MSEDCL : ग्राहकांनी नियमित दरमहा बिलाचा भरणा न केल्याने महावितरणला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर उभा राहत आहे. मराठवाडयात 50 हजार रूपयांपेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी असलेल्या 3051 ग्राहकांकडे 220 कोटी 4 लाख 81 हजार रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूलीसाठी महावितरणचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. हे विशेष पथक ग्राहकांकडे असलेले वीज बिल वसूल करणार आहे. अन्यथा वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई पथकाकडून करण्यात येत आहे. ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.


थकबाकी वसूलीसाठी महावितरणचे विशेष पथक


वीज बिल वसूलीसाठी महावितरणकडून विविध माध्यमातून जनजाग्रती करण्यात येते. तरीही काही ग्राहक वापरलेल्या विजेचे दरमहा वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. सूचना, नोटिसा, विनंत्या करूनही वीजबिल भरत नाहीत. थकीत बिलामुळे महावितरणची थकबाकी वाढतच जाते. 50 हजार ते 5 लाखापेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी असणा—या ग्राहकांकडिल थकबाकी वसूलीसाठी महावितरणचे विभागीय कार्यालय, मंडल कार्यालय व परिमंडल कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आले आहे.


सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन 


या कर्मचाऱ्यांचे पथक थकबाकी असणाऱ्या ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वसूली करत आहे. अन्यथा थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांची कोणतीही सबब न ऐकता तातडीने वीज पुरवठा करण्याची कार्यवाही करत आहेत. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.   


परिमंंडळ     ग्राहक      थकबाकी लाख रूपये
औरंगाबाद   3280          2981.09
लातूर          2953          2345.72
नांदेड         23818        16678.00


मराठवाडा
एकूण         30051        22004.81