Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra LIVE Updates News: गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगली आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 22 Feb 2025 02:07 PM

पार्श्वभूमी

Maharashtra LIVE Updates News: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपकडून शिंदेंची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची...More

पुण्याच्या वडगाव शेरीत मध्यरात्री अनेक वाहनांची तोडफोड; वाहनांचा मोठ नुकसान 

वडगाव शेरीत मध्यरात्री अनेक वाहनांची तोडफोड


वाहनांचा मोठ नुकसान 


दोन गटात बाचाबाची सुरु झाली आणि त्यानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आली 


पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. 


या तोडफोडीत सर्वसामान्य पुणेकरांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. 


शुक्रवारी मध्यरात्री वडगाव शेरी परिसरात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने पुन्हा वाहनांची तोडफोड करत नासधूस केली. 


यामध्ये ५ चारचाकी, ५ दुचाकी, २ ऑटो रिक्षांची तोडफोड करण्यात आली. तर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकींची नासधूस करण्यात आली.


चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.