Happy April Fools Day 2022 : दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात 'एप्रिल फुल डे' (April Fool's Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांसोबत विनोद, मस्ती करतात, चेष्टा करतात. आजकाल लोक सोशल मीडियाच्या मदतीने या दिवसाचा खूप आनंद घेतात. मित्र, नातेवाईकांना 'एप्रिल फुल्स डे'वर मजेदार मीम्स, जोक्स आणि शायरी पाठवतात. मात्र तुम्हाला एप्रिल फुल्स डे साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? आम्ही तुम्हाला याचं कारण सांगणार आहोत.


एप्रिल फुल डे साजरा करण्यामागे दोन कथा प्रचलित आहेत.


'एप्रिल फुल डे' मागची पहिली प्रचलित कथा
इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी 32 मार्च 1381 रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. लग्नाच्या बातमीने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, कॅलेंडरमध्ये 32 मार्च ही तारीख नसते. राजा-राणीने लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 32 मार्च हा दिवस नाही म्हणून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आला.


'एप्रिल फुल डे' साजरा करण्यामागची दुसरी कथा
यामागची दुसरी कथा अशी आहे की, फ्रान्समध्ये 1582 मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले. मात्र, त्यानंतरही काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते. होते. त्यामुळे जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना एप्रिल फूल म्हटले गेले. तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आल्याचं सांगितलं जातं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha