Maharashtra Rain LIVE UPDATE : राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पाहा प्रत्येक ठिकाणचे अपडेट

Maharashtra Rain Update : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Sep 2021 06:45 PM

पार्श्वभूमी

नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी...More

मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस

 मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने उसंत घेतली होती.मात्र आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि आजू बाजूच्या परिसरात गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे.याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो आहे.घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर असल्फा मेट्रो स्थानक ते साकीनाका मेट्रो स्थानकच्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.रस्त्यावर या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी आहे.या मुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.