Maharashtra Local Body Election LIVE Updates : राज्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान, जाणून घ्या अपडेट्स
Maharashtra Local Body Election Live Updates : ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील 106 नगरपंचायतीसाठी मतदान आज पार पडणार आहे.
abp majha web team Last Updated: 21 Dec 2021 07:36 AM
पार्श्वभूमी
Maharashtra Local Body Election Live Updates : राज्यात आज 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून...More
Maharashtra Local Body Election Live Updates : राज्यात आज 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. >> या प्रमुख नगरपंचायतीच्या लढतींकडे लक्ष मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ ( सिंधुदुर्ग ), देहू (पुणे-नवनिर्मित नगरपंचायत), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी ( सातारा ), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), तर, सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित नगरपंचायत), वैराग (नवनिर्मित नगरपंचायत), नातेपुते (नवनिर्मित नगरपंचायत) या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष आहे.भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती नगर पंचायतीच्या थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे ..भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 जागासाठी पंचायत समितीच्या 79 जागा तर नगर पंचायतिच्या 39 जागासाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 43 जागा नगर पंचायतिच्या 86 जागा तर पंचायत समितीच्या 45 जागासाठी हे मतदान होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला पोंभुर्णा - एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना16 आणि राष्ट्रवादी15 जागा लढवत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला. गोंडपिंपरी - एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस17, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 13 जागा लढवत आहे. कोरपना - एकूण जागा - 17, या ठिकाणी काँग्रेसने सर्व 17 जागांवर आपले उमेदवार दिले आहे तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना यांची छुपी युती आहे. या सर्व पक्षांनी काँग्रेस विरुध्द मिळून आपले उमेदवार दिले आहे. या ठिकाणी भाजप 10, राष्ट्रवादी 02, शेतकरी संघटना 04 आणि शिवसेना 01 जागा लढवत आहे. भाजप आपल्या कमळ या चिन्हावर लढत आहे तर राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना हे टेबल या चिन्हावर लढत आहे. जिवती - एकूण जागा - 17, या ठिकाणी भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची युती असून गोगपा 10 आणि भाजप 07 जागा लढवत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असून काँग्रेस 09 आणि राष्ट्रवादी 08 जागा लढवत आहे. शिवसेना स्वतंत्र पणे निवडणूक लढत असून 10 जागी त्यांनी उमेदवार दिले आहेत. सिंदेवाही - एकूण जागा - 17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 16 जागा लढवत आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला सावली - एकूण जागा - 17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढवत आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी वगळता अकोले , पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी मतदान
अहमदनगर जिल्हयात शिर्डी वगळता अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी मतदान पार पडले. यावेळी अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 % मतदान झाले. तर कर्जत नगरपंचायतीसाठी 80.21 % मतदान झाले. शिवाय पारनेर नगरपंचायतीसाठी 86.7 % मतदान पार प़डले.