Jalgaon: जळगाव विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सन्फुले येथील आश्रमशाळेत सुविधांचा अभाव असल्याने आणि शाळा प्रशासन दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी यावल येथील सहा प्रकल्प अधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला होता. विद्यार्थ्यांनी मोर्चा काढल्याचे लक्षात येताच. शाळा प्रशासनाने रस्त्यातच मुलांना सोई सुविधा देण्याचे आश्वासन देऊन मोर्चा थांबविण्यास भाग पाडले. यावेळी विद्यार्थीनी अधिकाऱ्यांपुढे आपल्या समस्यांचा पाढा वाचल्याचे पाहायला मिळाले. 


मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, आश्रम शाळा सनपूले येथील आदिवासी विदयार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या अनेक वेळा शाळा प्रशासनास सांगूनही आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने आज शाळेतून 100 हून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. हे विद्यार्थी त्यांच्या काही समस्या घेऊन आदिवासी विकास प्रकल्प येथे मोर्चा घेऊन जात होते, त्यांना सुमारे 12 किमी अंतरावर रस्त्यावर थांबवून त्यांच्या समस्या लवकरच सोडवू, असे आश्वासन शाळा प्रशासनाने दिले आहे. तसेच  त्यास्थळी सहा प्रकल्प अधिकारी पवन पाटील उपस्थित झाले आणि विद्यार्थ्यांचा समस्या जाणून घेतल्या.


काय आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या?



  • जेवण व्यवस्थित मिळत नाही. 

  • जेवण वेळेवर मिळत नाही. 

  • जेवण पोटभर मिळत नाही. 

  • विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली जाते. 

  • वसतिगृह अधिक्षक उपस्थित राहत नाही. 

  • मुलांना मारहाण केली जाते.

  • कर्मचारी मुलांसोबत गैरव्यवहार करतात. 

  • प्रयोगशाळा, अभ्यासिका वर्ग सुस्थितीत नाही, अशा प्रकारच्या समस्या आहेत.


सहा प्रकल्प अधिकारी यावल पवन पाटील यांनी चोपडा - यावल रस्त्यावरच भेट घेऊन विद्यार्थ्यांचा समस्या जाणून घेतल्या. तसेच येत्या 7 दिवसांत संबंधितांवर कारवाई करू ,असे लेखी आश्वासन दिले त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा स्थगित केला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गाडीत बसवून शाळेत नेण्यात आले. यावेळी आश्रम शाळेचे चेअरमन पी जे पाटील, सर्व शिक्षक, अखिल भारतीय विकास परिषद ग्रामीण तालुका अध्यक्ष नामा पावरा , ॲड जामसिंग पावरा, तयाब तडवी, करण बारेला, सुनील पावरा, विकेश पावरा आदींनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.


इतर महत्वाची बातमी: 


Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दिलासा; उद्याच कारागृहातून सुटका, जामिनाची स्थगिती वाढवण्याची CBI ची याचिका फेटाळली