना देशमुख, शेकाप (राष्ट्रवादी शरद पवार गट पाठिंबा)
कल्पना उमप, भाजप
कळमेश्वर नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार
अविनाश माकोडे, भाजप
ज्योत्सना मंडपे, काँग्रेस
उमरेड नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार
शालिनी सोनटक्के, शिवसेना शिंदे गट
सुरेखा रेवतकर, काँग्रेस
प्राजक्ता आदमने, भाजप
पुसद नगरपरिषद
मोहिनी नाईक- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
निखिल चिद्दरवार- भाजप
महंमद नदीम अब्दुल रशीद-काँग्रेस
अनिल ठाकुर- शिवसेना उबाठा
भंडारा - शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ अश्विनी भोंडेकर या शिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेस (जयश्री बोरकर), भाजप (मधुरा मदनकर), अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (सुषमा साखरकर) चे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बुलढाणा - आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड x काँग्रेसच्या लक्ष्मी काकस x भाजपाच्या अर्पिताताई विजयराज शिंदे
उत्तर महाराष्ट्र लक्षवेधी लढती
नाशिक जिल्हा
त्रंबकेश्वर नगरपरिषद
आगामी सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वर मध्ये भरत असल्यानं त्रंबकेश्वर नगर परिषदेला महत्त्व. भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र. हजरो कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, कुंभमेळा निमित्ताने त्रंबकेश्वर चे ब्रँडिंग जगाच्या पाठीवर होणार यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी जोर लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ त्रंबकेश्वर पासून केला तर एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या दिवशी सभा घेत विकास कामाचे आश्वासन दिले
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
कैलास घुले (भाजप)
सुरेश गंगापुरे (राष्ट्रवादी अजि.)
त्रिवेणी तुंगार- सोनवणे (शिवसेना)
दिलीप पवार (माविआ)
सिन्नर नगरपरिषद
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा पणाला. कोकाटे याना भाजप ने दिले कडवे आव्हान, भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढत
हेमंत वाजे (भाजप)
प्रमोद चोथवे (माविआ)
विठ्ठलराजे उगले (राष्ट्रवादी अजि.)
नामदेव लोंढे ( उबाठा)
येवला नगरपरिषद
येवला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) व भाजप युती असून राजेंद्र लोणारी हे त्यांचे उमेदवार आहेत तर शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) अशी युती होऊन रुपेश दराडे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे..या निवडणुकीत आमदार दराडे बंधूंनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध या निवडणुकीच्या माध्यमातून दंड थोपटले आहे..तर भुजबळ कुटुंबियांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली..संपूर्ण भुजबळ कुटुंबच येवल्यात प्रचाराला मैदानात उतरले आहे.. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली तर मंत्री छगन भुजबळ यांनी तब्येत बरी नसतांना हॉस्पिटलमधून ऑनलाईन सभा घेत येवलेकरांशी संवाद साधत भावनिक साद घातली...त्यामुळे येवल्यातील निवडणूक ही इंटरेस्टेड झाली आहे...
राजेंद्र लोणारी (भाजप-राष्ट्रवादी)
रुपेश दराडे (शिवसेना शिंदे - राष्ट्रवादी शप)
जळगांव जिल्हा
मुक्ताईनगर नगरपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीं खडसे यांच्यां बालेकिल्लातच राष्ट्रवादी काँग्रेस चा उमेदवार नाही. शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात लढाई असून खडसे यांचाभाजप ला छुपा पाठींबा असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुक्ताई नगर शहरात ताकद नसल्याचे स्पष्टीकरण देत एकनाथ खडसे यांनी आयत्यावेळी नगर पंचायत निवडणुकी साठी उमेदवार न दिल्याने महा विकास आघाडी होऊ शकली नाही त्यामुळे शिंदे गटाचे आ चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील आणि भाजपा च्या भावना महाजन यांच्या मध्ये या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एकूण सतरा जागा साठी ही निवडणूक होत असून शिंदे गट आणि भाजप हे सगळ्या सतरा जागा लढवित आहेत. तर काँग्रेस चार आणि अजित दादा पवार यांच्या तीन अशा एकूण सात जागा इतर पक्ष लढवित आहेत. खडसे यांनी आपल्या सुनबाई रक्षा खडसे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार उभा केला नसल्याचा आरोप केला जात आहे. खडसे मात्र या विषयावर मौन बाळगून आहे एन वेळी खडसे यांनी दगा दिल्याने, महा विकास आघाडी सगळ्या जागी आपले उमेदवार देऊ शकले,नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे
भावना ललित महाजन (भाजप)
संजनाताई चंद्रकांत पाटील (शिवसेना)
पाचोरा नगरपरिषद
जळगाव जिल्ह्यात पाचोरा नगर परिषदेची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे
भाजप ने नेहमीच आपल्याशी दगाबाजी केल्याने आपण,भाजपा सोबत युती करू शकत नसल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या आ किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची राज्यात पहिल्यांदा घोषणा केली होती. त्यांच्या पत्नी सुनीता पाटील या शिंदे गटाच्या नगरराध्यक पदाच्या उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात भाजपा च्या सुचेता वाघ या उभ्या आहेत मात्र या ठिकाणी किशोर पाटील यांच्या भगिनी ही भाजपा सोबत असल्याने,त्या आपले बंधू आ किशोर पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचं चित्र आहे
सुनीता किशोर पाटील (शिवसेना शिंदे)
सुचेता दिलीप वाघ (भाजप)
अहिल्यानागर जिल्हा
संगमनेर नगरपरिषद
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर ची निवडणूक इंटरेस्टिंग आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुक तांबे थोरात यांच्या विरोधात विखे आणि खताळ यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे... विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसमधून निलंबित असलेले सत्यजित तांबे यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात आहे.. तर दुसरीकडे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भावजई निवडणूक रिंगणात आहे... विधानसभा निवडणुकीतील पराभवा नंतर बाळासाहेब थोरात सक्रीय असून मतदारांच्या भूमिकेकडे सेवांचे लक्ष लागले आहे.. चाळीस वर्षानंतर विधानसभेत झालेले परिवर्तन पुन्हा पालिकेत होणार का हे पाहणं महत्त्वच आहे...
- नगराध्यक्ष उमेदवार --- मैथिली सत्यजित तांबे ( विद्यमान आमदार सत्यजित यांच्या पत्नी )
- भाजप सेना युती नगराध्यक्ष उमेदवार- सुवर्णा संदीप खताळ.. ( विद्यमान सेना आमदार अमोल खताळ यांच्या भावजई )
जामखेड नगरपरिषद
नगर (दक्षिण) जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद निवडणूक ही रंगतदार होणार आहे
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे , राष्ट्रवादी SP चे आमदार रोहित पवारांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे...
या नगरपरिषद निवडणुकीत सर्वच पक्ष वेगळे लढत आहेत...
भाजप , शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस , आणि राष्ट्रवादी Sp ने येथे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले आहेत...
भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतले तर शिवसेना शिंदे गटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली...
रोहित पवारांना जामखेडमध्ये तळ ठोकून बसावं लागलं...
प्रांजल अमित चिंतामणी (भाजप)
संध्या शहाजी राळेभात (राष्ट्रवादी शप.)
पायलताई आकाश बाफना (शिवसेना शिंदे)
सुवर्णा महेश निमोणकर (राष्ट्रवादी अजि.)
सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक आज होत असून यातील अनगर आणि मंगळवेढा या दोन ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे.आज मतदान होत असलेल्या यातील दहा नगरपालिकांमध्ये सात ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होत असल्याने दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा प्रथमच सर्व नगरपालिकेत कमल चिन्हावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने भाजपचे चिन्ह वर पोहोचवण्यात त्यांना यश आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ,कुर्डूवाडी , करमाळा, मोहोळ, अक्कलकोट ,दुधनी आणि मैंदर्गी अशा सात नगरपालिकात भाजप सेनेमध्ये दोस्तीत कुस्ती होतानाचे चित्र आहे. यातील सांगोल्याची निवडणूक सुरुवातीपासून गाजत असून शहाजी बापू पाटलांना एकटे टाकल्यानंतरही त्यांनी सत्ता राखण्यासाठी जोरदार टक्कर दिली आहे. विरोधी महाविकास आघाडी मधून अकलूज नगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुतारी चिन्हावर उभाठाला सोबत घेत पॅनल उभा केल आहे. याच पद्धतीने कुर्डूवाडी नगरपालिकेत थेट शिंदे सेने सोबत युती करून भाजपला आव्हान दिली आहे.
मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा. नाकाबंदीत मालवण पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीत रोख रक्कम पकडली. 10 वाजता प्रचार संपल्या मध्यरात्री पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकार यांच्या MH-07- AS-6960 या कार मध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख अडाळून आली.
मालवण पोलीसानी सदर वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस स्थानकात आणले असता मालवण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात येऊन सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.शिवसेनेचे आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातुन मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष... भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील चक्की शेडमधून पैसे वाटतांना व्हिडीओ व्हायरल, राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत ५०० रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी केली आहे. अमोल चिल्लावार हा नगरसेवक पदासाठी उभा आहे. चिल्लावार यांचे घराचे मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेड मधून हे वाटप होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या व्हिडीओ मध्ये चिल्लावार यांचे हातात पाचशे रूपयांची गड्डी दिसत आहे. रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचं आणि ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुख यांचेकडे पाठवल्याचं राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितलं आहे.
बुलढाण्यातील नांदुरा नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आज होणार आहे. मात्र आदल्या दिवशी रात्रीच प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरू होणार आहे अनेक मतदान केंद्रावर मोल सुरू असून निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 1600 मतदान कर्मचारी आणि पंधराशे पोलीस कर्मचारी या प्रक्रियेसाठी तैनात आहेत... बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांसाठी 82 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी तर 1078 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत आणि थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे
उज्वला थिटे किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला नव्याने अर्ज दाखल करता येणार नाही
आयोगाच्या सूचनानुसार केवळ अर्ज माघार आणि चिन्ह वाटप प्रक्रिया होईल, नव्याने कोणतेही अर्ज दाखल होणार नाही
अनगरचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांची माहिती
त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणुकीत प्राजक्ता पाटील बिनविरोध राहणार हे निश्चित, केवळ अधिकृत घोषणा लांबणीवर
29 तारखेला आयोगाचे जे पत्र आले आहे त्यामध्ये जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर अर्ज वैध असलेल्या उमेदवारांना तीन दिवसाचा वेळ अर्ज माघारी घेण्यासाठी द्यावा लागतो
29 नोव्हेबरचे जे पत्र आहे त्यामध्ये आयोगाने कुठेही नव्याने अर्ज दाखल करण्याच्या उल्लेख नाही
केवळ चिन्ह वाटप आणि अर्ज माघार एवढंच फक्त आयोगाने सांगितलं आहे
त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला नव्याने अर्ज दाखल करता येणार नाही
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट; तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळित पोहचली आहेत. उद्या सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Nagarparishad LIVE: मतदानाची वेळ संपली, पण अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा