Copy In SSC Exam : कोरोना महामारीचा (Coronavirus) प्रभाव हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर ऑफलाईन पद्धतीने (Offline Exams) परीक्षा सुरु झाल्या, गोंदिया (Gondia District) जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत 10 वी च्या परिक्षेला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार घडला आहे. दरम्यान संबंधित शाळेकडून कॉपीसाठी सहकार्य करत विद्यार्थ्यांना पास करण्यात येत असल्याची बाबही समोर येतेय. 


शाळा कर्मचाऱ्याचे कॉपी करण्यास साहाय्य, पालकाने काढला व्हिडिओ
गणित विषयाचा 24 मार्चला पेपर सुरु असतांना हा प्रकार उघडकीस आला असून शाळेतील शिक्षक कर्मचारी कॉपी करण्यास साहाय्य करत असल्याचा व्हिडिओ चक्क एका पालकानेच काढला आहे. विशेष म्हणजे शाळा प्रशासनाने कॉपी करण्यासाठी यावेळी अनोखी शक्कल लढवत परीक्षा खोलीच्या बाजूला रिकाम्या खोलीत सर्व कॉपीचे साहित्य ठेवले असून आवश्यकतेनुसार एक एक विद्यार्थी आपन कोणाला दिसु नये या पद्धतीने तिथे जाऊन कॉपी घेऊन येत असल्याचा प्रकार समोर आला,  तर याला खंड पडू नये म्हणून चक्क तिथे ह्या कॉपी च्या सुरक्षितेसाठी एक कर्मचारीच नियुक्त केलेला दिसत आहे.


मोठी आर्थिक उलाढाल करत असल्याच्या आरोप
विशेष म्हणजे शाळा अशा प्रकरणांसाठी मोठी आर्थिक उलाढाल करत असल्याच्या आरोप करण्यात आला असून धक्कादायक बाब अशी की, गोंदिया शिक्षण विभागाला याची तक्रार करुन कोणतीही कारवाई अद्यापही शाळा प्रशासन तसेच शिक्षकावर केली नाही, त्यामुळे शाळेच्या या कृत्यामुळे आपल्या हुशार पाल्याचे होत असलेले नुकसान लक्षात घेता कारवाईची मागणी पालकाने केली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग याकडे काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे असेल.


व्हिडिओ व्हायरल


या प्रकाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून पेपर सुरु असलेल्या वर्गातून विद्यार्थी बाजूच्या खोलीत जाऊन कॉपी आणत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये चार विद्यार्थी, चार शिक्षक आणि एक शिक्षिका देखील या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI