Rain Update LIVE: मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीने, वाहतुकीसह जनजीवनावर परिणाम

Maharashtra Mumbai Rain Update LIVE : महाराष्ट्रात आजही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई उपनगर आणि कल्याणमध्ये विविध भागात पाणी साचलंय, ज्यामुळे रेल्वे उशिराने चालतेय

ज्योती देवरे Last Updated: 14 Jul 2024 02:54 PM
Rain Update : गोसीखुर्द धरणातून होणार 1000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग, नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

Rain Update : गोसीखुर्द धरणातून होणार 1000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग


नदीतून आवागमन करणाऱ्या नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा


गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच धापेवाडा बॅरेजचे 14 दरवाजे उघडण्यात आल्यानं गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारी चार वाजता गोसीखुर्द धरणाचे तीन ते पाच दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात येणार आहे. 

Ratnagiri Rain : मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे येथे रस्त्यावर पाणी आल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीने

Ratnagiri Rain : मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे येथे रस्त्यावर पाणी आल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीने......


गटाराचे पाणी थेट महामार्गावर आल्यामुळे महामार्गाला नदीचे स्वरूप. 


मागील दोन तासा पासून चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. 


मुसळधार पावसाचा वाहतुकीसह जनजीवनावरती परिणाम.

Washim : वाशिम राजाकीन्ही मार्गावर एरंडा गावात जवळील पुलावरून वाहताय पाणी,  वाहतूक एका तासापासून बंद 

Washim : वाशिम राजाकीन्ही मार्गावर एरंडा गावात जवळील पुलावरून वाहताय पाणी,  वाहतूक एका तासापासून बंद 


वाशिम जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे ...


त्यामुळे मालेगाव तालुक्यातील राजाकीन्ही  ते वाशिमला जोडणाऱ्या मार्गावर एरंडा गावाजवळील असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली असून...दोन्ही बाजूने काही नागरीक घरी जाण्यासाठी निघाले असता रस्तात अडकले असून शेतात काम करणारे मजूर ही  अडकले ...पुलावरून पाणी कमी झाल्यावर  अडकलेल्या नागरिकांना घरी परतता येणार  वाहतूक विस्कळीत

Chiplun Rain : गुहागर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम रद्द

Chiplun Rain : गुहागर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे.


रेड अलर्ट आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आजचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 



गुहागरच्या तहसिलदारांकडून नोटीस

Raigad Rain : रायगड - महाड येथील तुळशी खिंडीत जोरदार पाऊस, महाड विन्हेरे खेड रस्ता बंद होण्याची शक्यता 

Raigad Rain : रायगड - महाड येथील तुळशी खिंडीत जोरदार पावसात मातीचा भाग रस्त्यांवर 


महाड विन्हेरे खेड रस्ता बंद होण्याची शक्यता 


अनेक भागात मातीचा भाग ढासळल्याने वाहतुक ठप्प होण्याची प्रवाशांमध्ये भीती 

Chiplun Rain : चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला, मुंबई गोवा महामार्गावरील चुकीच्या कामाचा चिपळूण पोलीस वसाहतीला फटका.

Chiplun Rain : मुंबई गोवा महामार्गावरील चुकीच्या कामाचा चिपळूण पोलीस वसाहतीला फटका.


गटाराचे पाणी थेट पोलिस वसाहतीमध्ये शिराल्यामुळे चिपळूण पोलीस वसाहतीला पाण्याचा वेढा.


चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरवात

Raigad : रायगड रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण करायला सुरूवात, धोक्याची पातळी ओलांडली

Raigad : रायगड रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने  देखील आपल रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे,


कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून,


रोहा शहरातील याच नदीवर असणाऱ्या छोटा पुलावरून पाणी जाऊ लागल्याने  हा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला पहायला मिळतो

Raigad : रायगड रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण करायला सुरूवात, धोक्याची पातळी ओलांडली

Raigad : रायगड रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने  देखील आपल रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे,


कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून,


रोहा शहरातील याच नदीवर असणाऱ्या छोटा पुलावरून पाणी जाऊ लागल्याने  हा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला पहायला मिळतो

Konkan Rain : मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकवर परिणाम, गाड्या दोन ते अडीच तासाहून उशिराने.

Konkan Rain : मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकवर परिणाम, गाड्या दोन ते अडीच तासाहून उशिराने.


पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत. 



कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्या दोन ते अडीच तासाहून उशिराने.

Pune Rain : पुण्यात आता पावसाचा जोर वाढला, रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं

Pune Rain : पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पाऊस देखील होता .मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे


रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे..


धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळी मध्ये चांगलीच वाढ झाली आहे..

Nashik - नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर सलग दुसऱ्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी, निर्बंधांची पर्यटकांकडून सरार्स पायमल्ली

Nashik - नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण धबधब्यावर सलग दुसऱ्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी...


- नाशिक जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांची पर्यटकांकडून सरार्स पायमल्ली...


- पाण्याचा प्रवाह वाढत असताना पर्यटक जीव धोक्यात घालून निसरड्या वाटेवर जात असताना पाहायला मिळत आहे...


- नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण धबधब्यावर नाशिक, मुंबईहून पर्यटक येत असतात...

Khed Rain : खेडमधील दिवाणखवटी येथे नदीला पूर आल्यामुळे गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला.

Khed Rain : खेडमधील दिवाणखवटी येथे नदीला पूर आल्यामुळे गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला.


मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत. 


खेडमध्ये पावसाचा जोर कायम. 


महसूल आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर.

Amravati Rain : अमरावतीत तीन-चार दिवस विश्रांती नंतर अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू..

Amravati Rain : अमरावतीत तीन-चार दिवस विश्रांती नंतर अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू..


या पावसाने शेती पिकाला मोठा फायदा..


शेतकरी पाहत होते पावसाची वाट

Konkan Rain : खेडमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला, नगरपालिकेने दिला सतर्कतेचा इशारा, धोक्यासाठी वाजवले भोंगे

Konkan Rain : खेड नगरपालिकडून वाजवले धोक्यासाठी भोंगे


जगबुडी नदी धोका पातळीच्या वर सर्वांनी सतर्क रहावे


पावसाचा जोर पुन्हा वाढला

Raigad Rain : पाली येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने पुणे द्रुतगती महामार्गावरील संपूर्ण प्रवास हा ठप्प

Raigad Rain : रायगड मध्ये मुसळधार पावसामध्येपाली खोपोली राज्य मार्ग पाण्याखाली, संपूर्ण जनजीवन विस्कळीत


रायगड पुणे द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या पाली येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने येथील संपूर्ण प्रवास हा ठप्प पडलाय


अंबा नदीला पूर आल्याने ही परिस्थितीत निर्माण झाली आहे त्यामुळें अनेक नागरिकांची तारांबळ उडालेली पहायला मिळतं आहे पोलिस प्रशासन देखील या भागात सज्ज असुन अनेक नागरिक येथे अडकून पडले आहेत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधि गणेश म्हाप्रळकर यांनी

Bhiwandi Rain : मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला देखील फटका, तीन ते चार फुटांपर्यंत पाणी 

Bhiwandi Rain : कालपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला देखील फटका


ग्रामीण भागातील खाडीपार परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी 


अनेक घरांमध्ये शिरले पाणी;अनेकजण मदतीच्या प्रतीक्षेत 


कामवारी नदीच्या पाण्यात  जीव धोक्यात घालून तरुणांच्या उड्या 


प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष 


तीन बत्ती ,भाजी मार्केट, ईदगाह रोड, खाडीपार परिसरात साचले पाणी

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला, कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ 

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला 


 राजापूर शहराजवळून वाहणाऱ्या कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ 


राजापूर नगरपरिषदेकडून व्यापाऱ्यांना धोक्याच्या सूचना; नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचं आवाहन 


वादळी वाऱ्यासह बरसतोय जोरदार पाऊस; काही भागात विजेचा लपंडाव सुरू तर काही ठिकाणी वीज गायब 

Raigad Rain : पाली खोपोली मार्गावरील श्री धावीर महाराज मंदिर पाण्यात, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित 

Raigad Rain : पाली खोपोली मार्गावरील श्री धावीर महाराज मंदिर पाण्यात 



पाली खोपोली मार्गावर जनजीवन विस्कळित 



वजरोळी येथिल  श्री धाविर महाराज मंदीर बुडाले  पाण्याखाली 



अंबा नदीच्या पुरात शेतीची देखील नासधूस 

Chiplun Rain : गुहागरमधील असगोलीमध्ये  मच्छीमारी नौका बुडाली, तीन खलाशी सुखरुप

Chiplun Rain : गुहागरमधील असगोलीमध्ये  मच्छीमारी नौका बुडाली 


मच्छीमारी नौकेवर होते 3 खलाशी


खलाशांना वाचवण्यात यश तीनही खलाशी सुखरुप


पहाटे बोट दुरुस्तीसाठी नेत असताना जोरदार वाऱ्याच्या दणक्याने नौका समुद्रात पलटली.


सुदैवाने कोणतीही जीवित नाही नाही... बोटीचे मात्र मोठे नुकसान.


बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू.

Konkan Rain : खेडमध्ये मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, खेड दापोली मार्ग बंद 

Konkan Rain : गेल्या दोन दिवसापासून मुसळधारपणे बरसणाऱ्या पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.


यामुळे जगगुडी नदीला मिळणाऱ्या नारंगी व इतर नद्यांनी देखील आपली पातळी ओलांडली


खेड दापोली मार्गे लागत वाहणाऱ्या नारंगी नदीचे पाणी खेड दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग येते आले आहे


यामुळे खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे कुंभारवाडा डेंटल कॉलेज या मार्गे वळवण्यात आली आहे संततदारपणे कोसळणाऱ्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला मुसळधार पावसाचा तडाखा, खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला मुसळधार पावसाचा तडाखा....


खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर.


जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी...तर नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता. 


गेल्या तीन तासापासून खेडमध्ये मुसळधार. 


हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत. 

Thane Rain : ठाणे जिल्ह्यात आज किती पाऊस झाला? पाहा रिपोर्ट

Thane Rain : ठाणे जिल्ह्यात आज किती पाऊस झाला?


दिनांक - 14/7/2024 
 Rainfall report 


1.ठाणे - 134.6 mm
2.कल्याण - 130.0 mm
3.भिवंडी - 149.6 mm
4.अंबरनाथ -  108.9 mm
5.उल्हासनगर - 119.8 mm
6.मुरबाड - 139.3 mm
7.शहापुर - 147.6 mm
 एकूण पाऊस - 135.5 mm

Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात शिरले पुराचे पाणी, आंबा नदीने गाठली धोक्याची पातळी

Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात अखेर शिरले पुराचे पाणी 


नागोठणे बसस्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा 


आंबा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडल्याने शहरात पसरले पाणीच पाणी 


नागोठणे बाजारपेठ देखील पाण्याखाली 


नागरिक, व्यापारी यांची तारांबळ 


प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्येही सकाळ पासून पर्जन्यवृष्टी सुरू, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू

Nashik : नाशिक शहरासह इगतपुरी त्रंबकेश्वरमध्येही सकाळ पासून पर्जन्यवृष्टी सुरू आहे, जून महिना सम्पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने निसर्ग खुलला आहे, इगतपुरी तालुक्यातील धुक्याची चादर पसरली आहे, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, त्यात हिरवी गार डोंगररांग यामुळे पावसाचं आल्हाददायक दृश्य बघायला मिळत असून निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू आहे..

Pune : सिंहगडावर जाणाऱ्या पाय वाटेवर संततधार पावसामुळे पहाटे दरड कोसळली

Pune : सिंहगडावर जाणाऱ्या पाय वाटेवर अतकरवाडी जवळ संततधार पावसामुळे रविवारी पहाटे दरड कोसळली आहे .त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे असे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

KONKAN RAIN: मंडणगड तालुक्यातील तुळशी घाट आणि केळवत घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याच्या घटना.

मंडणगड तालुक्यातील तुळशी घाट आणि केळवत घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याच्या घटना.


मुसळधार पावसामुळे दरड रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले.


मंडणगड मध्ये दोन ठिकाणी कोसळली दरड.


 मंडणगड प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू.

Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात मुसळधार पाऊस सूरु, अनेक ठिकाणीं रस्त्यांवर पाणी साचले

Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील खोपोली परीसरात देखील मुसळधार पाऊस सूरु असून या भागात अनेक ठिकाणीं रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र आहे खोपोली शहारातील हायको कॉर्नर (हॉटेल हिल पार्क) आणि यूनी माऊंट रेसिडेन्सी समोर मोठया प्रमाणात पाणी साठल्याने प्रवाशी आणि वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Pune Rain : पवना धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी, पाणी पातळीत झाली विक्रमी वाढ

Pune Rain : पवना धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी


एका दिवसात पाणी पातळीत झाली विक्रमी वाढ


पवना धरण परिसरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे एका दिवसांत पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे.


आज रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे.


पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे.


तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती

Konkan Rain : कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी

Konkan Rain : कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढत असून 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.


काही ठिकाणी हा वेग 65 किलोमीटर प्रतितास होऊ शकतो. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील बंदर कार्यालयाना 3 नंबर वादळी बावटा लावण्यात आला आहे.


तसेच खाडीपात्रातही मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये असं आव्हाहन मत्स्य विभागाने दिला आहे.


जिल्हा प्रशासनाने स्थानिकानी सतर्क राहावे असं आव्हाहन केले आहे. द


रम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी केला असून पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Raigad Rain : माणगाव मधील कळमजे नदीच्या पाण्यात वाढ, ब्रिटिश कालीन पूलाला धोका संभवण्याची शक्यता 

Raigad Rain : माणगाव मधील कळमजे नदीच्या पाण्यात वाढ 


मुसळधार पावसात मुंबई गोवा हायवे वरील माणगाव मधील कळमजे नदी दुथडी भरून वाहतेय


 नदीवरील ब्रिटिश कालीन पूल धोकादायक


मुसळधार पावसात पूलाला धोका संभवण्याची शक्यता 



मुलाचे संपूर्ण बांधकाम ब्रिटीश कालीन दगडांचे 


पावसाचा जोर वाढला तर पुलावरून पाणी जाण्याची शक्यता 


नवीन पुलाचं काम रखडल्याने जुन्याच पुलावरून सद्यस्थितीत वाहतूक


 

Sindhudurg Rain : सिंधुदूर्ग जिल्हयात रात्रभर पाऊस, वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गाने वळविली

Sindhudurg Rain : जिल्हयात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गाने वळविली आहे. तर कसाल आंब्रड पोखरण कळसुली मार्गावर कुंदे येथे पुलावर पाणी आल्याने कसाल कळसुली मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण

Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.


त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे.


सध्या मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मेट्रो प्रकल्प अशी विविध कामे सुरू असल्याने वाहतुकीच्या समस्येत भर पडत आहे.


त्यातच आता पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावत आहे.

Sindhudurg Rain : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 2 तास उशिराने

Sindhudurg Rain : कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.


मुंबईहून मडगावकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस 2 तास उशिराने धावत आहेत.


पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला आहे.


मुंबईच्या दिशेने जाणारी निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस सहा ते सात तास उशिराने धावते. तर इतर गाड्या अर्धा ते एक तासाने उशिराने धावत आहेत.

Sindhudurg Rain : सिंधुदूर्ग जिल्हयात आज रेड अलर्ट जारी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sindhudurg Rain : सिंधुदूर्ग जिल्हयात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार पाऊस सुरू आहे.


जिल्हयात रात्री सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.


किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Palghar Rain : पालघरमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट, भात शेतीतील रोपणीच्या कामांना वेग

Palghar Rain : पालघरमध्ये काल दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज ऊसंती घेतल्याने पालघरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे .


मात्र अस असल तरी पालघर जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट असल्याने आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे .


पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील भात शेतीतील रोपणीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येतोय .


 तर काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्याना पूर आला असून  धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली पाहायला मिळते.

Pune Rain : पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस, मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद

Pune Rain : पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झालाय 


भोर, वेल्हा,भागात 100 मिलिमीटर च्या वर पाऊस झालाय तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटर च्या वर पावसाची नोंद झाली आहे 


या भागात रात्रभर पाऊस पडतोय 


 

Mumbai Rain : प्रभादेवी स्थानकाच्या पुढे झाड पडलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं वाहतूक उशिराने

Mumbai Rain : प्रभादेवी स्थानकाच्या पुढे झाड पडलं होतं, ते रेल्वे रुळावरील झाड बाजूला करण्यात आला आहे 


 बाजूला करून हे झाडाची कटिंग सुरू आहे 


 पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु झाली असून 15 ते 20 मिनिटं वाहतूक उशिराने आहे

Rain Update : खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका.

Rain Update : खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर


खेड मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी शिरले.


पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका.


नगर परिषद कडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना.

Khed : मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ, खेड नगरपरिषदकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Khed : मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ, खेड नगरपरिषदकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, 


खेड शहरातील सर्व नागरीकांना व व्यापारी बांधवांना कळविणेत येते की सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी  वाढत आहे.


तरी नागरीकांनी व व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच  सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेणेत यावी ही विनंती.


 

Raigad Rain : रायगड मध्ये कालपासून मुसळधार पाऊस, अनेक भागात झाडे उन्मळून पडली

Raigad Rain : रायगड मध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय


याच मुसळधार पावसात आता अनेक भागात झाडे उन्मळून पडताना पहायला मिळत आहेत 



श्रीवर्धन तालुक्यातील बोरली रस्त्यावर देखील खुजारे गावापासून काहीच अंतरावर एक मला मोठा झाड पडल्याने या मार्गावरची सर्वच वाहतूक ठप्प झालेली आहे,


अद्याप हे झाड हटविण्याचे काम हाती घेतलेलं नसून 



पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही प्रवास करू नये ही अशी सूचना स्थानीक प्रशासनाकडून करण्यात आली आहे .


 


पर्यायी वाहतूकीसाठी शेखाडी भरडकोल श्रीवर्धन असा प्रवास सुरू आहे

Kalyan Dombivali Rain : कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस, सखल भागांमध्ये पाणी साचले

Kalyan Dombivali Rain : कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या परिसरामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असल्याने जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे


अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे


डोंबिवलीतील एमआयडीसी पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिसच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आहे 


साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासे मुक्त संचार करत असल्याचे चित्र

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड मध्ये शिरले पुराचे पाणी, भातशेती पाण्याखाली, रस्ते जलमय

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊव तसेच समर्थ अपार्मेट याठिकाणी पुन्हा पुराचे पाणी घुसल्याने वाहन चालकाची कसरत करावी लागत आहे.


रस्ता जलमय झाल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे.



जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे


तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड मध्ये शिरले पुराचे पाणी, भातशेती पाण्याखाली, रस्ते जलमय

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊव तसेच समर्थ अपार्मेट याठिकाणी पुन्हा पुराचे पाणी घुसल्याने वाहन चालकाची कसरत करावी लागत आहे.


रस्ता जलमय झाल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे.



जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे


तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत, उशिराने धावतायत लोकल. प्रवाशांची तारांबळ

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक काल ठप्प होती


दोन तासांपासून लोकल जागेवर उभे होते


कर्जत कडे जाणारी वाहतूक विस्कळित होती.



अंबरनाथ बदलापूर स्थानकाच्या दरम्यान डाऊन दिशेला मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प!



मालगाडी दुरुस्त व्हायला अजून एक तास अवधी लागू शकतो असे बदलापूर स्टेशन मास्तर यांनी माहिती दिली आहे.

Mumbai Rain : मुंबई पश्चिम उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

Mumbai Rain : मुंबई पश्चिम उपनगरात काल मुसळधार पाऊस


मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे खाली चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे...

Bhiwandi : भिवंडी शहरात काल पासून जोरदार पाऊस, कामवारी नदीची पातळी वाढली

 


Bhiwandi : भिवंडी शहरात काल पासून होत असलेल्या पावसामुळे कामवारी नदीची पातळी वाढली


नदीकाठी असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा 


इदगाह रोड परिसरात शेकडो घरात  शिरले पाणी


बाजापेठ, तीन बत्ती, भाजी मार्केटमध्ये शेकडो दुकानात पाणी 


बाजापेठ, तीन बत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका, कमला हॉटेल, तांडेल मोहल्ला, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी,नदी नाका परिसरात पाणीच पाणी 


शेकडो वाहन देखील पाण्याखाली


नदीकाठच्या परिसरात दोन ते तीन  फुटांपर्यंत पाणी

Nashik - नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी, निसरड्या पायवाटेवर करताय तोबा गर्दी.

Nashik - नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी...


- जीव धोक्यात घालून पर्यटक धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर करताय तोबा गर्दी...


- नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्या प्रतिबंधित आदेशाला केराची टोपली...


- शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी भावली धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ ...


- लोणावळ्याच्या घटनेवरून पर्यटक व प्रशासन कोणतेही बोध घेताना दिसत नसल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित ...

पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rain Update LIVE : महाराष्ट्रात आजही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई उपनगर आणि कल्याणमध्ये विविध भागात पाणी साचलंय, ज्यामुळे रेल्वे उशिराने चालतेय. प्रभादेवी स्थानकाच्या पुढे झाड पडलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं वाहतूक उशिराने, तर कोकण रेल्वेचे वेळापत्रक मुसळधार पावसामुळे कोलमडले, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 2 तास उशिराने

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.