- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विशाल गोखले यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला...More
अमरावती : बच्चू कडू आपल्या मूळगावी बेलोरा वरून ट्रॅक्टर वरून नागपूर साठी रवाना होताय
बेलोरा याठिकाणी हजारो शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चाला बच्चू कडूंना पाठिंबा
बच्चू कडू यांचं जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी
बेलोरा वरून सगळे ट्रॅक्टर एका लाईनीने नागपूर साठी कूच
आज पहिला मुक्काम वर्धा याठिकाणी होणार
उद्या 28 तारखेला बच्चू कडू यांचं कर्जमाफी साठी हजारो शेतकऱ्यांसह नागपुरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा...
बच्चू कडू यांना 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण सुद्धा देण्यात आले..
सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे आज वर्धा पोहचल्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवू -
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागील दीड ते दोन तासापासून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रम असल्यामुळे आज सकाळपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन्ही लेनवर गोरेगाव जोगेश्वरी,अंधेरी,विलेपार्ले, मालाड कांदिवली या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
विलेपार्ले ते मालाड 15 ते 20 मिनिटांच्या प्रवास मात्र वाहन चालकांना दीड ते दोन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे
या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे
तर नेस्को मधला कार्यक्रम संपला असून पश्चिम द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.
कार्तिकी यात्रेसाठी परिवहन खात्याकडून ज्यादा १ हजार १५० एसटी बसेस सोडण्यात येणार
२ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी संपन्न होणार आहे
या यात्रेसाठी भाविक व प्रवाशांच्या सोयीकरिता राज्यभरातून एसटी महामंडळ जादा बसेस सोडणार
तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे
महत्त्वाचं म्हणजे गाव ते पंढरपूर थेट सेवा अंतर्गत यात्रा कालावधीमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास थेट गावातून पंढरपूरला जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार
या गट आरक्षणात ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी 50% व 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास असणार आहे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मराठा कुणबी जीआर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यास नकार
परंतु याचिकाकर्त्यांना (ओबीसी वेलफेअर संघटने)ला अंशतः दिलासा
मराठा- कुणबी आरक्षण GR वर उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेत ओबीसी वेलफेअर संघटनेची बाजू ऐकून घेतली जाणार
लवकर सुनावणीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना
मंगेश ससाणे यांच्या ओबीसी संघटनेकडून उच्च न्यायालयात सुरू याचिकेत सुनावणी घेण्याची मागणी
राज्य सरकारचा अर्जाला विरोध
मराठ्यांना आरक्षणासाठी फटाफट प्रमाणपत्र मिळत आहेत - ओबीसी वेल्फेअर
त्यामुळे निर्धारित वेळापत्रकात सुनावणी घेण्याची ओबीसींची मागणी -
लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून आणलेल्या वाघनख्यांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन
शिवशस्त्रशौर्यगाथा या प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन
कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी शिवप्रेमी आणि नागरिकांना ऐतिहासिक वाघनखं पाहता येणार
सातारा, नागपूर नंतर कोल्हापुरात होतय वाघनखं आणि शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
शाहू जन्मस्थळ परिसरात गेल्या महिन्याभरापासून सुरू होती प्रदर्शनाची तयारी
बीड मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात खासदार रजनी पाटील यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या घटनेची सर्व माहिती दिली असून त्यांनी ट्विट करून घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान या प्रकरणात कुंपणच जेव्हा शेण खातं. तर न्याय कुणाला मागायचा? असा सवाल देखील खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही आत्महत्या होती की हत्या होती अशी शंका देखील उपस्थित करण्यात आली.
या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून SIT च्या माध्यमातून तपास सुरू करावा यासाठी साताऱ्याची टीम नको तर बीडमध्ये SIT स्थापन करावी अशी मागणी रजनी पाटील यांनी केली. राज्यात डबल इंजन सरकार असताना देखील आमच्या मुली आणि महिला सुरक्षित नाहीत. गृहखात यात कमी पडले त्यांनी याची सखोल चौकशी करावी. यात बऱ्याच शंका आहेत सरकारने याचं निरसन करावं. आणि हा विषय 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात मांडणार असून राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून हा विषय उचलतील अस खासदार पाटील यांनी म्हटलं..

‘इंडिया मॅरिटाइम वीक 2025’ उद्घाटनाला सुरुवात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल
या कार्यक्रमाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशाची सागरी ताकद आणि ब्लू इकॉनॉमी अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम पाच दिवस चालणार असून, 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन बंदर संघ, तसेच बंदर, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय यांच्या वतीने करण्यात आलं आहे. उद्घाटन प्रसंगी अमित शाह भारताच्या सागरी भविष्यदृष्टीबद्दल आणि विकसित भारत 2047 मध्ये सागरी क्षेत्राच्या भूमिकेबाबत आपलं विचार मांडतील.
या कार्यक्रमात केंद्रीय बंदर, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्यमंत्री शांतनू ठाकूर तसेच तटीय राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सौर आणि पवन ऊर्जेवर चालणाऱ्या जहाजं व बंदरांच्या प्रकल्पांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
या मॅरिटाइम वीकमध्ये 20 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी, 200 हून अधिक प्रदर्शक आणि सुमारे 5,000 हून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

Rain News : जळगावच्या पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. जोरदार पावसामुळे कापसासह नुकतीच काढणी केलेली मका, ज्वारी यासारखी पिके भिजून नुकसान झाली. दिवाळीनंतर सुरू असलेली कापूस वेचणीची कामे ठप्प झाली असून, शेतात वेचलेला कापूस ओला झाला आहे. पाचोरा शहरासह आखतवाडे, नगरदेवळा, पिंपळगाव, निंभोरी, वाडी व खडकदेवळा परिसरातही मुसळधार पाऊस झाला. कळमसरा गावात तर सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा दणका बसला असून, पाच तास अखंड पाऊस सुरू होता. यामुळे सोन नदीला पूर आला आणि गावातील अनेक भागात पाणी साचून घरांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरामुळे काही शेतकरी पैलतीरावर अडकून पडले होते.
मनसेच्या केंद्रीय समितीची शिवतीर्थ येथे बैठक सुरू...
या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, यशवंत किल्लेदार आणि अविनाश जाधव उपस्थित…
मतदार यादी इतर बाबींवर या बैठकीत होणार चर्चा...
१ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत होणार चर्चा... नियोजन आणि इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे
नाशिकरोड कारागृहातील बंदीवानाने घेतली फाशी...
- शिवदास भालेराव या 58वर्षीय कैद्याने घेतली फाशी...
- सिन्नर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भालेराव 2024 पासून होता कारागृहात...
- काल सायंकाळच्या सुमारास कशाच्या तरी साह्याने फाशी घेतल्याची माहिती...
- कारागृह प्रशासनाने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून केले मयत घोषित...
- नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद, कैद्याने गळफास का घेतला त्याचा तपास सुरू.
Beed News : बीडच्या गेवराई तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजाराने कहर केलाय. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत गेवराई तालुक्यात 12 बैलांचा मृत्यू झालाय. गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा, तांदळा, कोळगाव यासह परिसरातील अनेक गावांत जनावरांमध्ये लंपी आजाराने कहर केलाय. अतिवृष्टीने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर लंपीच्या रूपाने नवे संकट उभा ठाकले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप ठोस पावलं उचलण्यात आलेली नाही असा आरोप इथले शेतकरी करत आहेत. मागील पंधरा दिवसांत जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला. यावर काही प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या मात्र जनावरे दगावल्याचं यात समोर आले आहे. या संकटामुळे पशुपालक अडचणी देत असून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पशुपालक करत आहेत.
नंगारा भवनात तिकिटावरून वाद; सहा जणांवर गुन्हा
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील नंगारा भवन (म्युझियम) येथे तिकीट दरावरून झालेल्या वादातून सहा कर्मचाऱ्यांनी एकाला मारहाण केल्याची घटना तीन दिवसा पूर्वी घडली. होती ..या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लखन राठोड, (रा. वाईलिंगी) यांच्या तक्रारीनुसार, तिकीटाच्या रकमेवरून वाद घालत आरोपींनी शिवीगाळ करत धमकी देत मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी गार्ड दिगंबर चव्हाण सह इतर पाच साथीदारा विरोधात मानोरा पोलिसात गुन्हा करण्यात आलाय..
प्रत्येक गोष्टीवर मी बोलत नाही असे म्हणत पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना विक्री बाबत करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिल आहे.वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा हा माझा आत्मा आहे कारण मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा असल्याचा उल्लेख दीपावली स्नेह मिलनाच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून केल्याचे दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसात गोपीनाथ मुंडेंच्या वारसा बद्दल विविध वक्तव्य करण्यात आले होते काल पंकजा मुंडे यांनी नाव न घेता वैद्यनाथ कारखान्याबाबत बोलताना याला उत्तर दिल्याचे दिसून आले आहे.लोकांचे कारखाने गंजून गेले आहेत, कुलूप काय पाट्या देखील गंजल्या आहेत ते कुणी बघत नाही आणि माझ्यावर गोपीनाथ मुंडेंचा आत्मा विकल्याचा आरोप केला गेला. सगळ्या कारखान्याला पैसे मिळाले पण माझ्या कारखान्याला पैसे मिळाले नाही ते माहित आहे हे देखील सांगायला पंकजा मुंडे या वेळेला विसरल्या नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वच जागा स्वबळावर लढवण्याचा भाजपचे लक्ष आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी याबाबत प्रसिद्धी पत्र काढले. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागा आठ पंचायत समितीमध्ये 110 सदस्य आणि आठ नगरपालिका मध्ये सुमारे 175 जागा असून या सर्व ठिकाणी भाजपने स्वबळावर विजय मिळवण्याचं लक्ष ठेवले असल्याचं त्यांनी म्हटले. शहर आणि ग्रामीण भागात भाजपची पकड मजबूत होत असून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनसेच्या केंद्रीय समितीची थोड्याच वेळात शिवतीर्थ येथे बैठक...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे बैठक...
मतदार यादी इतर बाबींवर या बैठकीत होणार चर्चा...
१ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत होणार चर्चा... नियोजन आणि इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे
या बैठकीला मनसेच्या केंदिय समितीतील नेते उपस्थित राहणार …
तर आज संध्याकाळी साडेसहा वाजत देखील दादर येथील सूर्यवंशी हॉल येथे मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक...
दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारी नेरळ–माथेरान मिनी ट्रेन यंदा अवकाळी पावसामुळे सेवेत थोडी उशिरा धावणार आहे.दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरला ही ट्रेन सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार होती मात्र सततच्या पावसामुळे काही भागात रस्त्यांवर भूस्खलन होऊन ट्रॅक खालचा भाग कमकुवत झाला आहे त्यामुळे या कामाच्या डागडुजीसाठी थोडा वेळ लागत असल्याने संबंधित विभागाने हा मुहूर्त थोडा पुढे नेलाय.त्यामुळे ही सेवा 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा महिनाभर उशिरा या ट्रेनची सेवा मिळत असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झालाय
दिवाळी सणाच्या उत्साहावर अवकाळी पावसाने विरजण घालण्याचे काम केले असून नाशिकच्या चांदवड आणि देवळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मका, कांदे आणि उन्हाळी कांद्याची रोपे पूर्णपणे खराब झाली आहेत..चांदवड ५१.५ तर देवळ्याची ७७.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे..पूर्वीच्या अतिवृष्टीचं अनुदान अजून मिळालेलं नाही आणि आता या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा कंबरडे मोडले आहे.. काढणीला आलेला मका पाण्यात बुडाला आहे, कांद्याच्या बियाण्याचं नुकसान झालं आहे, आणि नव्याने पेरलेली कांदा रोपे या पावसामुळे मरू लागली आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे..
नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीत आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष भाजप-एनडीएसोबत
एनडीएच्या सर्व उमेदवारांना आरपीआयचे समर्थन
एनडीए उमेदवारांचा प्रचार करणार रामदास आठवले
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी...बदनेला बळीचा बकरा बनवलं जातंय, वकिलांचा दावा...तर सुसाईड नोटवर शंका घेणं चुकीचं, सरकारी वकिलांचा युक्तिवाद...
पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय, नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंचा ईमेलमध्ये उल्लेख
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द