Maharashtra LIVE Updates: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

ज्योती देवरे Last Updated: 15 Jun 2024 07:28 PM
Jalana News : मराठवाड्यात बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा
जालना : मराठवाड्यात काही बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यांनी सरकारची कोणतीच परवानगी घेतली नसल्याचा दावा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय. जालन्यातील मंठा येथे खरीप हंगामाच्या आढावा बैठकीमध्ये कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनसमोर हा दावा केलाय. जालन्यातील एका उद्योजकाने आश्या कारवाईपासून वाचण्यासाठी आपल्या पायावर लोटांगण घेतल मात्र  त्याच्यावर देखील आपण कारवाई केली असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला.
Parbhani Rain : एक तासाच्या पावसात जिंतुरमध्ये पाणीच पाणी, अनेक ओढ्यांना पूर 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला 

परभणी : आज दुपारच्या सुमारास परभणीच्या जिंतूर तालुक्यात केवळ 1 तास पाऊस झालाय हा पाऊस एवढा जोरदार होता कि सर्वत्र पाणीच पाणी करून गेला. जिंतुर तालुक्यातील अंगलगाव, शेवडी, माणकेश्वर ,संक्राळा यासह इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये ग्रामीण भागातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून या पावसामुळे जवळपास 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Raigad : महाडच्या काळ नदीपात्रात सापडला अनोळखी  मृतदेह

Raigad : महाडच्या काळ नदीपात्रात सापडला अनोळखी  मृतदेह



मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही 


पाण्यात बुडून मृत्यु झाल्याचा पोलिसांचा अंदाज




Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा,  मंगळवारी होणार मंत्रिमंडळाची बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा.... 


मंगळवारी होणार मंत्रिमंडळाची बैठक....


सगे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदी बाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री शंभूराजे मांडणार....


जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा....

Thane : ठाण्यातील Supermax कामगारांसाठी मुख्यामंत्रीच मैदानात, प्रशासनाला आदेश

Thane : ठाण्यातील Supermax कामगारांसाठी मुख्यामंत्रीच मैदानात



Supermax कंपनीचा ठाणे येथील प्रकल्प कंपनीने दिवाळखोरी घोषित करून बंद केल्याने सुमारे 1500 कामगार बेकार झाले.


कंपनी ने कायद्यानुसार कामगारांना देणी देणे आवश्यक होते,परंतु कंपनीने कायदेशीर पळवाटांचा फायदा घेऊन सदर प्रकरण कंपनी न्यायाधिकरणात नेले.सुपरमॅक्स कंपनी ही आता बंद होऊन निलावात निघालेली आहे



 कंपनीचे कामगार हे आता देशोधडीला लागलेले आहेत यामध्ये सुमारे 1500 कामगार बेकार झाले आहेत.


प्रकरण न्यायप्रविष्ठ करून ठेवल्याने सुमारे एक वर्षापासून कामगारांना कोणताही मार्ग दिसत नव्हता सरते शेवटी कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत विनंती केली


मुख्यमंत्र्यांनी यातील बाबी समजून घेऊन योग्य ते आदेश प्रशासनाला दिले. 

Nagpur Blast : नागपूर जिल्ह्यातील धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरण, मृतकांचा आकडा 8 झाला..

Nagpur Blast : नागपूर जिल्ह्यातील धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरण...


मृतकांचा आकडा 8 झाला...


श्रद्धा पाटील नामक 22 वर्षीय तरुणीचा उपचारा दरम्यान झाला आज मृत्यू...


या स्फोटातील जखमीवर दंदे रुग्णलायत होते उपचार सुरू...

Nashik - लोकसभा निवडणुकीत अनेक देशपातळीवर प्रश्नांचा प्रभाव पडला - दादा भुसे 

Nashik - नाशिक शिक्षक मातदारसंघासाठी महायुतीची पार पडली बैठक - दादा भुसे 
-  महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी झाली बैठक- दादा भुसे 
- बैठकीला महायुतीचे लोकप्रतिनिधी स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित- दादा भुसे 
- छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते जेष्ठ नेते आहेत आणि आमच्या सोबत आहेत- दादा भुसे 
- किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार- दादा भुसे 
- महायुतीचे सर्व नेते त्यांच्यासाठी काम करतील- दादा भुसे 
- लोकसभा निवडणुकीत अनेक देशपातळीवर प्रश्नांचा प्रभाव पडला- दादा भुसे 
- राष्ट्रवादी चे आमदार देखील आमच्या बैठकीला उपस्थित होते- दादा भुसे 

Gadchiroli : गडचिरोलीतील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागात नक्षलवाद्यांशी मोठी चकमक

Gadchiroli : गडचिरोलीतील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागात नक्षलवाद्यांशी मोठी चकमक.


चकमकीत 8 नक्षलवादी ठार.


एसटीएफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


त्याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. मात्र परिसरात अजून ही अभियान सुरू असल्यानें मारले गेलेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे 

Kolhapur : शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार - शाहू महाराज

Kolhapur : शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार - शाहू महाराज


नागपूर ते गोवा असा हा शक्तीपीठ महामार्ग जातोय - शाहू महाराज


अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरज काय असा प्रश्न पडतोय - शाहू महाराज


या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाही, बेकारी वाढण्याची शक्यता आहे- शाहू महाराज


शक्तीपीठ मार्गामुळे नजतेची शक्ती वाढणार नसेल तर महामार्ग कशाला- शाहू महाराज


महायुती निवडणुकीत आपलं मत मांडत नव्हते, निकालानंतर त्यांचे मन बदलेलं दिसतं- शाहू महाराज

Crime : इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांना 15 हजारांना गंडवलं

Crime : इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांना 15 हजारांना गंडवलं


फोनवरून आमचा अपघात झाला आहे गाडीतील दोन इसम जागीच ठार झाले असून आम्ही देखील जखमी झालो आहोत.


आम्हाला उपचारासाठी तातडीने पैसे पाठवा अशी समोरून मागणी होते 


यांना या संकटातून वाचवण्यासाठी तातडीने मदतीचा हात देतो.


मात्र हे फसवेगिरी करणारे टोळी असल्याचं त्यांनी सांगितलं.

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृत अवस्थेत आढळले

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे



 रसायन युक्त पाणी तलावात सोडल्या जात असल्याने ही घटना घडली असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे


 


केमिकल कंपन्याच्या सह सांड पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी दूषित होऊन,  


तलावातील तब्बल 50 ते 60 क्विंटल पेक्षा जास्त माशांचा मृत्यू..झाला आहे


 

Pune : पुण्यात रॉडच्या हल्ल्यात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या ज्येष्ठ  नागरिकाचा मृत्यू

Pune : पुण्यात रॉडच्या हल्ल्यात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या ज्येष्ठ  नागरिकाचा मृत्यू


दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरांनी लोखंडी रॉडने ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण


पुण्यातील औंध परिसरातील परिहार चौकातील घटना


समीर रॉय चौधरी असं 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव 


चतु:श्रृंगी पोलिसांनी जय सुनिल घेंगट सह तीन अप्लवयीन मुलांना घेतलं ताब्यात

 शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीची महत्वाची बैठक, बैठकीत आखली जाणार निवडणुकीची रणनीती

 शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीची महत्वाची बैठक


पालकमंत्री दादा भुसे, भाजाप आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे , माजी खासदार हेंमत गोडसेंयांच्या उपस्थितीत बैठकीला सुरवात होणार
-
महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित
-
शिवसेना शिंदें गटाचे किशोर दराडे यांच्यासाठी होणार बैठक
-
बैठकीत आखली जाणार निवडणुकीची रणनीती


- अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांनीही केली आहे उमेदवारी, भावसार यांच्या संदर्भात काय निर्णय होतो यांकडे लक्ष

Buldhana : राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आज सिंदखेड राजा ते पाचाड मशाल यात्रेला प्रारंभ.

Buldhana : राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आज सिंदखेड राजा ते पाचाड मशाल यात्रेला प्रारंभ.


राजमाता जिजाऊंची 350 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे त्यानिमित्त जिजाऊंच्या जन्मस्थळापासून ते पाचाड या मशाल यात्रेला आजपासून सिंदखेड राजा येथून प्रारंभ झाला आहे. जिजाऊंच्या जन्मस्थळापासून जलकलश घेऊन ही मशाल यात्रा आजपासून सुरू झाली आहे यंदा हे मशाल यात्रेचे चौथे वर्ष आहे जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही यात्रा जिजाऊंच्या पुण्यतिथी दिनी पाचाड येथे पोहोचेल.

Pune : विधानसभेच्या निवडणुकींसाठी शरद पवारांकडून तयारीला सुरुवात

Pune : विधानसभेच्या निवडणुकींसाठी शरद पवारांकडून तयारीला सुरुवात


पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार 


पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक घेणार


दुपारी तीन वाजता बैठक होणार


राष्ट्रवादी काँग्रेस भवनात बैठक घेण्यात येणार


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलदेखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता

Kolhapur : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तिघींचा मृत्यू 


Kolhapur : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तिघींचा मृत्यू 


मुंबईतून कोल्हापूरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रेल्वे तीन महिलांना चिरडल्याची घटना 


शुक्रवारी रात्री उशिरा घडली घटना


या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू 


रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याची शक्यता


रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नाहीये

Kolhapur : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तिघींचा मृत्यू 


Kolhapur : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तिघींचा मृत्यू 


मुंबईतून कोल्हापूरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रेल्वे तीन महिलांना चिरडल्याची घटना 


शुक्रवारी रात्री उशिरा घडली घटना


या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू 


रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याची शक्यता


रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नाहीये

Parbhani : परभणीच्या जिंतूर शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहात तोडफोड आणि जाळपोळ

Parbhani : परभणीच्या जिंतूर शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहात तोडफोड आणि जाळपोळ


प्राचार्यांची त्यांच्याच विद्यार्थ्यां विरोधात पोलिसांकडे धाव
 


परभणीच्या जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन शिक्षणा ऐवजी महाविद्यालयातील दोन गटांतील मारझोडीच्या प्रकरणात नेहमीच चर्चेत राहिले आहे, यावेळी मात्र चक्क विद्यार्थ्यांनीच शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहाची तोडफोड करून जाळले असल्याचा आरोप तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.आर.टी.पाचकोर यांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसांकडे एका तक्रार पत्रावरून केला आहे.

Nana Patole : महाराष्ट्रात काँग्रेसची २८८ विधानसभा लढण्याची तयारी - नाना पटोले

Nana Patole : महाराष्ट्रात काँग्रेसची २८८ विधानसभा लढण्याची तयारी - नाना पटोले


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मोठं विधान


महाराष्ट्रात आम्ही सगळीकडं विधानसभेची तयारी चालू केलेली आहे. मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे, मला इथं यावं लागतं आणि इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावं लागतात आणि ते सोडवावं लागतं

Samruddhi Mahamarg : पुलावरील अपूर्ण काम सोडल्याने पडला खड्डा आणि लोखंडाचा भाग तुटला.

Samruddhi Mahamarg : पुलावरील अपूर्ण काम सोडल्याने पडला खड्डा आणि लोखंडाचा भाग तुटला.


तुटलेल्या पुलावरील खड्ड्यामुळे व लोखंडी राफ्टर मुळे तीन दिवसात चार अपघात."


समृद्धी महामार्ग प्रशासन झोपेत.

Pune : बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण


Pune : बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण



पीडित महिलेच्या तक्रारीनंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


मला धमकी दिली आणि माझ्या अंगावर थुंकल्याचंदेखील तक्रारीत म्हटलंय.


याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, हवालदार नीलम कर्पे, माया गाडेकर, योगिता आफळे, दोन महिला पोलीस शिपाई, तसेच अक्षय आवटे  आदित्य गौतम , सुजीत पुजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल 


 समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

Solapur : दक्षिण सोलापूर तालुक्यात स्टेरिंगचे रॉड तुटून एसटी रस्त्याच्या खाली गेली, सुदैवाने 70-75 प्रवासी बचावले 

 


Solapur : दक्षिण सोलापूर तालुक्यात स्टेरिंगचे रॉड तुटून एसटी रस्त्याच्या खाली गेली, सुदैवाने 70-75 प्रवासी बचावले 


मंद्रूप-निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्ती जवळील घटना, शुक्रवारी दुपारी दीडची घटना


सोलापूरहुन कुसूरला निघालेली होती एसटी, अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले 


गाडी रस्त्यावरून खाली गेल्यानंतर वडाच्या मोठ्या झाडाला घासून चिखलात जाऊन रुतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला


अपघातात एसटीचे किरकोळ झाले नुकसान, एसटीतील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी..


आठवडीचा बाजार दिवस असल्याने प्रवासीची संख्या होती जास्त, एसटीमध्ये 70 ते 75 प्रवासी होते..


जखमींना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले होते दाखल, उपचारानंतर जखमींना घरी सोडण्यात आले

Nashik : नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी

Nashik : नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी


- स्वाइन फ्लूने बाधित रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू


- दोनच दिवसांपूर्वी डेंग्यू लागण झालेल्या रुग्णाचा झाला होता मृत्यू
- शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूमुळे चे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह 
- शहरात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू तर 31 जणांना लागण


- डास उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्याची मागणी

Malegaon Fire - मालेगाव शहराजवळ असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग..

 


Malegaon Fire - मालेगाव शहराजवळ असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग..
- काल मध्यरात्री लागली होती सवंदगाव रोडवरील एका गोडाऊनला आग..
- आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक...
- शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज..
- आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच फेऱ्या करण्यात आल्या होत्या..
- आग नियंत्रणात असून कुठलीही जीवितहानी नाही..

Bhandara : भंडाऱ्यात 18 लाखांच्या चोरीच्या विद्युत तारांसह पाच जणांना अटक

Bhandara : भंडाऱ्यात 18 लाखांच्या चोरीच्या विद्युत तारांसह पाच जणांना अटक


भंडारा LCB ची कारवाई


भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत वेळोवेळी आठ ठिकाणी ॲल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी करण्यात आली होती.


या प्रकरणात भंडाऱ्याच्या LCB च्या पथकानं चोरीच्या विद्युत तारांसह पाच जणांना अटक केली आहे

Malegaon : मालेगावात आज वाजणार शाळेची घंटा..

Malegaon : मालेगावात आज वाजणार शाळेची घंटा...



- मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झाले 50 हजार पुस्तकांचे संच..



- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नवी कोरी पाठ्य पुस्तके...

Nashik - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिक मध्ये शिवसेनेची बैठक

Nashik - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिक मध्ये शिवसेनेची बैठक

- पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन

- नाशिक मध्ये झालेल्या पराभव ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दादा भुसे करणार शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा

- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा झाला होता पराभव

लोकसभा निवडणुकीचा पराभव आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीला महत्व


- आजच्या बैठकीत काय चर्चा होतो याकडे लक्ष

Hingoli : हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर तीन जण गंभीर

Hingoli : हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर तीन जण गंभीर 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये विज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सोबत असल्या इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत 



हिंगोली जिल्ह्यातील शिनगी खांबा गावाचा शेत शिवारामध्ये वामन लोणकर हे शेतकरी अन्य काही महिला शेतकऱ्यांसह शेतामध्ये हळद लागवडीचे काम करत असताना अचानक ढगाळ वातावरण आणि वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि याच बदललेल्या वातावरणात अचानक वीज वामन लोणकर यांच्या अंगावर पडली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे  शेतकरी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत जखमींत दोन महिलांचा समावेश आहे

Ratnagiri Fire : रत्नागिरी- संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, दोन दुकानांचं मोठं नुकसान

Ratnagiri Fire : रत्नागिरी- संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग 


प्रशांत बेंडके किराणा दुकान, भावेश पटेल यांचे शक्ती ट्रेडर्स 



आगीत दोन दुकान जळून खाक*


दोन दुकानांचं मोठं नुकसान


देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी



स्थानिक ग्रामस्थांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

Buldhana : राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आज सिंदखेड राजा ते पाचाड मशाल यात्रा होणार प्रारंभ.

Buldhana : राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आज सिंदखेड राजा ते पाचाड मशाल यात्रा होणार प्रारंभ.


 जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही , शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा.


जिल्ह्यातील अनेक ठिकाणी " आपला दवाखाना " बंद , रुग्ण वाऱ्यावर.


अंबा बरवा अभयारण्यात व्याघ्र दर्शनासाठी अमेरिकन पर्यटकांची हजेरी , अंबा बरवा अभयारण्याची समृद्धी बघून पर्यटक झाले तृप्त.

 कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

 कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले


महाराष्ट्रातील मुंबई-मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृत्यू


पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा


कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत  काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू


या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई, मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Crime : शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष गायब, सीबीआयकडून कोर्टात कबूली

Crime : शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष गायब


शिनाच्या जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची सीबीआयकडून कोर्टात कबूली


मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीत CBI नं साक्षीदार हजर करू शकली नाही 


सीबीआय सांगाड्याच्या अवशेषातील काही हाडं कोर्टात करणार होते हजर


या हाडांच्या आधारावरच जे जे रुग्णालयातील अनाटॉमी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकांची होणार होती साक्ष


हाडं सापडत नसल्यानं आजवर तब्बल तीनवेळा सुनावणी तहकूब झालीय


तूर्तास खटल्याची सुनावणी 27 जून पर्यंत तहकूब


दरम्यान, ही सुनावणी जलदगतीनं संपवण्याकरता मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची कोर्टाकडे विनंती

Mumbai : डोंबिवलीत भरधाव वॅगनार कार फुटपाथवर, कार मधील एका व्यक्तीला दिला चोप

Mumbai : डोंबिवली 90 फीट रोड वरील घटना भरधाव वॅगनार कार फुटपाथवर


नागरिकांनी चालकासह कार मधील एका व्यक्तीला दिला चोप


ड्रिंक अँड ड्राईव्ह चा प्रकार


डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात चालक


90 फीट रोडवरील कृष्णाई बंगल्यासमोर भरधाव वेगाने वॅगनार कार फुटपाथवर चढली स्थानिक नागरिकांनी चालकासह कार मध्ये असलेल्या इसमाला बेदम मारहाण केली आहे हे दोघेही दारू पिल्याले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहेत


डोंबिवली पेंढारकर कॉलेज समोर काही मोटरसायकलला धडक देत 90फिट रोडवरील फुटपाथ वर कार चढवली स्थानिक नागरिकांकडून चालकाला चोप

Maharashtra : राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू, विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत होणार

Maharashtra : राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आज पासून सुरू होत आहेत..


सर्वच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.


दरवर्षी राज्यातील शाळा या 13 जून रोजी सुरु होतात.


मात्र, यावर्षी राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतल्यानंतर आजपासून राज्यातील शाळा सुरू होत आहेत.


शाळेचा आजचा पहिला दिवस असल्याने दादर इथल्या बाल मोहन शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे..

पार्श्वभूमी

Maharashtra LIVE Updates: रविवार 16 जून रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवण्यात येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.