Breaking News LIVE Updates : माजी मुख्य सचिव कुंटे यांच्या खुलाशावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 29 Jan 2022 07:42 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...१. मुंबईत मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून...More

विरोधी पक्षाकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून वाईन विक्रीला विरोध- थोरात
अहमदनगर - वाईन आणि दारू यात फरक आहे, विरोधी पक्षाकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून ते वाईन विक्रीला विरोध करत आहेत असं राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे...नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वाईनचे कारखाने सुरू केलेत, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी अशी आमची भावना आहे...त्यामुळे विरोध करायचा म्हणून करू नये असं थोरात म्हणाले...

तर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क मुक्त महाराष्ट्र विषयावर चर्चा झाली की नाही याबाबत राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांची वेगवेगळी प्रतिक्रिया आल्याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटलंय की, मंत्रीमंडळ बैठकीत सर्वच विषयांवर चर्चा होत असते...परदेशात काही ठिकाणी मास्क वापरला नाही तरी चालेल असं सांगितलं जातं , त्यांचं ऐकुन आपल्या जीविताला धोका निर्माण करून घेऊ नका असं माझं मतं आहे असं म्हणत थोरात यांनी मुख्य प्रश्नाला बगल दिली...