Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राडगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साडेतीनशे वर्षे पुरातन झाड कोसळले

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2022 06:43 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या काही भागात पावसानं कहर केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील...More

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारी 12 ते 15 जुलै पर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन 

12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यावर ताशी 45-55 कि.मी ते 65 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. याबरोबरच  12 जुलै  ते 15 जुलै या कालावधीत रत्नागिरीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.