Maharashtra Nagarpanchayat Election LIVE Updates : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Nagarpanchayat Election LIVE Updates : OBC आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर आज मतदान. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23, पंचायत समितीच्या 45 जागांसाठीही मतदान.

abp majha web team Last Updated: 18 Jan 2022 11:35 AM
डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड

डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. 4 फेब्रुवारीपासून ते पदभार स्वीकारणार आहेत.

अकोले नगरपंचायतीच्या निवडणूकीत सरासरी 80.52 टक्के मतदान

अकोले नगरपंचायतीच्या निवडणूकीत सरासरी 80.52 टक्के मतदान झाले आहे. चार जागांसाठी हे मतदान पार पडले आहे. 

रायगड जिल्ह्यातील नगरपंचयत निवडणुकीत 78.09 टक्के मतदान... 

रायगड जिल्ह्यातील नगरपंचयत निवडणुकीत 78.09 टक्के मतदान झालं आहे. यावेळी पोलादपूर येथे सर्वाधिक 86.28 तर पाली येथे 85.87 टक्के मतदान झालं आहे. आज जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीत मतदान झाले.


जिल्ह्यातील ६ नगरपचांयत मध्ये २१ जागांसाठी मतदान...



पाली        85.87%
खालापुर   76.49%
तळा         75.26%
म्हसळा     69.49%
पोलादपुर   86.27%
माणगाव    75.37%

मानोरा नगरपंचायतीमध्ये 5:30 वाजेपर्यंत 76.3 टक्के मतदान

मानोरा नगरपंचायतीमध्ये 5:30 वाजेपर्यंत 76.3 टक्के मतदान झाले आहे. 

बोदवड नगर पंचायत निवडणूक : साडेतीन वाजेपर्यंत 54.76 टक्के मतदान


बोदवड नगर पंचायत निवडणूक : साडेतीन वाजेपर्यंत 54.76 टक्के मतदान झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगर पंचायत साठी सकाळी 3.30 पर्यन्त 78.26% तर संग्रामपूर नगर पंचायती साठी 74.1% मतदान झाले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीमधील 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान

गडचिरोली  जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. यात अहेरी नगरपंचायतीकरीता  649 मतदारांनी (स्त्री – 320, पुरुष – 329 मतदार, एकूण टक्केवारी 80.82 ), सिरोंचा नगर पंचायतीकरीता 900 मतदारांनी (स्त्री – 475, पुरुष – 425 मतदार, एकूण टक्केवारी 81.23 ), चामोर्शी येथे 2375 मतदारांनी (स्त्री – 1178, पुरुष – 1197 मतदार, एकूण टक्केवारी 88.32), धानोरा येथे 272 मतदारांनी (स्त्री – 141, पुरुष – 131 मतदार, एकूण टक्केवारी 89.77 ), कुरखेडा येथे 676 (स्त्री – 351, पुरुष – 325 मतदार, एकूण टक्केवारी 84.18 ), यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदानाची वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत होती. यात सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. पाच नगर पंचायतीच्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. 

परभणी जिल्ह्यातील लम नगर पंचायत च्या एकुण 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार

परभणी जिल्ह्यातील एकमेव नगर पंचायत असलेल्या पालम नगर पंचायत च्या एकुण 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली उद्या सकाळी 10 पासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ची मतदान आकडेवारी 

देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ची मतदान आकडेवारी 


मतदान आकडेवारी 
वेळ - सकाळी 7:30 ते 1:30
पुरुष - 875
स्त्री -954
इतर -. ०
टक्के वारी - 52%

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी मतदान सुरू, पाटण आणि कोरेगावची जोरदार चर्चा

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये तालुक्यातील दोन नगरपंचायती सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातील एक पाटण येथे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळत आहे. त्याचबरोबर  कोरेगाव तालुक्यातील मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा गट आणि आमदार महेश शिंदे यांचा गट आमने-सामने ठाकले आहेत. या कोरेगाव मतदारसंघातीलमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आपले उमेदवार कसे विजय होतील. यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  


 

सोलापूर जिल्ह्यातील 19 नगरपंचायत जागांसाठी उत्साहानं मतदान सुरु

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते , श्रीपूर महाळुंग , माढा आणि वैराग या पाच नगरपंचायत मधील 19 जागांसाठी आज सकाळीपासून मोठ्या उत्साहाने मतदानास सुरुवात झाली . माळशिरस नगरपंचायत मधील अपक्ष उमेदवार ताई वावरे यांच्या विरोधातील राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ताई वावरे या एकमेव उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने 19 जागांवर आज मतदान होत आहे . माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, श्रीपूर महाळुंग या तीन नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे वर्चस्व पणाला लागले असून नातेपुते आणि श्रीपूर या दोन नगरपंचायतीमध्ये मोहिते पाटील यांच्यातील वेगवेगळ्या गटात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. याशिवाय मोहिते पाटील यांच्याशिवाय लढणाऱ्या राष्ट्रवादीची ताकद देखील यावेळी समजणार असल्याने या सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीच्या लढती होत आहेत . माढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला उमेदवार मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागली असली  पुन्हा दादा साठे विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत दिसत आहे. आज माढा येथे देखील अतिशय उत्साहाने मतदानाला सुरुवात झाली असून चक्क 108 वर्षे वयाच्या इंदुबाई देवकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

सातारा जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 24 जागांसाठी आज मतदान होत आहे

सातारा जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 24 जागांसाठी आज मतदान होत आहे.नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 82 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी 150 हुन अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 24 जागांसाठी 16 हजार 837 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतमोजणी उद्या 19 जानेवारी रोजी होणार आहे.

पुणे : देहू नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान

पुण्यात एकमेव देहू नगरपंचायतीची निवडणूक पार पडत आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सकाळच्या सत्रात थंड प्रतिसाद मिळाला. वाढत्या थंडीमुळे उमेदवारांची चिंता वाढवली. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत निर्मिती झाल्यानंतर इथं पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

ओबीसी आरक्षण स्थगित झाल्याने नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर मतदान, काय आहे नाशिकची स्थिती

Maharashtra : राज्यात आज 93 नगरपंचायतीच्या निवडणुका, एकूण 336 जागांसाठी निवडणूक

OBC Reservation स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयात, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक

वाशिम : मानोरा नगर पंचायतीमध्ये चौरंगी लढत

वाशिम : मानोरा नगर पंचायतीमध्ये चौरंगी लढत. 4 जागांकरिता आज मतदान. वाशिमच्या मानोरा नगर पंचायतीच्या एकूण 17 जागेपैकी 13 जागांवर 21 तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र obc च्या मुद्या वरून रिक्त झालेल्या 4 जागांकरिता आज निवडनुक होऊ घातली आहे. त्या करिता आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या करिता 1777 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर उद्या मत मोजणी होणार असून यामध्ये कोणता पक्ष आपला झेंडा नगर पंचायतीवर लावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पुण्यात एकमेव देहू नगरपंचायतीची निवडणूक पार पडत आहे

पुण्यात एकमेव देहू नगरपंचायतीची निवडणूक पार पडत आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सकाळच्या सत्रात थंड प्रतिसाद मिळाला. वाढत्या थंडीमुळे उमेदवारांची चिंता वाढवली. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत निर्मिती झाल्यानंतर इथं पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागांसाठी मतदान
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे, सतरा जागा पैकी उर्वरित चार जागांसाठी आज मतदान होत असून पंधरा उमेदवार रिंगणात आहे.

राज्यात आघाडी सरकार असले तरी या निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र पने लढत आहे.  एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील ही निवडणूक होत असल्याने एकनाथ खडसे,गिरीश महाजन,आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील या नेत्यांच्या प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या बोदवड तहसीलदार कार्यालय परिसरात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 5 नगर पंचायत निवडणूक 

यवतमाळ  जिल्ह्यातील कळंब, बाभूळगाव, राळेगाव , मारेगाव, महागाव या  5 नगर पंचायतच्या 18 जागेसाठी आज मतदान होत आहे. यापूर्वी 84 जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान झाले मात्र ओबीसी आरक्षणामुळे या 18 जागेवरच मतदान लांबणीवर पडले होते  सकाळी पासून मतदानाला सुरवात झाली असून  संध्याकाळी 5.30 वाजे पर्यंत मतदान आहे. 


राळेगाव- 3 जागेसाठी 18 उमेदवार निवडूक रिंगणात


बाभूळगाव- 4 जागेसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगगणात


कळंब-- 4 जागेसाठी 29 उमेदवार


मारेगाव -- 3 जागेसाठी , 22 उमेदवार, 


महागाव --4 जागेसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत.

दापोली, मंडणगड : नगरपंचायत सर्वत्रीक निवडणूक मतदान, उर्वरित चार प्रभागांसाठी आज मतदान

दापोली मंडणगड मतदारसंघात नगरपंचायत निवडणूक उर्वरित चार जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. अवघ्या राज्याच लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे. माजी मंत्री शिवसेना रामदास कदम आणि सध्याचे परीवहन मंत्री शिवसेना अनिल परब यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज मतदान तर उद्या मतमोजणी असणार आहे.

ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांसाठी आज मतदान

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय.

पार्श्वभूमी

Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 


105 नगरपंचायतीपैकी पालघर-तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार-धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, यवतमाळ-झरी-जाणणी, गडचिरोली-मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.  उरलेल्या 95 नगरपंचायतीपैकी माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान होणार आहे.


ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे 106 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या जागा खुल्या गटात समजल्या जाणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर 27 टक्के जागा या खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या.  21 डिसेबंरला झालेल्या 11 नगरपंचायतीच्या निवडणुका आणि आज होणाऱ्या निवडणुका यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे, 19 जानेवारीला होणार आहे. मतदानाला सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु झालं असून आणि संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान असेल. 



दरम्यान, 19 जानेवारी 2022 रोजी मागच्या 13 आणि या 4 अशा एकूण 17 प्रभागात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. तसेच उमेदवारांसह मतदारांचंही निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. नगरपंचायतीत कोण बाजी मारणार? किती नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.