Maharashtra Live Update : राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान आणि मतमोजणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ज्योती देवरे Last Updated: 27 May 2024 02:58 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.  राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स जाणून...More

 Mumbai : मुंबईत निवडणुका संपताच बोरिवलीत गुजराती बोर्डाचा मुद्दा पुन्हा तापला

 Mumbai : मुंबईत निवडणुका संपताच बोरिवलीत गुजराती बोर्डाचा मुद्दा पुन्हा तापला.


वॉर्ड ऑफिसरच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्यासाठी बसले भाजप नेते गोपाळ शेट्टी.


बोरिवली पश्चिमेतील स्वतंत्र वीर सावरकर उद्यानातील गुजराती फलक हटवण्याची नोटीस बीएमसीने दिली होती.


त्यानंतर आज भाजप नेते गोपाळ शेट्टी बोरिवली आर/मध्य विभागाच्या कार्यालयात बसले आहेत.


गोपाळ शेट्टी म्हणतात की, नागपूर न्यायालयाने पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत, तरीही बीएमसी नोटीस देत आहे.


जोपर्यंत बीएमसी योग्य प्रतिसाद देत नाही तोपर्यंत मी बीएमसी कार्यालय सोडणार नाही, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.