Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा
Maharashtra Monsoon : हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jun 2022 04:59 PM
पार्श्वभूमी
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार...More
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, पुणे, परभणी, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, अहमदनग या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मात्र, अदयापही काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा परभणी शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. परभणी शहरासह,सेलू, लिमला, लोहगाव,आदी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं वातावरण आल्हाददायक झाले आहे. मात्र, सर्वत्र दमदार पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या असून, अजूनही पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची हजेरीअहमदनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. कोपरगाव शहरात दुपारी मान्सुनच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचल्यानं वाहनधारकांना वाहन चालवण्यास त्रास होत आहे. या पावसामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूरमध्ये पहिला मुसळधार पाऊसमोठ्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुर जिल्ह्यात पहिला मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. पावसाच्या आगमनानं उष्ण हवामानापासून नागरिकांना मिळाला दिलासा मिळाला आहे. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळं शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाला पेरणीसाठी सलग काही दिवस दमदार पावसाची गरज आहे.वाशिममध्ये पावसाची हजेरीहवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. तर बरसलेल्या पावसानं शेतीच्या कामांना अधिक वेग मिळणार असून, खोळंबलेल्या खरीप पेरण्याला वेग मिळणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai Rain Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात
Mumbai : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.