Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : पालघर जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल 138 मिमी पावसाची नोंद
Breaking News LIVE Updates, 18 June 2021: दिवसभरातील पावसाच्या ताज्या बातम्या, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील.
पालघर जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल 138 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक पाऊस पश्चिम किनारपट्टी भागातील बोईसर,चिंचणी ,वाणगाव ,डहाणू भागात झाला. रात्रीपर्यंत जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी सुरूच होत्या. चिंचणी वाणगाव रस्त्याचे काम सुरू असल्याने बावडे येथे बनविलेला पर्यायी रास्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. सध्याही आकाश ढगाळ असून पावसाचा जोर कायम आहे
कर्नाटकातील हिप्परगी धरणातून 72000 क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांची पाणी पातळी घटणार असल्याने कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक पाऊस आहे. आतापर्यंत या मोसमात 539 मिलीमिटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 392 मिलीमिटर इतक्याच पावसाची नोंद झाली होती.
लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक पाऊस आहे. आतापर्यंत या मोसमात 539 मिलीमिटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 392 मिलीमिटर इतक्याच पावसाची नोंद झाली होती.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पाऊस कोसळत आहे. अशात भिवंडी ग्रामीण भागातील पूर्णा गावच्या हद्दीत रस्त्यांवर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आलं आहे. तसंच झाकण नसल्याने रस्त्याकिनारी असलेले मॅनहोल उघडे आहेत. काल (17 जून) संध्याकाळच्या सुमारास एक महिला कामावरुन घरी परतत असताना अचानक मॅनहोलमध्ये पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. दुखापतीमुळे तिला मॅनहोलमधून बाहेर पडता येत नव्हतं. त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आलं आहे. परिसरात असे अनेक मॅनहोल उघडे असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवरील बॅरेज पाणीपातळी नियंत्रणासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दोन गेट अर्धा मिटरने उघडण्यात आले. सारंगखेडा बॅरेजमधून तीन हजार 197 आणि प्रकाशा बॅरेजमधून तीन हजार 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला.
पार्श्वभूमी
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर, 12 तासात पाणी पातळीत तीन फुटांनी वाढ
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. चंदगड- गडहिंग्लज राज्य महामार्गावर भडगावजवळ पाणी आलं आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नरसोबावाडी मधील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधील श्रीदत्त मंदिरात चालू सालचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे 2 वाजता संपन्न झाला.
पुढील 3-4 तासांत नवी मुंबई, रायगडसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे
कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करणार
साताऱ्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून पाणी सोडलं जाणार आहे. 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणी साठा आहे. तर धरणात 25 हजारांपेक्षा जास्त क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेसह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड परिसरात मुसळधार पाऊस सुरुच आहे.
सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांच्या जवळ
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी 23 फुटांच्या जवळ पोहोचली असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -