Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर
Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Goa Nightclub Fire: उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी (6 नोव्हेंबर) रात्री उशिरा भीषण आग (Goa Nightclub Fire) लागली. या घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक...More
२०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाला ७१७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकार वित्त विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला.
राज्य सरकारने २०२५-२६च्या अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.
त्यानंतर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्राधिकरणाला अर्थसंकल्पीत तरतुदीपैकी २८३ कोटींचा निधी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी वितरित केला होता.
उर्वरित ७१७ कोटी वितरित करण्यासाठी नगरविकास विभागाने आता शासन निर्णय काढला आहे
प्रदीप गारटकर यांनी घेतली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट
पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारटकर मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीला
गारटकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गारटकर यांनी दिला होता राजीनामा
गारटकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
गारटकर करणार भाजप मध्ये प्रवेश?
सचिन दोडके यांच्यामुळे भाजप मध्ये अंतर्गत कलह?
दोडके यांचे भाजप प्रवेशाचे लागले फ्लेक्स
दोडकेंमुळे पुण्यातील भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत वाद, सूत्रांची माहिती
खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक
राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्या पक्ष प्रवेशावरून वाद झाल्याची माहिती
वारजे मधील नगरसेवक सचिन दोडके हे भाजप प्रवेशावरून वाद झाल्याची माहिती
भीमराव तापकीर यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याची माहिती
एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना दिवाळीपूर्वी पैसे देण्याचे आश्वासन देऊन अजूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने आज उभाठा युवा सेनेच्या वतीने रास्ता रोको करत कृषीमंत्र्यांना जिल्हा बंदीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीचे पैसे पंधरा दिवसात न मिळाल्यास पालकमंत्री दत्तात्रेय भरणे मामांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. युवा सेनेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग वरील माळीनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जर सरकारने पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा न केल्यास कृषी मंत्री भरणे मामा यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला. दिवाळीमध्ये थोड्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे खात्यावरती जमा करून रडक्यांचे डोळे पुसण्याचे काम सरकारने केले . आत्ताही सरकार तसेच करत आहे थोड्या थोड्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जमा करत आहे.तसे न करता सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे एकाच वेळी जमा करावेत अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत.
पुण्यात भाजपाच्या कोअर टीमची बैठक
केंद्रीय मंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बैठक
तर मंत्री चंद्रकांत पाटील देखील बैठकीत
पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीत होणार महत्वाची चर्चा
भाजपा महापालिका एकटं लढण्याच्या तयारीत?
बैठकीनंतर भाजपा प्रवेशांना पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता
बैठकीला पुणे शहरातील भाजपचे सर्व आमदार, खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती
वसई : शनिवारी (६ डिसेंबर) दुपारी १:३० वाजताच्या सुमारास तुंगारेश्वर येथील श्रीनाथ डेरीजवळ विकास यादव हा लाईट बिल भरून घरी जात असताना, आरोपी मोहिद खान ने आपल्या कारने यादवच्या बुलेटला कट मारला. कट का मारला, असा प्रश्न विचारल्यावर मोहिद खान आणि त्याच्या मित्रांनी यादवसह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सद्यस्थितीत पेल्हार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून परिसरात या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : राज्यातील कामगार सेनेच्या युनिट्सवर भाजपकडून सुरू झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर सर्व राज्यभरातील कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. कामगार सेना हा शिवसेनेचा महत्त्वाचा घटक असून राज्यभरातील हॉटेल्स, विमानतळे, कारखाने आणि कंपन्यांमध्ये त्याचे युनिट्स कार्यरत आहेत. या बैठकीत कामगार चळवळीतील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्याची शक्यता आहे.
जळगाव : शहरातील आहुजा नगर स्टॉपजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठा अपघात घडला. आहूजा नगरकडून अचानक मुंबई–नागपूर हायवेवर आलेल्या भरधाव ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रकमधील शेकडो टन अद्रक अपघातानंतर रस्त्यावर विखुरले त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. दरम्यान, समांतर रस्त्यांचे काम सुरू असल्याने बांभोरी ते खोटे नगर स्टॉप दरम्यान या परिसरात छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुदैवाने या घटनेत ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही सुरक्षित आहे.
ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्ये महिलेवर दोघांचा सामूहिक अत्याचार
केक मध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला
ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल
फॅमिली कोर्टाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला...
हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे..
ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली...
भंडारा: स्ट्रॉंग रूममधील स्विच बाबत माहिती घेण्याचं पत्र राज्य निवडणूक आयोगाने दिलं. हे पत्र म्हणजेच सत्ताधारी राज्य निवडणूक आयोगाला वेठीस धरून आपलं काम करीत आहे का? किंवा राज्य निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना लाभ पोहोचवण्याचं या माध्यमातून काम करत आहे का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. एबीपी माझा ने दाखवलेल्या वृत्तामुळे आम्हालाही याची माहिती मिळाली. यापूर्वी आम्हाला निवडणूक आयोगाने किंवा स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे आता खरोखरच सत्ताधाऱ्यांना याचा लाभ मिळेल असा संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप भंडारा नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री बोरकर यांनी राज्य निवडणूक आयोगावर लावला आहे.
राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात मुचकुंदी नदीकाठी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बिबट्याचे विद्रूप मृतदेहाचे फोटो फिरत होते. माहिती मिळताच वनपाल राजापूर यांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. वन विभागाने या प्रकरणी गुन्हा नोंद करून पंचनामा व कागदपत्रे तयार केली आहेत. मृत बिबट्या ताब्यात घेऊन आज पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून पुढील तपास सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी व वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत.
पुण्यात एक बिबट्या शिकारीसाठी आला होता, एका बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर ही चढला. बंगल्यातील तीन श्वानांपैकी एकाची शिकार करण्यासाठी बिबट्या झडप घालणार होता. मात्र सतर्क असणारे हे श्वान बिबट्यावर धावून गेले. ते बिबट्याला चांगलेचं भिडले अन सुरक्षा भिंतीवरूनचं बिबट्याला पळवून लावले. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीतील हे वास्तव सीसीटीव्हीत ही कैद झालंय.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील मुकुंदवाडी भागात लूटमार, खंडणी, प्राणघातक हल्ल्यांच्या सततच्या घटनांनंतर आता नशेखोरांनी रात्री हैदोस मांडला आहे. राजनगरमध्ये नशेखोरांच्या टोळीने सर्वसामान्यांच्या पाच दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्या. दोन महिन्यांपासून परिसरात हैदोस घालणाऱ्या गुन्हेगार, नशेखोरांच्या टोळीने हे कृत्य केल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत.
नाशिक: तपोवन येथील वृक्षतोडीला मोठा विरोध वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमधले सायकलिस्टने तपोवन येथील झाडांना सायकलने प्रदक्षिणा मारून आंदोलन करत झाड वाचवा तपोवन वाचवा अशा घोषणा देत वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. तर उद्या महापालिका प्रशासनाकडून आंदोलकांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र ही चर्चा तपोवन येथेच व्हावी, अशी मागणी देखील नाशिक सायकलिस्टकडून करण्यात आली आहे.
चिपळूण : कोयना वीज प्रकल्पातील सर्जवेल व आपत्कालीन झडप भुयारातील गळती दुरुस्तीसाठी टप्पा १ व २ हे दोन्ही टप्पे सुमारे तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंदमुळे चिपळूण शहरासह परिसरातील औद्योगिक वसाहती व अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीपूर्वी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी करत पोफळी ग्रामपंचायतीसह अनेक ग्रामपंचायतींनी कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.
बीड: गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथील ग्रामपंचायतीचे शिपाई जालिंदर सुरवसे यांना गावातील आठ ते दहा जणांनी लाकडी दांडे आणि रॉडने जबर मारहाण केली. या मारहाणीत सुरवसे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेचा विनयभंग केल्याच्या संशयावरून ही मारहाण झाल्याचे समोर आले असून, सुरवसे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या व्यक्तींपासून आपल्याला धोका असल्याचे सुरवसे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला ४ हजारांचा भाव द्यावा तसेच पहिली उचल ३००० देण्यात यावी यासाठी किसान सभा,ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती कडून सर्वच कारखान्यावर आंदोलन केले जात आहे.त्यामुळे एक एक कारखाना पहिली उचल जाहीर करत आहे.पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्याने ही शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन पहिली उचल ही २७२५ रुपये जाहीर केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द
सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा बसला फटका
पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले
इंडिगो चे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द
- महापालिका प्रशासन अधिकारी उद्या करणार आंदोलकांशी चर्चा आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण
- नाशिक च्या तपोवन येथील झाड तोडण्याची विरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आंदोलन...
-
- तपोवन येथे साधूग्राम तयार करण्यासाठी काही झाड काढावे लागतील प्रशासनाच्या या भूमिकेनंतर सुरू आहे आंदोलन
- त्याच भागात होणाऱ्या एक्जीबिशन सेंटर प्रकल्पाला देखील आता देण्यात आली आहे स्थगिती
- याच डोम मध्ये साधू महंतांची होणार होती राहण्याची व्यवस्था
- कुंभमेळा नंतर या डोम चे एक्जीबिशन सेंटर मध्ये होणार होते रूपांतर
- मात्र या संपूर्ण प्रकल्पाला आता देण्यात आली आहे स्थगिती
- उद्याच्या चर्चेनंतर आंदोलन संदर्भात ठरणार पुढील दिशा
आज एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद
जलवाहिनीवरील गळती बंद करण्याची कामे करण्यात येणार
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत एकूण आठ तास युद्धपातळीवर काम करण्यात येणार
मुंबई महानगरपालिकेमार्फत तर्फे निमनस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या १२०० मिलीमीटर जलवाहिनीवर गळती बंद
आज धारावीमध्ये धारावी बचाव आंदोलन संघटनेकडून सभेचं आयोजन
मेघवाडी येथील एकही झोपडी तोडू देणार नाही हा इशारा देण्यासाठी धारावीत आज सभेच आयोजन
धारावी मधील झोपड्या पाडण्याचा इशारा एसआरए ने दिला आहे.
धारावी बचाव आंदोलन संघटनेतर्फे एकही झोपडी पाडू देणार नाही अशी भूमिका घेत आज सभा घेण्यात येणार आहे
कामराज हायस्कूल समोर संध्याकाळी ६ वाजता सभा पार पडणार
झोपडपट्टीधारकास ५०० फुटाचे घर द्यावे तसेच कोणालाही धारावीबाहेर हाकलणार नाही असे लेखी आश्वासन सरकारने द्यावे ही भूमिका असणार आहे
भंडारा इथं सुरू असलेल्या नागपूर परीक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत अत्यंत चुरशीचे सामने बघायला मिळतं आहेत. व्हॉलीबॉल, कबड्डी, खो- खो, हॉकी, हँडबॉल, बॉस्केटबॉल या सांघिक स्पर्धेत अत्यंत चुरशीचे सामने झालेत. भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गोंदिया, येथील पोलिस महिला आणि पुरुषांच्या संघ सहभागी झाला आहे. भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूरचे खेळाडू मैदान गाजवित आहेत. शालेय विद्यार्थी आणि भंडाराकर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या चुरशीच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत.
उद्यापासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे.. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधीपक्ष नेतेपदाचा प्रश्न प्रलंबित असताना, विरोधक सत्ताधाऱ्यांचं चहापाणाचं निमंत्रण स्वीकारणार का? हे आता पहावं लागेल. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज दुपारी दोन वाजता विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर