Devendra Fadnavis :  छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांवर टीका होत आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला त्यामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांवर टीका केली. सत्ताधारी पक्षांकडून होत असणाऱ्या टीकेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडले. 


एक तर जाणीवपूर्वक घटनाबाह्य कृती करायची आणि नंतर राज्यपाल विरोधात बोलायचं. एक प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते घटनेप्रमाणे काम करतात. त्यामुळे त्यांना टार्गेट करणं अतिशय चुकीचे आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांनी त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला त्याबद्दल बोलताना फडणवीसांनी हे सर्व ऐकून माझे मनोरंजन होते अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या या आरोपांत काहीच तथ्य नाही. संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. 






राज्यपालांना सत्ताधारी पक्षाकडून मुद्दाम लक्ष्य केलं जात आहे.  महाविकास आघाडीकडून संविधानात न बसणारं काम केलं जात असल्याचा दावा करत हे काम दाखवून दिल्यावर राज्यापालांना टार्गेट केलं जातं आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Devendra Fadnavis : OBC आरक्षणाबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही, देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक 
OBC Reservation : मध्यप्रदेशप्रमाणं राज्य सरकारनं कायद्यात बदल करावा, आम्ही पाठिंबा देऊ : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : राज्यपालांना टार्गेट करणं हे अयोग्य आहे Nagpur ABP Majha