Mahavitaran Strike Live Updates : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी
Mahavitaran Strike Live Updates : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees) संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्या बैठकीत यशस्वी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
आंदोलनाबद्दल बैठकीत चर्चा
संप मागे घेण्याबाबत तोडगा निघाला असं समजतेय.. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार
Kalyan Mahavitran Strike : महावितरणच्या खासगीकरणा विरोधात महावितरणच्या कर्मचारी संघटनांनी राज्यव्यापी 72 तासांचा संप पुकारला आहे. या संपात 31 संघटनांनी सहभाग घेतला असून कल्याण परिमंडळ मधील सुमारे 95 टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. आज कल्याणमधील महावितरण कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासगीकरणाचा विरोध केला. यावेळी दीड वाजता ऊर्जा मंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक असून या बैठकीत योग्य तोडगा निघेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली
Bhandara Mahavitran Strike : भंडारा जिल्ह्यातील सुमारे 10 हजार वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे. सकाळपासून जिल्ह्यातील अनेक फिडर बंद आहेत. कुठे 11 केव्ही, तर कुठे 33 केव्ही फिडर बंद आहेत. त्यामुळे सुमारे 10 हजार घरागुती आणि कृषी वीज ग्राहकांची वीज बंद आहे. वीज बंदचा फटका बसल्याने छोटे मोठे व्यावसायिक तथा गृहिणींना नसल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
Mahavitran Strike : आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. आजपासून राज्यभर या संपाला सुरुवात झाली असून, या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. आज दुपारी दोन वाजता 31 संघटनासोबत देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असून, या बैठकीनंतर तरी संप मिटणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Bhandara Mahavitran Strike : वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका भंडारा जिल्हा परिषदला बसला आहे. सुमारे दोन तासापासून हा वीज पुरवठा खंडित झाला असून, जिल्हा परिषदेतील अनेक विभाग अंधारात आहेत. जिल्हा परिषद पूर्णपणे अंधारात असल्याने संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये दिवसाच रात्रीचा अनुभव येत आहे. जिल्हा परिषदमधील अनेक कक्षांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं काळोखाचे साम्राज्य पसरलेले आहे. तर अनेकांना मोबाईलचा वापर करून काम करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
Vasai Mahavitran Strike : वीज महावितरणच्या खासगीकरणाविरोधात वसई तालुक्यातील महावितरणाचे अधिकारी कर्मचारी एकवटले आहेत. वसईत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. अदानी गो बॅक, खासगीकरण थांबलेच पाहिजे, जनतेचे महावितरण वाचले पाहिजे अशा घोषणा देत वसई महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर आज 11 वाजल्यापासून आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात तालुक्यातील 1 हजार 200 च्या वर महावितरण अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. महावितरणाचा हा तीन दिवस संप चालूच राहणार असून, वसई तालुका मंडळातील वसई, विरार, नालासोपारा आणि वाडा तालुक्यातील 10 लाखापेक्षा अधिका वीज ग्राहकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Satara Mahavitran Strike : महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळं कोयना धरणाचे 2 युनिट बंद झाले आहेत. या 2 युनिट मधून 36 मेगावॉट वीज निर्मिती होते. एकूण 4 युनिट आहेत त्यातले 2 काही तासातच बंद पडले आहेत. आगामी काळात तेही बंद पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक वीज निर्मिती प्रकलपाची वीज निर्मिती बंद होईल. कोयना धरणाच्या शेजारी असलेल्या पोफळी येथील वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मागणी आणि पुरवठ्यामध्ये 9 हजार मेगवॉटची तफावत आहे. ही तफावत वाढत जाईल.
-
Dhule Mahavitran Strike : धुळे जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्राध्यापक शरद पाटील त्या सर्व शिवसैनिकांनी सहभागी होत शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणा विरोधात घोषणा दिल्या.
Bhandara Mahavitran Strike : खासगीकरणाच्या विरोधात भंडारा आणि गोंदियातील महावितरणचे कर्मचारी संपात उतरले आहेत. भंडारा आणि गोंदिया येथील कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. भंडारा येथील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी भंडारा शहरातील मुख्य मार्गाने बाईक रॅली काढत खासगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Nanded Mahavitran Strike : 72 तासात मागण्या मान्य न झाल्यास 18 जानेवारी पासून बेमुदत संपावर, नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा इशारा
Nanded Mahavitran Strike : नांदेड जिल्ह्यातील 142 सबस्टेशनच्या 1 हजार 700 महावितरण कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. अदानी समूहास महावीतरणचे समभाग देऊन खासगीकरण करण्याला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. येत्या 72 तासात राज्य सरकारनं या संपावर सकारात्मक भूमिका न घेतल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशारा या संपात सहभागी झालेल्या 31 संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
Pandharpur Mahavitran Strike : वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांचे पंढरपूर इथे आंदोलन सुरू झाले आहे. पंढरपूर शहरातील अनेक भागातील वीज गायब झाली आहे.
Yavatmal Mahavitran Strike : वीज वितरण कंपनीच्या संपाचा यवतमाळ जिल्ह्यातील 550 गावांवर परिणाम झाला आहे. वीज वितरण कंपनीचे खासगीकरण होऊ नये या मुख्य मागणीसाठी संपूर्ण राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील 3000 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात या संपामुळं 33 kv च्या 11 फिटर बंद पडले आहे. एका फिडरवर 40 ते 50 गावे असून जवळपास 450 वर गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर 11 kv ची 80 लाइन बंद असल्याने जवळपास 160 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या आंदोलनामुळे आता या गावचा विद्युत पुरवठा कधी येईल हे सांगणे कठीण आहे.
Aurangabad Mahavitran Strike : औरंगाबादमध्ये 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. खासगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
Mahavitaran Strike Latur : लातूर जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपाचा फटका उदगीर आणि अहमदपूर भागातील अनेक ठिकाणी बसला आहे. सकाळ पासूनच बहुतांश भागात वीज नसल्यामुळे उदगीरकराचे अनेक कामे खोळंबली आहेत. उदगीर तालुक्यातील जवळपास 50 टक्के भागात वीज पुरवठा खंडित आहे. अहमदपूर भागातील वीज पुरवठा 70 टक्क्यांपर्यंत बंद आहे. लातूर ग्रामीण भागातील शेती पंपाच्या वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच अनेक भागात वीज पुरवठा सकाळपासून नाही. औराद शहाजानी भागात ही वीज पुरवठा खंडित आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण बंद करणे.
Mahavitaran Strike Nagpur : खासगीकरणाला विरोध म्हणून राज्यभरातील महावितरण, महापारेण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी काल, मंगळवारी मध्यरात्री 12 च्या ठोक्यापासून संपावर गेले आहेत. नागपुरातील तिन्ही कंपन्यांचे सुमारे दहा हजार कर्मचारी संपावर गेल्याचा दावा केला जात आहे. कामगारांच्या सर्वच संघटनांनी सहभाग नोंदविल्याने शंभर टक्के कर्मचारी संपावर असल्याचा दावा करण्यात आला. यामुळे वीज यंत्रणा रामभरोसे असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Aurangabad Mahavitran Strike : औरंगाबाद परिमंडलातील सुमारे 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शहरासाठी 275 कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग केलं आहे.
Nashik Mahavitran Strike : नाशिकच्या मुंगसरे गावात शेतकरी संतप्त झाले आहेत. गावातील सबस्टेशनवर शेतकरी जमा झाले आहेत. रात्रीपासून दुगाव, मुंगसरा, दरी या तिन गावचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. नाशिकच्या अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा थ्री फेज आणि सिंगल फेजचा देखील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा बंद असल्याने गावांचा कारभारच ठप्प झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत विद्युत विभागाकडे विचारणा केली असता कर्मचारी कामावर आले नसल्याचे कारण दिले.
Amravati Mahavitran Strike : विज कर्मचाऱ्यांचा संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका..
रात्रीपासून अमरावती शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. सकाळी अनेकांना कामावर जायचे असते. त्यामुळं महिलांनी स्वयंपाक बनवायच कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या घरात वीज नसल्यानं घरात पाणी नाही.
Buldana Mahavitran Strike : बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1 हजार 304 कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार 275 कर्मचारी म्हणजे 98 टक्के कर्मचारी संपावर गेले आहेत. वीज वितरण कंपनीचे खासगीकरण होऊ नये या मुख्य मागणीसाठी संपूर्ण राज्यातील विज कर्मचारी संपावर गेले आहे. जिल्ह्यात एकूण 111 सबस्टेशन आहेत त्यांपैकी 90 सबसटेशन बंद करण्यात आली आहेत. 140 ऑपरेटरपैकी 130 ऑपरेटर संपावर गेले असल्याने जिल्ह्यातील विज पुरवठा विसकाळीत झाला आहे. त्यामुळं सर्व वीज ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
Bhandara Mahavitran Strike : भंडारा जिल्ह्यातील 775 कर्मचारी संपत सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील काही गावांचा यात समावेश आहे.
Buldana Mahavitran Strike : बुलढाण्यात वीज वितरण केंद्रांना मोठी सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. कर्मचारी संपावर असल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण केंद्र हे रामभरोसे आहेत. त्यामुळं या वीज केंद्राची सुरक्षा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
Chandrapur Mahavitran Strike : चंद्रपूर जिल्ह्यातील महावितरणचे 1 हजार 400 कर्मचारी संपात सामील झाले आहेत. अनेक भागात वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ब्रम्हपुरी शहर आणि ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. उदापूर येथील सबस्टेशन मध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर सिंदेवाही, नागभीड आणि राजुरा तालुक्यात अनेक ठिकाणी फीडर चा ब्रेक डाऊन झाल्याने विजेचा लपंडाव सुरु, महावितरण कडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Nandurbar Mahavitran Strike : नंदूरबार जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार विभागातील जवळपास 1 हजार 500 कर्मचारी संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील एकही उपकेंद्राचा आतापर्यंत विद्युत पुरवठा प्रभावीत झालेला नाही. मात्र ग्रामीण भागातील सब स्टेशन वर कर्मचारी नसल्याने काही बिघाड झाल्यास अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा प्रभावित होऊ शकतो.
Dhule Mahavitran Strike : धुळे जिल्ह्यात 800 वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर उतरले आहेत. जिल्ह्यातील शिरपूर बोरीस आणि रोहिणी येथील उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यात 86 वीज उपकेंद्र आहेत. अजूनही बऱ्याच भागातील वीज पुरवठा खंडित होण्याची माहिती देण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
Washim Mahavitran Strike : महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील 600 कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, या संपामुळं 4 वीज वितरण करणारे सब स्टेशन बंद पडले आहेत. यामुळं 16 हजार ग्राहक वीजेपासून प्रभावित झाले आहे. वाशिमच्या पिंपळगाव, राजगाव आणि पोलंफेक्ट्री अमानी हे सब स्टेशन बंद आहेत.
Ahmadnagar Mahavitran Strike: अहमदनगरच्या उपनगरातील अनेक भागात रात्रीच बत्ती गुल झाली आहे नगर शहरातील अनेक भागात रात्री 2 वाजल्यापासून वीज बंद. आहे. महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू होताच उपनगरात वीज गेली आहे,
Nagpur Mahavitran Strike: वीज वितरण यंत्रणेच्या खाजगीकरणा विरोधात राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर आहेत. रात्री बारा पासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. रात्री बारा वाजता नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संपावर आहे. संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी असल्याचा दावा
Koyna Mahavitran Strike: वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका कोयना वीज निर्मिती प्रकल्पाला बसला आहे. 36 मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद झाले आहे. संप असाच सुरू राहिला तर कोयनेचे इतरही वीज निर्मिती बंद होण्याच्या मार्गावर आहे.
Mahavitaran Strike: महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खाजगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.यात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे.हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे.
Satara Electricity:
- सातारा शहरातील लाईट बंद
- संपक-यांनी केल्या लाईट बंद
- विविध मागण्यांसाठी विद्युत महामंडळातील कर्मचाऱ्यांचा सुरू आहे संप
- पहाटे तीन पासून लाईट बंद
- सातारकरांची सकाळ अंधारात
Buldana Mahavitran Strike: बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं औद्योगिक शहर असलेलं खामगाव येथील 80 टक्के वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व वीज कर्मचारी संपावर तर कंत्राटी कामगारांनी वीज कर्मचाऱ्यांना दिला पाठिंबा. जिल्ह्यातील 152 कंत्राटी वीज कर्मचारी सुद्धा संपावर गेल्याने खामगाव शहरातील 80 टक्के भागात वीज पुरवठा खंडित आहे.
Buldana Mahavitran Strike: बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं औद्योगिक शहर असलेलं खामगाव येथील 80 टक्के वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व वीज कर्मचारी संपावर तर कंत्राटी कामगारांनी वीज कर्मचाऱ्यांना दिला पाठिंबा. जिल्ह्यातील 152 कंत्राटी वीज कर्मचारी सुद्धा संपावर गेल्याने खामगाव शहरातील 80 टक्के भागात वीज पुरवठा खंडित आहे.
Palghar Mahavitran Strike: पालघर जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे जवळपास साडेपाचशे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये दीडशे तांत्रिक कर्मचारी साडेतीनशे कंत्राटी कर्मचारी 60 अभियंता आणि 40 ऑपरेटर त्याचप्रमाणे रोजंदारीवर असलेले कर्मचारीही संपावर आहेत त्यामुळे जिल्ह्यातील वीज वितरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे
Ambarnath Mahavitran Strike: अंबरनाथ आणि बदलापुरात महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसण्यास सुरुवात झाली अंबरनाथच्या सर्वोदय नगरमध्ये रात्री पाऊण वाजल्यापासून बत्ती गुल तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात रात्रीपासून वीज खंडित झाला आहे. नागरिकांकडून महावितरणच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला माहिती दिली मात्र रात्रभरात लाईट आलेले नसल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत.
Ahmadnagar Mahavitran Strike: अहमदनगरच्या उपनगरातील अनेक भागात रात्री बत्ती गुल
Ahmadnagar Mahavitran Strike: अहमदनगरच्या उपनगरातील अनेक भागात रात्रीच बत्ती गुल झाली आहे नगर शहरातील अनेक भागात रात्री 2 वाजल्यापासून वीज बंद. आहे. महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू होताच उपनगरात वीज गेली आहे,
Chandrapur Mahavitran Strike: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं पाच युनिट पडले बंद पडले आहे. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात आहे. सध्या 2920 मेगावॅट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातून 1520 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.
पार्श्वभूमी
Mahavitaran Strike Live Updates : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees) संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर विविध परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर 24 तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल तसेच दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
महावितरणाच्या राज्यव्यापी संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांचा सहभाग
महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा संपात समावेश आहे. तर रायगडमध्ये 1 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महावितरण बंदचा फटका पुण्यालगतच्या भागाला
महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहे. पुण्यातील शिवणे, सनसिटी, वडगाव धायरी या परिसरात लाईट बंद आहे. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने पहाटेपासून लाईट बंद असल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -