Rashmi Shukla Phone Tapping Case : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.  या प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे (Pankaj Dahane) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी चौकशी वेळी रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचं म्हटलं आहे. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते. 



फडणवीसांच्या सांगण्यावरून शुक्ला यांनी फोन टॅप केला, नाना पटोलेंचा आरोप, 
2021 मध्ये हा मुद्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी आपला फोन टॅप केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या फोन टॅपिंग प्रकरणात भाजपचे काही बडे नेते, राष्ट्रवादीचे काही नेते आणि काँग्रेसचे नाना पटोले यांची नावे आहेत.


 


या महत्त्वाच्या लोकांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप
फोन टॅप केल्याचा आरोप असलेल्यांमध्ये नाना पटोले, रावसाहेब दानवे यांचे पीए, भाजप खासदार संजय काकडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकारांचे फोन टॅपिंगचे आरोप आहेत.


 


पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळला
या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी समितीचे प्रमुख होते. समितीच्या तपासानंतर पुण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु जुलै 2022 मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना याप्रकरणी क्लीन चिट देत पुणे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला आणि रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यास नकार दिला.


इतर बातम्या


रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, फोन टॅपिंगप्रकरणी चौकशीचे पुणे सत्र न्यायालयाचे आदेश