Maharashtra Breaking News LIVE Updates : इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतलाय. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती. त्याचबरोबर या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परिक्षा फी भरण्यासाठी आता 31 जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती
अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढणे म्हणजे मोगलशाही पेक्षा वाईट आणि राज्य माने यांना सरकारने न्याय दयावा... सचिन खरात
एखाद्या पक्षाला बहुमताने सत्ता मिळते म्हणजे त्या पक्षाला हम करेसो कायदा करण्याचा आणि लोकशाहीच्या चिंधड्या करण्याचा दिलेला नाही. म्हणून मराठी अभिनेते किरण माने यांना मालिकेतुन काढून टाकले हे कृत्य मोगलशाही पेक्षाही वाईट आहेत या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष निषेध करत असून महाराष्ट्र सरकारने याची त्वरित दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी आणि किरण माने यांना न्याय दयावा.
ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहे. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका आहे.
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे. या मार्गिकेची लांबी ६ किमी असून त्यामध्ये शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हि पाच भूमिगत स्थानके आहेत. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाची लांबी ६ किमी असुन जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन टनेल बांधण्यात येत आहे. या दोन टनेल पैकी एका बाजूचे टनेल खोदण्याचे काम आज पुर्ण झाले आहे. एकुण १२ किमी टनेल पैकी १०.८ किमी (९० % ) टनेलचे काम पुर्ण झाले आहे. आज दि. १४.०१.२०२२ रोजी स्वारगेट वरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला आहे. स्वारगेट मधून निघालेले चवथे टनेल बोरिंग मशीन मंडई स्थानकाजवळ असुन लवकरच ते उर्वरीत १.२ किमीचा बोगदा पुर्ण करून बुधवार पेठ स्थानकाजवळ मार्च २०२२ अखेरीस पोहोचेल.
ज्या ज्या मार्गाने इंपेरिकल डाटा गोळा होईल त्या मार्गाने गोळा करायचा आहे. आपण जो अध्यादेश काढला त्याचा बेस काय आहे, हे न्यायालय पटवून देत आहोत. 17 जानेवारी ला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात अजनीं दमानिया पुन्हा कोर्टात गेल्या त्यावर काही भाष्य नाही. कोणाला काय करायचे करू द्या, आम्ही बोलणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले
जेष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांची प्रकृती अत्यावस्थ. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली असून त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमीका आहे.
पालघर : चहाडे तांदुळवाडी रोडवर वसरोली येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मासवन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मलिकेतून नुकतीच गच्छंती झालेले अभिनेते किरण माने यांनी घणाघाती आरोप केलाय. राजकीय दबावातून वाहिनीनं आपल्याला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला असा दावाच किरण माने यांनी केलाय. इतकच नव्हे तर मालिके्तून हटवण्यासाठी स्टार प्रवाहच्या पेजवर एक कॅम्पेन राबवली गेली होती असंही किरण माने यांचं म्हणणं आहे. किरण माने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक पोस्टमधून राजकीय भूमिका मांडत असतात. त्यांच्या अशाच काही पोस्टवरून ते ट्रोल झाले होते आणि समाजमाध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता राजकीय विश्वातूनही प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत त्यामुळे हा विषय आता राजकीय वळणावर जाऊन पोहोचलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसाल तर तब्येत बरी होईपर्यंत चार्ज दुसऱ्याकडे द्या, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला लगावलाय. काम न करता बोलणारे अनेक आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारलं. लोक कौतुक करत नसले तरी कोविड काळात केलेल्या कामाचं न्यूयॉर्कपासून ते न्यायालयापर्यंत अनेकांनी कौतुक केलं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई महापालिकेच्या व्हॉट्स चॅट बॉट सुविधेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
गेले चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या नांदेडच्या मुखेडमध्ये काल गारपीट झालेय. तर, मुखेड, देगलूर तालुक्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरीदेखील बरसल्या. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याला चांगलीच हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनंतर उत्तरेकडील थंडीची लाट ओसरायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तापमान 2-3 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे.
देशातील महानगरांतील आजचे दर :
देशातील प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 | 94.14 |
दिल्ली | 95.41 | 86.67 |
चेन्नई | 101.40 | 91.43 |
कोलकाता | 104.67 | 89.79 |
पाटणा | 105.92 | 91.09 |
गेले 18 दिवस गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे काल माध्यमांसमोर आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नितेश राणे दाखल झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपच्या मनीष दळवी यांची अध्यक्ष म्हणून काल निवड झाली. राणे यांनी नव्या अध्यक्षांचं अभिनंदन केलं. शिवसेनेच्या संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर नितेश राणे गायब झाले होते. आणि काल 18 दिवसानंतर ते समोर आले.
संक्रांतीच्या दिवशी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि देहूतील संत तुकाराम महाराजांचं मंदिर बंद राहणार आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच संक्रांतीच्या दिवशी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्हीही मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर, तिकडे पंढरपुरातील विठोबाचं मंदिर मात्र, 15 जानेवारीपर्यंत सुरुच राहणार आहे. कोरोनाचे नियम पाळून भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे.
देशातली सध्याची कोरोना परिस्थिती पाहता देशात लॉकडाऊन लागणार नसल्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी काल दिले. अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर उद्योगधंद्यांना कमीत कमीत नुकसान होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं मोदी म्हणालेत. कोरोनाला आळा घालायचा असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करण्याची आवश्यकता असल्याचंही मोदी म्हणाले. देशभरातील 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी काल संवाद साधला. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Railways collects fines : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्बंध घातले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कोरोनाच्या काळात मध्य रेल्वेने देखील अनेक प्रवाशांवर कारवाई केली आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे ज्या प्रवाशांनी पालन केले नाही त्यांच्याकडून मध्य रेल्वेने दंड वसूल केला आहे. या महिन्यात आत्तापर्यंत रेल्वे स्टेशनवर मास्क न घालणाऱ्या 2 हजार 293 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून 3.93 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून वारंवार प्रवाशांना कोरोनाच्या संदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरी देखील काही प्रवाशी नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेन त्यांच्याविरोधात कारवाई करत दंड वसूल केला आहे. मध्ये रेल्वेने ही मोहिम एप्रील 2021 पासून सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत एकूण 30 हजार 375 प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून 50.20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 12 जानेवारीला रेल्वे स्टेशनवर मास्क न घातलेल्या 256 प्रवाशांवर कारावाई केली. त्यांच्याकडून 44 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Kiran Mane : छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका देखील सोशल मीडियावर मांडत आहेत. किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. पण किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे.
एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -