Maharashtra Rain Update | मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार
Maharashtra Rain LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर काल ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं संकट आलेलं. या वादळाचा धोका कमी झाला असला तरी आता राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे.मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसासंबंधी प्रत्येक माहिती आणि अपडेटसाठी कनेक्ट राहा...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2020 06:19 PM
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात काल 'निसर्गा'चाच दिवस असल्याचे पाहायला मिळाले. कारण, कोकण किनारपट्टीवर आज निसर्ग नावाच्या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. तर, राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने...More
मुंबई : राज्यात काल 'निसर्गा'चाच दिवस असल्याचे पाहायला मिळाले. कारण, कोकण किनारपट्टीवर आज निसर्ग नावाच्या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. तर, राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. काल पावसासोबत सोसाट्याचा वाराही सुरु असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या संपत्तीचे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. तिकडे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसाने सलग चौथ्या दिवशी जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई महाराष्ट्रावरील निसर्ग चक्री वादळाचं संकट टळलं असलं तरी अजूनही पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे.आज सकाळपासूनच मुंबईवर काळे ढग दिसत आहेत. तसेच हवा सुद्धा जोरात आहे. मुंबई उपनगरात साडेनऊ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे .कुर्ला चेंबूर,घाटकोपर, विक्रोळी , मुलुंड सर्वच भागात हा पाऊस सुरू आहे.Nisarga | 'निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष, घरांची पडझड, पुण्यात दोघांचा मृत्यू ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळाने पोल देखील पडले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, नवी मुंबई, कल्याण, ईगतपुरी,नाशिक जिल्ह्यातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली असून सर्वप्रथम उपकेंद्रांचा वीजपुवठा सुरु केला जाईल व तेथून पुढे टप्प्या-टप्प्याने 11 केव्ही व लघुदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिर्डी परिसरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. कोपरगाव, राहाता तालुक्यातही मुसळधार पाऊस. कोपरगावात अनेक व्यापारी संकुलात पाणी भरले. दोन तासापासून मुसळधार पाऊस.