मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा करणार कसा? असा प्रश्न आता समोर आलाय. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागलाय. ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीव तडफडू लागलेत. काय आहे सध्या राज्यात ऑक्सिजनची परिस्थिती जाणून घेऊया.
मुंबई विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण- 89,125
ऑक्सिजची गरज- 204 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 62 मेट्रिक टन
नागपूर विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण- 87,344
ऑक्सिजनची गरज- 188 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 100 मेट्रिक टन
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात आवश्यकता असतानाही पुरवठा नाही.
नाशिक विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण- 75,770
ऑक्सिजनची गरज- 182 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 186 मेट्रिक टन
पुणे विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण - 1,32,910
ऑक्सिजनची गरज- 294 मेट्रिक टन
ऑक्सिजन पुरवठा- 578 मेट्रिक टन
Break The Chain : राज्यात आज रात्री 8 पासून कलम 144 लागू; काय सुरु, काय बंद?
औरंगाबाद विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण- 64,157
ऑक्सिजनची गरज- 142 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा - 151 मेट्रिक टन
यापैकी जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आवश्यकता असतानाही पुरवठा नाही.
अमरावती विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण - 20,142
ऑक्सिजनची गरज- 47 मेट्रिक टन
आवश्यकता असताना काहीच पुरवठा होऊ शकला नाही.
Coronavirus | आळशी लोकांना कोरोनाचा धोका अधिक, संशोधनातून माहिती उघड
कोकण विभाग
अॅक्टिव्ह रुग्ण- 95,261 (यापैकी एकट्या ठाणे जिल्ह्यात 75 हजार रुग्ण)
ऑक्सिजनची गरज- 211 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 394 मेट्रिक टन
दोन दिवसांपूर्वी ठाण्यात ऑक्सिजन संपल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते.
संपूर्ण राज्यात अॅक्टिव्ह रुग्ण 5 लाख 64 हजार आहेत. त्यांना ऑक्सिजनची गरज- 1278 मेट्रिक टन इतकी आहे. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा 1481 मेट्रिक टन होतोय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने आता छत्तीसगडमधील भिलाई, कर्नाटकमधील बेल्लारी आणि हैदराबादमधून ऑक्सिजन मागवायला सुरुवात केलीय. मात्र त्याचाही मर्यादित पुरवठा आहे. मात्र वाहतुकीच अंतर लक्षात घेता तिथेही अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय.