मुंबई :  महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी गाव म्हणजे भारतातील अशा काही गावांमधील एक आहे, ज्यांची सीमा दोन वेगवेगळ्या राज्यात आहे. वेवजी गाव हे निम्म महाराष्ट्रात आणि निम्म गुजरातमध्ये असून आता मात्र या गावचा सीमाप्रश्न लवकरच सुटणार आहे. सध्या या गावच्या सीमा निश्चितीला प्रारंभ झाला आहे. दोन दिवसात मोजणीला सुरूवात देखील होणार आहे. पण अशाचवेळी महाराष्ट्र आणि गुजरात याच राज्यांच्या सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरचा प्रश्नही समोर येत आहे. नवापूर रेल्वे स्थानक असं स्थानक आहे ज्याचा अर्धा बाक महाराष्ट्रात तर अर्धा बाक गुजरात राज्यात येतो. याठिकाणी सूचना देखील मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांमध्ये होतात. तर नेमका नवापूर रेल्वे स्थानकाचा वाद काय आहे? हे जाणून घेऊया...


महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी गावाची सीमा निश्चितीला प्रारंभ झाला असून दोन दिवसात मोजणीला सुरूवात होणार आहे. पण अशाचवेळी महाराष्ट्र आणि गुजरात याच राज्यांच्या सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरचा प्रश्नही समोर येत आहे. नवापूर रेल्वे स्थानक असं स्थानक आहे ज्याचा अर्धा बाक महाराष्ट्रात तर अर्धा बाक गुजरात राज्यात येतो. याठिकाणी सूचना देखील मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांमध्ये होतात. या निमित्ताने  नवापूर रेल्वे स्थानकाचा प्रश्न समोर येत आहे.  


नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्टेशन भारत देशात एक मात्र रेल्वे स्टेशन आहे. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या चार भाषेत सूचना दिल्या जातात. नवापूर रेल्वे स्टेशन महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात आहे. पूर्व दिशेत महाराष्ट्र आणि पश्चिम दिशेत गुजरात रेल्वे स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट घेणारा महाराष्ट्रात असतो तर रेल्वे स्टेशन मास्तर गुजरात राज्यात असतो. स्थानकावरील  एक लाकडी बाक महाराष्ट्र गुजरात राज्यात सीमेवर ठेवण्यात आला आहे. अर्धा बाक महाराष्ट्रात तर अर्धा बाक गुजरात राज्यात आहे.


महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील नवापूर रेल्वे स्थानकाची ओळख  केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला करून दिली होती.  या स्टेशनची वेगळी ओळख अशी की, स्टेशनचा पूर्वेकडील भाग महाराष्ट्रत तर उत्तरेकडील भाग गुजरातमध्ये विस्तारलेला आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन एक रेषा ओढून सीमा दाखवल्या आहेत. तसंच दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मजवळ सीमा दर्शवणारी पाटी लावण्यात आली आहे. नवापूर रेल्वे स्थानकाची स्थापना स्वतंत्रपूर्व इंग्रजीच्या काळातील आहे. या रेल्वे स्थानकाची आता दुरुस्ती करण्यात आली असून विशेष म्हणजे तिकीट घेणार गुजरात राज्यात  आणि तिकीट देणारा महाराष्ट्रात असतो.  हे रेल्वे स्टेशन दोन राज्यातील समन्वयकाचे प्रतिक असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात


नवापूर रेल्वे स्थानकात अनेक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नाही त्यामुळे असुविधा असल्याचे नागरिक सांगतात.  त्याच सोबत या स्थानकावर अपघात किंवा एखादा गुन्हा घडल्यास या ठिकणी हद्द कुणाची यावरून मोठा संभ्रम निर्माण होतो.   


नवापूर रेल्वे स्टेशनची एकूण लांबी 800 मीटर आहे. महाराष्ट्र 300 मीटर गुजरात राज्यात 500 मीटर येते 


महाराष्ट्रात काय आहे?



  • तिकिट ऑफिस 

  • रेल्वे सुरक्षा बल आऊट पोस्ट 

  • वरिष्ठ रेल्वे निरीक्षक ऑफिस

  •  बगीचा 

  • रेल्वे फाटक 

  • रिक्षा स्टॅन्ड 

  • एक ब्रीज

  • 88 कर्मचाऱ्यांचे निवास स्थान 


गुजरात राज्यात काय आहे?



  • स्टेशन मास्तर ऑफिस 

  • वेटिंग रूम

  • पॉवर पेनल रूम

  •  शौचालय 

  • पाण्याची टाकी 

  • एक ब्रीज

  • 15 कर्मचारी निवास


महाराष्ट्र- गुजरात सीमाप्रश्न अधूनमधून चर्चेत येतो, दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जातात आणि पुन्हा तसेच काही निमित्त येईपर्यंत त्याची पुढे चर्चा होत नाही. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी  गावाच्या सीमा निश्चितीला सुरुवात झाल्याने रेल्वे स्थानकाचा प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे. 


महाराष्ट्रात, रेल्वे पकडा गुजरातमध्ये" >नवापूर स्टेशनची नवलाई