= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Rajkot Game Zone Fire : गुजरात अग्नितांडवात 32 जणांचा होरपळून मृत्यू Rajkot TRP Game Zone Fire : गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये अग्नितांडव. 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू, डिझेलच्या साठ्यामुळे आगीचा भडका उडाल्याची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला Maharashtra Weather Update : विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 40 अंशांच्या पार गेलं आहे. राज्यात अकोला सर्वाधिक उष्ण ठरलं आहे. परिणामी, उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Dam : पुरंदर, बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडंठाक Pune Dam : पुरंदर व बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं पडलं आहे. धरणाला अक्षरशः भेगा पडला असून धरण कोरडे पडल्याने 56 गावांवर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे. तर मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. या धरणावर पुरंदर तालुक्यातील 40 गावे, तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एमआयडीसी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. पुरंदर तालुक्यात कमी पाऊसामुळे नाझरे धरणात पाणीसाठा होऊ शकला नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai Drain Cleaning Inspection : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील नालेसफाईची पाहणी Mumbai Drain Cleaning Inspection : मुंबई महापालिकेने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पावसाळापूर्व नालेसफाई हाती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या नालेसफाईची स्वतः पाहणी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Rain Update : मुंबई, पुणेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा Rain Update : मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असताना आज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. 1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Accident Case Update : पुणे अपघात प्रकरणी मोठमोठे खुलासे, सर्व सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती Pune Accident Case Update : पुण्यातील कल्याणी नगर अपघातात मोठमोठे खुलासे होताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला चांगलाच वेग आला आहे. विशाल अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून मोठी माहिती हाती येण्याची आणि अग्रवाल कुटुंबियांची कुंडली बाहेर येण्याची शक्यता आहे.