Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर जिल्ह्यात  पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 28 Jan 2022 06:58 PM
कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा, शर्यतीसाठी हजारोची गर्दी

डोंबिवली जवळील कल्याण शीळ मार्गावरील पडले-देसाई गावात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारी रोजी जत्रा आयोजित करन्यात आली होती .या जत्रेच्या आडून  हजारोंची गर्दी जमवत गावातील माळरानावर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. एवढी मोठी जत्रा गावात भरली असताना पोलिसांना याबाबत माहिती कशी मिळाली नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.तर या शर्यतीचे व्हीडिओ व्हायरल झाले असून डायघर पोलिसांनी आयोजक पाच जनांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी  जत्रेची माहिती मिळाली मात्र घटना स्थळी जाईपर्यंत शर्यती संपल्या होत्या या प्रकरणी कोरोना नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

राज्यात लवकरच 7200 पोलीसांची भरती होणार- दिलीप वळसे पाटील

राज्यात लवकरच 7200 पोलीसांची भरती होणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर येथे दिली आहे. 


काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?


राज्यात 5200 पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे...
5200 उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल...
पुढच्या टप्प्यात 7200 पोलीस भरती संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे...
लवकरच पुढच्या टप्प्यातील प्रक्रिया घेतली जाईल...
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती....
अहमदनगर पोलिसांची ई- टपाल प्रणालीचे केले कौतुक...
ई- टपाल प्रणालीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ...

आम्ही कोर्टातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई ही लढू - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्रीस दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई ही लढू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि शेतकऱ्यांच्याच पोराला ती दारू पाजायची असं सरकारचे धोरण आहे.  महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी वाईन विक्रीच्य निर्णयाबरोबरच खूप कारणे आहेत, असेही पाटील म्हणाले.

पालघर जिल्ह्यात  पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू

पालघर जिल्ह्यात  पाचवी ते सातवी पर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारी पासून तर  पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा 7 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत

कुडाळ नगरपंचायत मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का

कुडाळ नगरपंचायत मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का


काँगेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी काँगेसच्या विचारांशी तडजोड करून कुणासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं


त्यामुळे कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात

छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून पिंपरीत अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला, मुलीची प्रकृती गंभीर

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हातोड्याने 6 ते 7 वेळा प्रहार केल्याने मुलगी गंभीर जखमी झालेली आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी शिवम शेळकेला तळेगाव पोलिसांनी अटक केलीये. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. शिवमने या आधी जखमी मुलीचा पाठलाग केला होता, म्हणून तिने छेडछाडीचा गुन्हा नोंदवला होता. त्याच रागातून मी तुला जिवंत सोडणार नाही, तुला खल्लास करतो असं म्हणत त्याने गुरुवारी मध्यरात्री तिच्यावर हल्ला केला.

अदानी प्रकल्पात मजूराचा मृत्यू  झाल्याने तणावाचे वातावरण

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या अदानी विद्युत प्रकल्पात एका मजूराचा मृत्यू   झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण  झाले आहे. संतप्त नागरीकांनी मजूराचा मृतदेह अदानी प्रकल्पासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला असता चिखली गाव तसेच अदानी प्रकल्पाला छावणीचे स्वरूप आले आहे. अशोक जीवन हरीणखेडे वय 40 असे मजूरांचे नाव असून तो अदानी प्रकल्पात एक्वा कंपनीत काम करीत होता. आज कामावर असताना अचानक अशोक यांची तबीयत बिघडली असता त्याला रुग्ण वाहिकेने गोंदिया येथे उपचार करीता नेत असताना त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं असून आता त्याच्या कुटुंबाला मोबदला द्यावा यासाठी नागरिकांनी गावात आंदोलन केलं असून अदानी समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर दुसऱ्यांदा कोरोनाबाधित 

काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर दुसऱ्यांदा कोरोनाबाधित, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी  करून घेण्याचे केले आवाहन


परभणी पाथरी विधानसभा मतदार संघातील कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आली आहे.ते दुसऱ्यांदा कोरोना पॉसिटिव्ह आले आहेत सध्या ते क्वारंटाईन असुन त्यांची प्रकृती व्यवस्थित असुन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

भंडारा जिल्ह्यातील पलाडी गावाजवळ वाघाचा मृत्यू, कारण अस्पष्ट, वनविभागाची टीम घटनास्थळी 

भंडारा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर वाघ मृत अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  सदर वाघ हा नर वाघ असून पलाडी गावाचा शेतशिवारात आज दुपारचा सुमारास त्याचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला , प्रथम दर्शनी वाघाचा तोंडातून रक्त निघत असल्याचे स्पष्ट होत आहे.  याची सूचना भंडारा वनविभागाला मिळाली असून , वनविभाग घटनास्थळी दाखल झाले आहे.  तर पलाडी गावाजवळून कोका अभयारण्य हे लगत असल्यामुळे हा वाघाचा भ्रमंती मार्ग आहे. तर या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे शवविच्छेदन नंतरच कळणार आहे.

डॉक्टरांना मागितली 10 लाखांची खंडणी, एकास अटक
अहमदनगर - माहितीच्या अधिकारात माहिती मागून खंडणी वसूल करणाऱ्या चौघा विरोधात पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केलीये... पाथर्डी शहरात  कोविड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉ. विनोद गर्जे त्यांच्या हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी त्यांना 10 लाखांची खंडणीची मागणी शैलेंद्र जायभाये , मिथुन डोंगरे, नवनाथ उगलमुगले , मच्छिंद्र आठरे यांनी केल्याची तक्रार डॉ. गर्जे यांनी पोलिसांकडे दिली होती... तडजोडीअंती 3 लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या आरोपींपैकी एकाला पोलिसांनी सापळा रचत रंगेहाथ अटक केली. तर तीन जण फारार झालेत. मच्छिंद्र आठरे असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शैलेंद्र जायभाये , मिथुन डोंगरे, नवनाथ उगलमुगले हे फरार झालेत... आरोपींनी माहिती अधिकारात डॉ. गर्जे यांना हॉस्पिटलबाबत माहिती मागवली होती...सोबतच 10 लाखांची खंडणी मागितली आणि रक्कम न दिल्यास पेपरमध्ये हॉस्पिटलच्या बातम्या देवून बदनामी करून हॉस्पिटल बंद पडण्याची धमकीही दिली होती अशी तक्रार डॉ गर्जे यांनी दिली होती....
भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी विनायक, पलक आणि शरद या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी विनायक, पलक आणि शरद या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

जामिनासाठी अर्ज दाखल करून राणे समर्थक बाहेर, दुसऱ्या सत्रात होणार सुनावणी

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात हजर  झालेले राणे समर्थक कोर्ट परिसरातून बाहेर आले आहेत. नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, सध्या न्यायालयात अन्य सुनावणी सुरू आहे. अॅड. सतीश मानशिंदें आणि अॅड. संग्राम देसाई हे नितेश राणे यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आमदार नितेश राणेंसोबत त्याचे बंधू निलेश राणे देखील उपस्थित आहेत तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पडवे मेडिकल कॉलेज मध्ये दाखल झाले आहेत. जिल्हा सत्र व्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

पदोन्नती आरक्षणासाठी माहिती गोळा करणे गरजेच, त्याआधी निकाल शक्य नाही : सर्वोच्च न्यायालय

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यापूर्वी राज्य सरकारने आधी माहिती गोळा करणे आवश्यक आहे त्याआधी न्यायालय काही निर्णय देऊ शकणार नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे. उच्च पदावरील प्रतिनिधीत्वाचा डेटा गोळा करणे आवश्यक असल्याचं म्हणत न्यायालय आपल्या वतीने यासाठी कोणतेही प्रमाण निश्चित करणार नाही असं सांगिलतलं आहे. उच्च पदांवरील प्रतिनिधित्वाचे मूल्यमापन निर्धारित कालावधीत केले पाहिजे. हा कालावधी काय असेल, हे केंद्र सरकारने ठरवावे, असंही न्यायालयाने नमूद केले आहे.

गुगल एअरटेलमध्ये 1 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करणार

गुगल एअरटेलमध्ये 1 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करणार, ५ जी आणि स्मार्टफोन निर्मिती देखील होण्याची शक्यता, एअरटेलच्या बाजार भावात वाढ

एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही-सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही. असा निर्णय घेणं असंविधानिक आहे.

#BREAKING : मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रातील 12 आमदारांचं निलंबन रद्द

#BREAKING : मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रातील 12 आमदारांचं निलंबन रद्द

पिंपरी चिंचवडमधील नगरसेविका अश्विनी चिंचवडेंसह त्यांचे पती गजानन चिंचवडेवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमधील नगरसेविका अश्विनी चिंचवडे, त्यांचे पती गजानन चिंचवडेवर गुन्हा दाखल झालाय. गजानन चिंचवडे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेत, पत्नी अश्विनी चिंचवडे मात्र शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. या दोघांव्यतिरिक्त गुन्ह्यात कुटुंबातील सदस्य, जमीन खरेदी करणारे आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ही सहभाग असल्याची नोंद आहे. जमीन व्यवहाराच्या फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप आहे.    

टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना केले पास, पैसे घेऊन परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न

टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना केले पास, पैसे घेऊन परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न ,


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न 


सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न 


 २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू, प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली


२०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले 


 प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र 


तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले 

बुलढाणा  : शाळा सुरू होण्यापूर्वीच एकट्या खामगावात 56 शिक्षक कोरोनाबाधित

बुलढाणा  : शाळा सुरू होण्यापूर्वीच एकट्या खामगावात 56 शिक्षक कोरोनाबाधित.


शिक्षक पॉझिटीव्ह आले तर वर्ग बंद शाळा नाही-  प्रशासन 


जिल्ह्यात खामगाव शहरात सर्वात जास्त शिक्षक कोरोनाबाधित.


आजपासून सुरू होणार आहेत जिल्ह्यातील शाळा.

महेश मांजरेकरांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल

महेश मांजरेकरांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल


विशेष पोक्सो कोर्टात ' नाय वरण भात लोणचा कोन नाय  कोणचा' मध्ये अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप


आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी


भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांची तक्रार


माहीम पोलीस स्टेशनमध्ये केली होती लेखी तक्रार


मात्र मुंबई पोलिसांनी दखल न घेतल्यानं तक्रारदारांची कोर्टात याचिका


प्रकरणावर सोमवारी होणार सुनावणी

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


1. महाराष्ट्र मास्कमुक्त करता येईल का याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं, मास्कमुक्त झालेल्या देशातल्या परिस्थितीचा अभ्यास करणार, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतरच निर्णय घेणार


2. सरकारी नोकरीतल्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार, सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण देण्याच्या शासनआदेशाला याचिकाकर्त्यांचा विरोध


3. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, 29, 30 जानेवारी आणि 5, 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, तर म्हाडाच्या परीक्षांच्या वेळापत्रकातही पुन्हा बदल


4. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा होण्याची शक्यता, डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
 
5. लवकरच सुपरमार्केटमध्ये वाईनची बाटली मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
 
6. मित्राच्या मृत्यूनंतर आठ ते दहा जणांकडून रुग्णालयात तोडफोड,नागपूरमधील धक्कादायक घटना, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.


7. राज्यात गुरुवारी  25 हजार 425 कोरोनाबाधितांची नोंद तर 42 जणांचा मृत्यू, ओमायक्रॉनच्या 72 रुग्णांची नोंद 


8. पोलीस विभागामार्फत नागरिकांना एका OTP द्वारे घरबसल्या मिळणार लोकसेवांची माहिती, राज्यात प्रथमच पोलीस विभागाकडून सुविधा


9. राहुल गांधींसमोर मुख्यमंत्री चन्नी यांची सिद्धूंना 'जादू की झप्पी'; राहुल गांधींना म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा


 काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यावेळी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांना मिठी मारली. आमच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यांच्या निर्णयामागे आम्ही सर्वजण उभे राहू असंही ते म्हणाले. त्यामुळे किमान राहुल गांधींच्या समोर तरी या दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाल्याचं चित्र दिसून आलं. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "मला कोणत्याही पदाची आशा नाही. राहुल गांधींनी योग्य व्यक्तीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. त्याच्यामागे आम्ही सर्वजण एकदिलाने उभे राहू. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. आपल्यात आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्याच कोणताही वाद नाही."


10. एलआयसीचा आयपीओ मार्चपर्यंत येणार, दीपमच्या सचिवांची माहिती, आयपीओतून एक लाख कोटीपर्यंतचा फंड सरकार उभारणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.