Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आहे. बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार आहे. 3 मार्चपासून सुरू अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तर रायगड आणि नाशिकच्या...More
नांदेडला महसूल आयुक्तालय व्हावं अशी मागणी आहे. याबाबत आपण महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पालकमंत्री अतुल सावे म्हणाले. दोन्ही मंत्र्यांशी चर्चा करुन दांगट समितीच्या अहवालाचा अभ्यास करुन याबाबत निर्णय होईल, असं अतुल सावे म्हणाले. नांदेडला आयुक्तलयासाठी महसूलमंत्र्याची तयारी असेल तर माझा पाठींबा असल्याचे अतुल सावे म्हणाले. दरम्यान नांदेडला पोलीस आयुक्तालय करण्याचे निवेदन आले. मी पुढील कार्यवाहीसाठी ते निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचे अतुल सावे म्हणाले.
विरार : गुजरातच्या अहमदाबाद येथील दोन आरोपींनी मुंबई आणि उपनगरातील वयोवृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केली होती. 4 फेब्रुवारी 2025 रोजी भाईंदरमध्ये 60 वर्षीय महिलेचे 80 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले होते. मिरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने 10 दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहमदाबादचे असल्याचे स्पष्ट झाले. 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता विशेष पथकाने सरदारनगर पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली. चौकशीत आरोपींवर यापूर्वीही मुंबई आणि उपनगरातील नवघर, घाटकोपर, दहिसर, माटुंगा, भांडुप, उल्हासनगर, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे.
बार्शी-लातूर बायपासवर ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात
या ट्रॅक्टरला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झाला भीषण अपघात
अपघातात 12 जण जखमी तर यामध्ये सात लहान मुले , तीन महिलांचा समावेश
शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारासची घटना
जखमीपैकी चौघाची प्रकृती गंभीर उर्वरित सर्व जण स्थिर असल्याची पोलिसांची माहिती
या अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींवर बार्शीत उपचार सुरू आहेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर.
आज मराठी साहित्य संमेलनाला असणार उपस्थित.
उद्या २४ फेब्रुवारी रोजी उपमुखमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्याला जाणार.
आमदार नितीन राऊत
आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली
१४ दिवसांच कामकाज दाखविण्यात आले आहे
साधारणत ५ आठवडे कामकाज चालते पण यंदा ३ आठवडे आहे
या कामकाज वेळी जागतिक महिला दिन आहे
संविधान चर्चा व्हाव्ही ही मागणी केली होती
तो प्रस्ताव मान्य केला आहे. २ दिवस संविधानावर चर्चा होईल
अर्थसंकल्पावर २ दिवसच ठेवले आहे
आम्ही एक दिवस वाढवून मागणी
विधानसभा कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत मी होतो
विजय वड्डेटीवार आले नाही त्याच्याशी माझे बोलणे झाले आहे
देशाच्या राजधानीत जागतिक मराठी परिषद सुरू आहे
रविंद्र धंगेकर माजी आमदार
शिवजयंती मधील माझा फोटो आहे जो सध्या वायरल होत आहे.तो मी चागलं वाटला म्हणून स्टेटस ला ठेवला,हिदू धर्म आहे,भगवा ठेवण गैर काय आहे
सगळीकडे मित्र आहेत सगळ्या पक्षात मित्र आहेत,येणं जाणं होत,फोटो बाहेर आल्याने चर्चा सुरू आहे.मी अजित दादांना पण भेटतो
मी काँग्रेस मध्येच आहे.धर्माचा अभिमान आहे.द्वेष करण आपल्याला जमत नाही
माझ सगळीकडे स्वागत केल जात आहे. चागली लोक सगळ्यांना आवडतात.त्यामुळे उदय सामंत यांनी स्वागत करू म्हंटले
मी सर्वांना भेटलो माझी काम होती म्हणून एकनाथ शिंदे यांना भेटतो काम असल्याने सगळ्यांना भेटतो
येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढे निर्णय घेणार
काय करायचे पुढील दिशा राजकारणाची
ठरवण्यासाठी कार्यकर्त्याशी बोलणार
आज काँग्रेस मधे आहे उद्या पण दिसेल तुम्हाला मी काँग्रेस आहे.
मी सगळ्यांना भेटतो.जुने मित्र असतात.
लोकांच्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत.
सध्या सोसियल मीडियावर जे सुरू आहे त्याबाबत कार्यकर्त्याशी बोलणार त्यांना काय वाटत जाणून घेणार
ब्रेकींग ( क्रिकेट सामना)
भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये होम हवन...
सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी खामला येथील हनुमान मंदिरात पूजा पाठ...
विराट कोहली, रोहित शर्मा सह इतर भारतीय खेळाडूंचे फोटो घेवून क्रिकेट समर्थक बसले पूजेला बसले आहे..
कामगार सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात
पण आजच्या बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांची गैरहजेरी
विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित नाही
अंबादास दानवे यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याने अनुपस्थित
तसेच पत्र दिले असल्याची दानवेंच्या कार्यालयातून माहिती
बुलढाण्यात अफूच्या शेतीमागे राजकीय नेता असण्याची शक्यता.
अफूची शेती होत होती त्यावेळी पोलिस हप्ते वसुलीत मश्गूल होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृह खात्यावर निशाणा.
काल बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जवळपास 12 कोटी साठ लाख रुपयाची गांजाची झाडे एका शेतातून जप्त केली. या प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एकटा शेतकरी अशी शेती करू शकत नाही.. यामागे राजकीय नेता व पाठबळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी. यामागे कोण आहे हे समोर आणावं. ज्यावेळी बुलढाण्यात अफूची शेती होत होती त्यावेळेस बुलढाण्यासह राज्यातील पोलीस हे हप्ता वसुलीत मश्गूल होते असा ही हल्लाबोल त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विधीमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार
नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या केस च्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल आहे
माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत २ वर्षाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावलेला आहे
सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का?असा सवाल आत्ता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे
मुंबई, दि. 23 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा पॅरिस दौरा.सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आज रवाना.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज पॅरिसला गेले आहे. महाराष्ट्र शासनाने 'मराठा लष्करी भूप्रदेश' (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पुर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री एँड शेलार यांनी आभार मानले आहेत.
पुणे: दोघे छावां चित्रपट पाहण्यासाठी आले. मात्र गजाआड झाले
हडपसर मधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले.मात्र चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले.
मकोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले.
धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा ( वय 22 वर्षे, रा. दिघी ) व बादशहशिंग पोलादसिंग भोंड ( वय 23 वर्षे, रा. शिवआदर्श नगर, दिघी ) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
दिघी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.ते अनेक दिवसापासून फरार होते.
यूनिट सहा हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना भादा व भोंड हे हडपसर मधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव.शेतशिवारात विषबाधेमुळे १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारी काही शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता, हळदीच्या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणी साठी वापरण्यात येणारे औषध टाकीतील विषारी पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. रासायनिक कीटकनाशकेच हे पाणी पिल्यामुळे १५ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत काही शेळ्यांना देखील विषबाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शेळीपालकांच मोठं आर्थिक नुकसान झालंय...
Gadchiroli: गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव आणि केंद्रप्रमुखास धान घोटाळा प्रकरनी पोलिसांनी अटक केली आहे. किशोर पदा असे संस्था सचिवाचे तर सुरेश पुंगाटी असे केंद्रप्रमुखाचे नाव आहे. संस्था अध्यक्ष सुधाकर पुंगाठी हे फरार आहेत. खरीप हंगाम 2022- 23 मध्ये खरेदी केलेल्या धान्यात 1. 37 कोटी रुपये किमतीचे 13 हजार धानपोती कमी आढळली होती. या गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या या तिघांसह मदतनीस प्रवीण दुर्गे, अहेरी येथील प्रभारी विपणन अधिकारी सोनाली पेंदाम या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल वर्षभरानंतर संस्था प्रमुख आणि सचिवाला अटक करण्यात आली असून संस्था अध्यक्ष फरार आहे.
गडचिरोली : वाघ आणि बिबट्याची शिकार करून कातडी आणि इतर अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील वनविभागाच्या चमुने केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील काही लोक शिकार व तस्करीत गुंतल्याची माहिती समोर आली होती. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ-बिबट्याच्या कातडीसह इतर अवयवांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच आधारे नकली ग्राहक पाठवून तीन आरोपींना 19 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याच्या मिशा, दोन दात, तसेच उदमांजराची कातडी आणि एक गावठी पिस्तुलही जप्त करण्यात आले होते. त्या आरोपींनी हे साहित्य मिळवण्यात कोरची तालुक्यातील आरोपींचा हात असल्याचे सांगितल्यानंतर सडक अर्जुनीच्या चमुने कोरची तालुक्यातील नकुल प्रल्हाद शहारे रा.कोहका आणि जितेंद्र गोविंदराव कराळे या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून बिबट्याची कातडीही जप्त करण्यात आली आहे. यात आणखी तिघांचा समावेश असून त्याचा शोध सुरू आहे. दोघांना बेडगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
नाशिकच्या सिडको भागात असलेल्या सोन्याच्या दुकानात भर दिवसा दरोडा टाकत बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी सराफास लुटल्याची घटना मागच्या आठवड्यात घडली होती. मात्र नाशिक पोलिसांनी तिघांपैकी दोघांना अटक करत एक पिस्तूल देखील हस्तगत केले होते. मात्र या टोळीचा मोरक्या राज्यात पळून गेल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली असताना नाशिक पोलिसांचा एक पथक हरियाणा या ठिकाणी जाऊन त्यांनी सराईत गुन्हेगार असलेला नरेंद्र अहिरवार यास सीताफिने अटक केली आहे... काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.यासंदर्भात अधिकचा तपास अंबड पोलीस करत असून या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक गुंडाविरोधी पथकाने मोठी कामगिरी केली आहे.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्रमधील एका एस टी बस चालकाला कन्नड बोलता नाही म्हणून मारहाण करून बसची तोडफोड करण्यात आली.त्याचा निषेध म्हणून काल परिवहन मंत्र्यांनी राज्यातून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या बस बंद
पुण्याच्या स्वारगेट डेपोतून कर्नाटक राज्यात ६ बस दिवसभरात ये जा करत असतात.यामधील २ बिदर २ गुलबर्ग १ विजापूर १ गाणगापूर अशा बस जात असतात.
पुण्यात काल शिवसेना उबाठा गटाकडून या घटनेचा तीव्र आंदोलन करून तीव्र निषेध काल केला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पुण्याहून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या बस बंद करण्यात आलेल्या आहेत.
कर्नाटक मधील काही बस आलेले आहेत त्या परत पाठवण्यात आल्या आहेत.
सोलापूर:- महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला कर्नाटकात मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर खबरदारी म्हणून आज सकाळपासूनच महाराष्ट्रतून कर्नाटक दिशेने जाणाऱ्या एसटी बंद करण्यात आल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होताना दिसतेय. सध्या कर्नाटकातून ज्या एसटी सोलापुरात येतायत केवळ त्याच परत कर्नाटकला जातायत. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरु असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. अनेक प्रवासी एसटी स्टॅन्डवर तटकळत थांबलेले आहेत
पुणे: आज भारत पाकिस्तान महा मुकाबलाची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळते. ही मॅच पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी खास नियोजन केलेला आहे. सगळे मित्र एकत्र येणार आहेत ही मॅच पाहण्यासाठी खास मेजवानीचही आयोजन करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात आले तर काही हॉटेल्स कडून वेगवेगळ्या ऑफर्स सुद्धा दिले जातात..
धाराशिव- केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल तसेच कृषी युवक महिला अशा सर्वच विकासासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास भाजपाचे अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलाय. केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्याचे अभियान भाजपकडून सुरू करण्यात आले आहे त्यादरम्यान आमदार कल्याण शेट्टी हे धाराशिव येथे आले होते.
भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गालगत कोशिंबी येथे मध्यरात्रीच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
- महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस 24 तास राहणार सुरू
- महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला पहाटे चार वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर राहणार 24 तास सुरू...
- तसेच या काळात vip आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शन देखील बंद ठेवण्याचा निर्णय
- महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन देखील राहणार बंद...
पालघरमधील होऊ घातलेल्या वाढवण बंदराजवळच आता कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ तयार करण्याबाबत केंद्र सरकार विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे . असं झाल्यास समुद्रात बांधलेले भारतातील हे पहिले विमानतळ असणार आहे . समुद्रात बांधण्यात येणाऱ्या या विमानतळाला केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली आहे . वाढवण बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन केल्यानंतर पालघर मध्ये विमानतळाच्या प्रस्तावाला वेग आला असून जिल्ह्यात शासनाच्या असलेल्या जमिनीची कमतरता लक्षात घेऊन कृत्रिम बेटावर विमानतळ तयार केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे .
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक
आज सकाळी ११ वाजता विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीचे विधान भवनात आयोजन
या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार तर १० मार्च रोजी अजित पवार मांडणार देवेंद्र फडणवीस ३.० सरकारचा अर्थसंकल्प
नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेने हटवले. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. यावेळी दोन गट आमने-सामने आल्याने नाशिक शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण पाठवल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली. आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी सात दिवस आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय घेतला मात्र रात्रभरापासून नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत होता सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असून पोलिसांचा बंदोबस्त कायम असल्याचे पाहायला मिळत आहे तर काठे गल्ली परिसरातील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आला.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत. केवळ कोल्हापुरातूनच नाही तर सर्वच आगारातून कर्नाटकात एसटी बसची सेवा थांबवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होते. कोल्हापूर, सांगली सोलापूर या सीमेलगतच्या जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येने प्रवासी दोन राज्यात ये जा करत असतात.
शिवाजी पार्क येथील रमाकांत आचरेकर सर स्मारकाजवळ स्मारक टीमकडून आज टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात आहेत….आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना आहे साधारण सकाळी ९ः३० वाजता टीम इंडीयाला शुभेच्छा देण्यात येणार
- भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्या निमित्त नागपूरातील मोठ्या हॅास्पीटलची रुग्णांसाठी खास ॲाफर…
- आज भारत जिंकणार या विश्वासाने उद्या ‘ओपीडी’ १०० टक्के डिस्काऊंट
- नागपूरात तायवाडे हॅास्पीटलची उद्या निःशुल्क ओपीडी
- रुग्णालयाचे डायरेक्टड डॅा. शौनक तायवाडे यांची माहिती
बारावीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान भरारी पथकानं तपासणी केली असता एक कॉपी विद्यार्थी कॉपी करताना आढळला. त्याच्यावर भरारी पथकानं भंडाऱ्यात कारवाई केली. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एकोडी येथील स्वर्गीय निर्धनराव वाघाये पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये काल बारावीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान ही केलेली भंडाऱ्यातील पहिली कारवाई आहे. या कारवाई सोबतच केंद्र संचालक आणि वर्ग खोली पर्यवेक्षक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांनी दिलीय.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील १० लाख घरकुल लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचा पहिला हप्ता प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथील कार्यक्रमादरम्यान सदर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी बटन दाबली आणि लाभार्थ्यांच्या खात्यात ती रक्कम थेट वळली. भंडारा येथीलकार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या असंख्य महिलांच्याही खात्यात घरकुलाच्या बांधकामाचा पहिला हप्ता थेट खात्यावर आल्यानं उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला. जयश्री सवाईमुन ही महिला बेटाळा या गावावरून या कार्यक्रमात आली होती. त्यांच्याही खात्यावर १५ हजार रुपये जमा झाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांचं पहिल्या टप्प्याचं ६३ हजार ३९४ लाभार्थ्यांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यापैकी ६० हजार ३२२ घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ३४ हजार ७४६ घरकुलाचे उद्दिष्ट दिलेलं असताना ३३ हजार ८९१ घरकुलाचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण तर, पहिल्या टप्प्याच्या निधीचं वितरण या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं.
दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी आणि दुधाला कमी भाव मिळत असल्याने राज्य सरकारने जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीसाठी दुधाला प्रति लिटर पाच रुपयाचा अनुदान जाहीर केलं यानंतर हे अनुदान वाढून एक ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी प्रति लिटर सात रुपयांचा अनुदान केलं मात्र हे जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लाख 46 हजार शेतकऱ्यांचं 224 कोटी रुपयांचा अनुदान थकीत आहे राज्यात सर्वाधिक दूध उत्पादक जिल्हा म्हणून अहिल्या नगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं राज्यातील एकूण दूध संकलनापैकी 30 ते 35 टक्के दूध संकलन हे अहिल्यानगर जिल्ह्यातून होतं त्यामुळे या जिल्ह्यात सर्वाधिक अनुदान दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना मिळतं मात्र मात्र मोठ्या प्रमाणात दुधाचं अनुदान रखडल्यामुळे शेतकरी सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाची मागणी करत आहेत सरकारकडून हे अनुदान रखडवला जात आहे की जिल्हा दूध विकास अधिकाऱ्याने वेळेवर कारवाई न केल्यामुळे अनुदान रखडल आहे याबाबत जिल्हा दूध विकास अधिकाऱ्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास किंवा माहिती देण्यास नकार दिला आहे.
मुंबईचा पारा ३७ अंशांच्या पार
मुंबईत उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात
मुंबईत आज तापमान ३७.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद
कुलाब्यात देखील पारा ३५ अंश सेल्सिअसवर
ठाण्यात देखील कमाल तापमान ३७ अंशांवर
कमाल तापमानासोबतच किमान तापमानात देखील वाढ
वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर घडली. प्राप्त माहितीनुसार, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कूटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पातील हेळवाक वन परिक्षेत्रात 6 दिवस पर्यटनास बंदी
23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी कालावधीत प्राणीगणना असल्यामुळे पर्यटकांना प्रवेश बंदी
पाऊल खुणा सर्वेक्षण व छेद रेषा सर्वेक्षण करण्यासाठी पर्यटन बंद राहणार
वन क्षेत्रपाल एस. ए. जोपळे यांची प्रसिध्दी पत्रकादवारे माहिती
वन क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केलेस होणार कारवाई...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...