मुंबई : मंत्रालयातील अनेक संगणकांमध्ये व्हायरसने शिरकाव केला आहे. 'लॉकी रॅन्सन' नावाच्या या व्हायरसमुळे अनेक संगणक करप्ट झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही मंत्रालयातील अनेक कॉम्प्युटर बंद असून, तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


 

महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक संगणक करप्ट झाले आहेत.

 

ई-मेल द्वारे हा व्हायरस मंत्रालयापर्यंत पोहोचला. या व्हायरसमुळे मंत्रालयातून मेल करणं कठीण बनलं आहे. या व्हायरसमुळे मेलमधील मजकूर स्पेशल कॅरॅक्टर्स जसे की ं$#़॥ असा दिसतो. केवळ जेपीजी फाईलच ओपन होत आहेत.

 

त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना g mail वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, ऑफिशियल मेल वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय USB च्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

 

मंत्रालयात सुमारे 5000 संगणक आहेत. यापैकी कोणकोणत्या संगणकांपर्यंत हा व्हायरस पोहोचला आहे, हे शोधण्याचं काम आयटी विभाग करत आहे.