मुंबई : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेनं (MNS)  मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्ड्यांविरोधात रणशिंग फुंकलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरूनन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर सिंगल लेन चालू नाही तरी मंत्री महोदय यांनी सिंगल लेन सुरू झाली असं सांगितलं. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे लोकं मुंबई गोवा हायवेवरुन गेले आणि ट्रॅफिक जाममध्ये अडकले. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा.


मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, रस्त्याचे काम प्रलंबीत आहे. मी रत्नागिरीतून चिपळूणमध्ये एक तासांत पोहचलो आहे. सणाच्या वेळी टीकाटीपण्णी करणे हे योग्य वाटत नाही. ठेकेदारांच्या अनास्थेमुळे रस्ता प्रलंबीत राहिला आहे.रस्ते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे तो आम्ही पुर्ण करुन दाखवू. भविष्याच्या कालावधीत विघ्न येऊ नये असा बंदोबस्त विघ्नहर्त्याने करावा. मुंबई गोवा हायवे अडचणीचा आहे. तो परीपूर्ण करण्याचा प्रयत्न बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण करत आहेत. प्रवास करताना सुरक्षित प्रवास करावा. 


पाहणी, दौरे,आश्वासने मात्र महामार्गाचं काम मात्र जैसे थे


मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा  महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात,  पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायलये सरकारला खडसावतात  मग सरकार एक नवी डेडलाईन देतं. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचं काम मात्र जैसे थेच राहतं. दीड दशक उलटलंय पण यात तसूभरही फरक पडलेला नाही. पनवेलच्या मेळाव्यात तर राज ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली 


हे ही वाचा :                              


 खड्डयावरून भाजप-मनसेत बिनसलं! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून राज ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका