Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 31 Jan 2022 07:14 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... Union Budget 2022 : आजपासून संसदेचं...More

राज्यपाल कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांच्यात रंगल्या मनसोक्त गप्पा
महाराष्ट्रात सध्या राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसत असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र आज वेगळंच चित्र बघायला मिळाल. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दुपारी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर येताच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देत आदराने स्वागत केलं. पोलिसांकडून त्यांना सलामी देण्यात येताच विश्रामगृहात छगन भुजबळ आणि भगतसिंह कोश्यारी हे एकाच सोफ्यावर शेजारी मांडीला मांडी लावून बसले, समोरील खुर्च्यांर भाजपचे स्थानिक नेते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी भुजबळ आणि कोश्यारी यांच्यात जसे दोन जुने शाळेतले मित्र अनेक वर्षांनी भेटल्यावर गप्पा रंगतात तशाच जवळपास १५ ते २० मिनिट गप्पा रंगल्या होत्या.