Ghatkopar Pipe Line Burst : घाटकोपरच्या (Ghatkopar) असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी (Water Pine Line Burst) फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा प्रचंड फवारा पाहायला मिळत आहे. याचा प्रवाह इतका होता की, यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.
ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटली
घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहे. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.
रात्री अचानक घरात पाणी आल्याने लोक घाबरले
30 डिसेंबर रोजी रात्री मुंबईतील असल्फा परिसरात लोक घरात झोपलेले असताना 72 इंचाची पाण्याची पाइपलाइन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला, मिळालेल्या माहितीनुसार, या पाण्याचा दाब इतका जोरदार आहे, की ते सुमारे 10 फुटांपर्यंत उसळत आहे.
महापालिकेचे अधिकारी गैरहजर, स्थानिकांची माहिती
मध्यरात्री 2 ते 2.30 पर्यंत पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग अद्यापही कमी झालेला नाही, घराबाहेर पडणारे लोक पाण्याचा वेग लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना करत आहेत, ही 72 इंची पाईपलाईन खूप जुनी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही पाईपलाईन फुटली असून लोक पाणी थांबण्याची वाट पाहत आहेत.
पाणीपुरवठा बंद राहणार
जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन एन प्रभागाचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.
इतर बातम्या
31 December Headlines : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत, मंदिरं, पर्यटनस्थळांवर गर्दी, आज दिवसभरात