Maharashtra Municipal Election 2021 : राज्यात आगामी काळात मुंबई (Mumbai), पुण्यासह काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. राज्यात आगामी महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, 'मिशन महापालिके'चा भाग म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आता चाचपणी सुरु केली आहे. महापालिकेसोबतच जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचाही बिगूल ते वाजविणार आहेत.


अचानक मतदारसंघातील विकासकामं करण्यासाठी भेटीगाठी


पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad), बृहन्मुंबई, ठाणे (Thane), उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल (Panvel), मिरा-भाईंदर, सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), मालेगाव, परभणी (Parbhani), नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वॉर्डप्रमाणे व्यूहरचना आखण्याच्या सूचना राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षश्रेष्ठींनी पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत. त्याचे पडसाद आता राज्यात ज्या ठिकणी निवडणुका आहेत. तिथे उमटू लागले असून, अचानक मतदारसंघातील विकासकामं करण्यासाठी पदाधिकारी आणि इच्छुक आता आमदारांच्या, पक्षश्रेष्टींच्या गाठीभेटी घेण्याचं प्रमाण वाढवलं आहे. 


ग्रांऊड लेव्हलचा आढावा घेतल्यानंतर 


येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधीच प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. त्यात आता या आठवड्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकी ही पक्षानं आयोजित केलेल्या आहेत, अशी माहिती आहे. आगामी महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी करा, अशा सूचना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना  दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते ही कामाला लागले आहेत. शिवसेना शाखाप्रमुख तसेच गटप्रमुख हे आपल्या विभागातील सर्व माहिती गोळा करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देखील वॉर्डात फिरून मोर्चेबांधणी करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचं ग्राउंड लेव्हलवर मोठ्या प्रमाणात काम सुरु झालं आहे. ग्राउंड लेव्हलचा आढावा घेऊन पुढे इच्छुक उमेदवारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार, वॉर्डातील उमेदवारांची चाचपणी पुढे होणार, अशी माहिती मिळत आहे.


प्रभागरचनेत बदल; त्यानुसार रणनीती


मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर इतर सर्व महापालिकेत 3 सदस्यीय प्रभार पद्धत असेल. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय, तर नगरपंचायतीला 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे, असं ठाकरे सरकारनं काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला.मात्र तरीही राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत.त्यात आता नवीन प्रभाग रचनेनुसार रणनीती सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह